Ticker

6/recent/ticker-posts

Scholarship Exam 2021 Hall ticket instruction शिष्यवृत्ती परीक्षा २०२१

 Scholarship Exam 2021 Hall ticket instruction  शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ प्रवेश पत्र व महत्वाच्या सूचना

शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२१ Scholarship Exam 2021 अगदी काहीं दिवसावर आलेली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship Exam 2021 ला जाण्यापूर्वी आपणास कांही मार्गदर्श सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशा मार्गदर्शक सूचना कोणत्या आहेत. याविषयीची माहिती आजच्या पोस्टमध्ये मी आपणास देणार आहे. Scholarship Exam 2021 ला जाण्यापूर्वी आपण सर्व तयारी करून खालील सूचनांचे पालन करावे.

Scholarship Exam 2021 Hall ticket instruction  शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ प्रवेश पत्र व महत्वाच्या सूचना या विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी देखील देण्यात आलेल्या आहेत. तेव्हा अशा सूचना पालकांनी व दिद्यार्थ्यांनी सुद्धा पालन करावयाच्या आहेत. 

scholarship-exam-2021

परीक्षार्थ्यांसाठी सूचना :-


01) परीक्षार्थ्याने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोविड - 19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे (मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग इत्यादी) पालन करून सकाळी 10:00 वाजता परीक्षा केंद्रावर हजर रहावे.


02) परीक्षार्थ्याने प्रत्येक पेपर सुरू होण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदर परीक्षागृहात प्रवेशपत्रासह उपस्थित रहावे.


03) उत्तरे नोंदविण्यास सुरुवात करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेवर आणि प्रश्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर छापलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.


04) परीक्षार्थ्याने प्रत्येक पेपरच्या वेळी उत्तरपत्रिका आणि स्वाक्षरीपटावर विहित ठिकाणी स्वाक्षरी करावी.


05) प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत इतर परीक्षार्थी, पर्यवेक्षक, केंद्रसंचालक यांचेशी पेपर चालू असताना चर्चा करू नये.


06) कॅलक्युलेटर, मोबाईल, पुस्तके इ. साहित्य परीक्षागृहात आणण्यास सक्त मनाई आहे.


07) उत्तरे नोंदविण्यासाठी निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनचाच वापर करावा.


08) परीक्षार्थ्यास कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येणार आहे. पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिकेची Original Copy पर्यवेक्षकाकडे जमा करून Candidate Copy व प्रश्नपत्रिका आपल्यासोबत घेऊन जाण्यास परीक्षार्थ्यास परवानगी आहे.


09) प्रश्नपत्रिका संचकोड उत्तरपत्रिकेवर अचूक नोंदवून त्याबाबतचे अचूक वर्तुळ रंगविणे आवश्यक आहे.


10) उत्तरपत्रिका संगणकावर तपासली जाणार असल्याने ती फाटणार नाही, चुरगळणार नाही याची दक्षता घ्यावी.


11) उत्तरपत्रिका फाटल्यामुळे उत्तरपत्रिकेवर रंगविलेले पर्याय दिसत नसल्यास त्या प्रश्नांचे गुण दिले जाणार नाहीत.

Scholarship-exam-2021


शाळा व पालकांसाठी सूचना :-


01) परीक्षार्थ्यांकडून परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका सोडविण्याचा पुरेसा सराव करून घ्यावा.


02) प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी / चुका आढळून आल्यास त्याबाबतचे निवेदन लेखी स्वरूपात न पाठवता अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर विहित मुदतीत संबंधित शाळेच्या लॉगीनमधून ऑनलाईन पद्धतीनेच भरून पाठवावे.


03) परीक्षेनंतर निकालाच्या कार्यवाहीचे टप्पे :- अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करणे  आक्षेप मागवून अंतिम उत्तरसूची घोषित करणे  अंतरिम (तात्पुरता) निकाल घोषित करणे  त्यावर आक्षेप मागवून अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करणे.


04) प्रवेशपत्रावरील शाळेच्या अथवा परीक्षार्थ्याच्या माहितीत काही दुरुस्ती असल्यास संबंधित मुख्याध्यापकाच्या पत्रान्वये तात्काळ परीक्षा परिषदेस कळवावे. जेणेकरून निकालापूर्वी आवश्यक बदल करता येईल.


05) परीक्षा परिषदेच्या https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केलेली माहिती व सूचना नियमितपणे काळजीपूर्वक वाचाव्यात.


06) प्रवेशपत्र व उत्तरपत्रिकेची Candidate Copy परीक्षेच्या अंतिम निकालापर्यंत जतन करून ठेवावी.

Puppss Exam Hall ticket Download - 

    आपण आपल्या मुलांचे Scholarship Exam 2021 चे प्रवेश पत्र घेतले नसेल तर खालील video पाहून ते कसे मिळवावेत याची माहिती पाहू शकता.



Scholarship Exam Practice Question Paper - 

अधिक सरावासाठी खालील शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका 
Scholarship Exam 5th 8th Class Question Paper









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या