Ticker

6/recent/ticker-posts

Independence Day India 2021 #स्वातंत्र्यदिन२०२१ व #IndependenceDayIndia2021

१५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत.
#स्वातंत्र्यदिन२०२१ व #IndependenceDayIndia2021


#स्वातंत्र्यदिन२०२१-#IndependenceDayIndia2021

१५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत शासनामार्फत पत्रक निर्गमित करण्यात आळेले आहे ज्यामध्ये विविध ल्पर्धांचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. यामध्ये इयत्ता १ ली ते ५ वी, ६ वी ते ८ वी व ९ वी ते १२ वी मध्ये विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. #स्वातंत्र्यदिन२०२१ व #IndependenceDayIndia2021 या हॅशटग चा वापर करून आपल्या शाळेतील विद्यार्थी असा निबंध, भाषण, चित्रसंग्रह आपल्या सोशल मिडिया जसे की फेसबुक, इन्स्टाग्राम, द्वीटर इ. वर upload करू शकतात व स्पर्धेत भाग घेऊ शकतात. चला या स्पर्धेविषयी माहिती घेऊ या.
परिपत्रक :

१५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन परिपत्रक क्रमांका संकिर्ण २०२१/प्र.क्र.११२/एस.डी.-४

मंत्रालय, मुंबई ४०००३२.

दिनांक :- १३ ऑगस्ट, २०२१.

परिपत्रक :

दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये आपण १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो. यावर्षी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने क्रांतिवीरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव विद्याथ्र्यांना व्हावी, त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण व्हावी अशा विविध उद्देशांनी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये दिवसभरात वृक्षारोपण, अंतर शालेय / अंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाईन पद्धतीद्वारे वाद विवाद स्पर्धा, प्रश्न मंजुषा/देशभक्तीपर निबंध व कविता, चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन, वक्तृत्व स्पर्धा, स्वतंत्र्य संग्रामाच्या दुर्मिळ छायाचित्रांचे संकलन अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे.

#स्वातंत्र्यदिन२०२१-#IndependenceDayIndia2021

भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी

कार्यक्रमाचे नाव - १. वक्तृत्व, २. एकपात्री अभिनय (वेशभूषासह), ३. राष्ट्रगाण (वेशभूषासह), ४. चित्रकला

विषय -

१. माझा प्रिय भारत देश

२. मी तिरंगा बोलतोय

३. माझ्या स्वप्नातील भारत

४. भारतीय ध्वज/ माझ्या शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रम

५. स्वातंत्र्य लढ्यातील एका थोर सेनानीची वेषभूषा

६. स्वातंत्र्य लढ्यातील कविता

तपशील (भाग घेण्यासाठी काय करावे?) -

वकृत्व, एकपात्री (वेशभूषासह) दिलेल्या तीन पैकी कोणत्याही विषयावर २ मिनिटाचा व्हिडिओ करून अपलोड करणे.

राष्ट्रगाण- दिलेल्या तीन पैकी कोणत्याही विषयावर करून करणे.

चित्रकला - दिलेल्या क्रं. ४ च्या विषयावर चित्र काढून रंगविलेल्या चित्राचा फोटो अपलोड करणे.

२ इयत्ता सहावी ते आठवी

कार्यक्रमाचे नाव-

१. निबंध लेखन (Essay Writing)

२. कविता लेखन

३. स्वरचित

४. काव्यवाचन

५. देशभक्तीपर  गीतगायन

 

विषय -

१. अहिंसा व स्वातंत्र्यलढा

२. सन २०२५ मधील भारत

३. माझ्या नजरेतून माझा भारत

४. भारतीय स्वातंत्र्य लढा

५. स्वातंत्र्य आणि लहान-थोरांचे बलिदान

६. स्वातंत्र्य चळवळीतील महात्मा गांधीचे योगदान

७. १५ ऑगस्ट १९४७

तपशील (भाग घेण्यासाठी काय करावे?) -

A) निबंधलेखन-  दिलेल्या चार पैकी कोणत्याही विषयावर १००० शब्दांपर्यंत A4  आकाराच्या कागदावर निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा.

B) वक्तृत्व- दिलेल्या चार पैकी कोणत्याही विषयावर व्हिडिओ भाषण करून त्याचा ०३ मिनिटांचा  video अपलोड करणे.

C) स्वरचित कविता लेखन आणि काव्यवाचन / देशभक् तीपर गीतगायन -A4 आकाराच्या कागदावर देशभक्तीपर स्वरचित कविता लिहून त्याचा फोटो अपलोड करावा. काव्यवाचन आणि देशभक्तीपर गीत गायनसाठी मराठी/ हिंदी भाषेतीलकाव्य/गीत म्हणून त्याचा ०३ मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करावा.

3. इयत्ता नववी ते बारावी

कार्यक्रमाचे नाव-

१. निबंध लेखन (Essay Writing)

२. वक्तृत्व

३. व्हिडिओनिर्मिती (Videography)

४. दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह

५. कथाकथन

६. रांगोळी

विषय -

१ भारत एक महासत्ता.

२. भारतीय म्हणून माझी जबाबदारी

३. माझ्या स्वातंत्र्य "लढ्याचे Real Heroes

४. भारतीय स्वातंत्र्यलढा

५. स्वातंत्र्य आणि आपली कर्तव्ये

६.चले जाव / भारत छोडो (Do or Die) चळवळ

७. ७५ वा स्वातंत्र्यदिन

तपशील (भाग घेण्यासाठी काय करावे?)

A) निबंध लेखन आणि वक्तृत्व विषय- दिलेल्या कोणत्याही विषयावर A4

आकाराच्या कागदावर निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावाआणि वक्तृत्वसाठी ३ मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करावा.

B) व्हिडिओनिर्मिती दिलेल्या क्रं.३ किंवा ४ या विषयाशी संबंधित इंटरनेटवरील फोटोंचा वापर करून 03 मिनिटांची क्लिप व्हिडिओ तयारकरून अपलोड करावी.

C) दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील निवडक प्रसंगाच्या फोटोंचा कोलाज तयार करून त्याचा फोटो अपलोड करावा.

 

व्हिडिओ कोठे upload  करावा?

उपरोक्त प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य इ. #स्वातंत्र्यदिन२०२१ व #IndependenceDayIndia2021 या HASHTAG (#) वर upload करावे. तसेच विविध समाज माध्यमे उदा. फेसबुक, इन्स्टाग्राम, द्वीटर इ. वर upload करावे. प्रत्येक गटात वर्गनिहाय उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

सदर कार्यक्रमांचे आयोजन करत असताना कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

         अशाप्रकारे आपण १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा स्वातंत्र्य दिन साजरा करू शकता.

शासन निर्णय- 

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या