Ticker

6/recent/ticker-posts

Ucha sikaanschi paravanagi milane babat उच्च शिक्षणाची परवानगी मिळणेबाबत

Ucha siksanschi paravanagi milane babat उच्च शिक्षणाची परवानगी मिळणेबाबत प्रस्ताव 

    आपण सेवत असताना आफली व्यवसायीक व शैक्षणिक पात्रता वाढवायली हवी. आपण व्यवसायीक अथवा शैक्षणिक पात्रता वाढत असाल अशा वेळी आपणास आपल्या कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. उच्च शिक्षण घेण्यापूर्वी आल्या कार्यालयाची परवानगी मिळवावी. यासाठी आफणास तसा प्रस्ताव सादर करावा लागतो. आपण घेत असलेल्या अथवा घेणार असलेल्या उच्चत्तम पात्रतेसाठी आपल्या कार्यालयाची सहमती किंवा परवानगी आऴश्य घ्या जेणे करून आफणास कोणतीही आडचण येणार नाही. शिवाय आपण शैक्षणिक अथवा व्यवसायिक पात्रता पूर्ण केल्यानंतर सेवापुस्तकात नोंद करताना कोणती अडचण येणार नाही. आपणसा सर्व लाभ देण्यात येतील. 
sikaanschi-paravanagi-milane-babat

         आपल्या मनात हा ही प्रश्न आला असेल की, उच्च शिक्षणाची परवानगी का घ्यावी?, उच्च शिक्षणाची परवानगी घ्यायची गरज काय?, आपण बहिस्थ शिक्षण घेत असताना अशा परवानगीची आवश्यकता आहे का?. आपण सेवत असताना एखदी पात्रता वाढवत असाल तर त्याची कल्पना आपल्या कार्यालयास द्यावी लागते. शिवाय त्याची नोंद सेवा पुस्तकात करावयाची असते. सेवा पुस्तकात नोंद करताना आपणास विचारणा केली जाऊ शकते. यासाठी उच्च शिक्षमाची परवानगी घेणे आवश्यक असते. यासाठी आपणास एक प्रस्ताव तयार करावा लागतो. असा प्रस्ताव आपण आपल्या कार्यालयास सादर करून परवानगी घेऊ शकतो.

उच्च शिक्षण प्रस्ताव कसा तयार करावा-  

                आपणास उच्च शिक्षणाची परवानगी घ्यावयाची असेल तर त्यामध्ये साधारणपणे खालील कागदपत्रे, दाखले, अर्ज, सहमती पत्र बनवावे लागतात. त्यावर सक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी घेऊन तो दोन प्रतीत बनवलेला प्रस्ताव एख प्रत कार्यालयास व एक प्रत आपणासाठी घेऊन कार्यालयात सादर करावा लागतो. त्यानंतर कार्यालयाकडून आपणास उच्च शिक्षणासाठी परवानगी दिली जाते. 
sikaanschi-paravanagi-milane-babat


साधारणपणे या प्रस्तावात खालील प्रमाणे कागदपत्रे द्यावी लागतात.
1) आपला अर्ज  (शिक्षणाधिकारी यांच्या नावे)
2) आपला अर्ज (गटशिक्षणाधिकारी यांच्या नावे)
3) आपला अर्ज (विस्तार अधिकारी यांच्या नावे) 
4) मुख्याध्यापक शिफारस पत्र
5) शाळा व्यवस्थापन समिती ठराव नक्कल
6) आपल्या अनुपस्थितीत काम पाहणाऱ्या चे सहमती पत्र
7) केंद्रप्रमुख शिफारसपत्र
8) विस्तार अधिकारी शिफारस पत्र
9) गट शिक्षणाधिकारी शिफारस पत्र
10) प्रवेशाची कागदपत्रे
    अशा सर्व कागदपत्राचा समावेश करून आपण उच्च शिक्षण परवानगी प्रस्ताव सादर करावा लागतो त्यानंतर आपणास उच्च शिक्षणासाठी परवानगी दिली जाते. जिल्हा परत्वे या मध्ये कागदपत्रे कमी जास्त असू शकतात त्याप्रमाणे आपण ती तयार करून द्यावीत.

नमूना अर्ज - 

sikaanschi-paravanagi-milane-babat

उच्च शिक्षण नमूना प्रस्ताव व्हिडिओ- 


उच्च शिक्षण नमूना प्रस्ताव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या