Ticker

6/recent/ticker-posts

Innovation Competition Year 2021 - 2022 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१ - २०२२

 राज्यस्तरीय  नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ 
Innovation Competition Year 2021 - 2022

राज्य शैक्षिणक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या मार्फत दरवर्षी राज्यस्तरीय  नवोपक्रम स्पर्धा पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका, . प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक, विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता) यांच्यासाठी आयोजित करत असते. दरवर्षा प्रमाणे यावर्षी देखील अशी राज्यस्तरीय  नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ आयोजित केली जाणार आहे. यासंदर्भात नुकतेच पत्र देण्यात आले आहे. त्या पत्रकातील माहिती प्रथम समजून घेऊया.

नवोपक्रम-Innovation-Competition-Year-2021-2022

विषय : राज्यस्तरीय  नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ च्या आयोजनाबाबत......

संपूर्ण जगभर उद्भवलेल्या कोविड-१९ या महामारीच्या काळातही सर्व मुलांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत. याचबरोबर राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरावर नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.

१. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका

२. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक

४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती

५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

तसेच ही स्पर्धा पहिल्या टप्प्यात गट १ व ३ यासाठी जिल्हा / DIET व गट क्र. ४ व ५ साठी प्रादेशिक

विद्या प्राधिकरण स्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक, शिक्षक

प्रशिक्षक व अधिकाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी whats App, वर्तमानपत्र यासारख्या प्रसार माध्यमांच्याद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी. यासाठी प्राचार्य, DIET व संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद यांनी एकमेकांशी समन्वय साधावा. आपल्या स्तरावरून देखील सोबत दिलेल्या माहितीपत्रकाचे वाचन करून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेविषयी आपल्या कार्यालयातील सर्व अधिका-यांना याबाबत अवगत करावे. या स्पर्धेची जबाबदारी एका सक्षम अधिका-याकडे देण्यात येऊन नवोपक्रम स्पर्धेची माहिती पोहचविण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास researchdept@maa.ac.in या ई-मेल द्वारे कळविण्यात यावा. त्यानुसार आपल्या अधिनस्त अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना http://innovation.scertinaha.ac.in या लिंकवर दि. १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपले नवोपक्रम अहवाल सादर करण्याविषयी सूचित करण्यात यावे.

मा.एम डी. सिंह

मा. संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

परिषद महाराष्ट्र , पूणे – 30

अशा स्वरूपातील पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. नवोपक्रम स्पर्धा अंतिम दिनांक ही दि. १० नोव्हेंबर २०२१ आहे त्यामुळे दि. १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपले नवोपक्रम अहवाल सादर करावयाचे आहेत. http://innovation.scertinaha.ac.in या लिंकची मदत घेऊ शकता. नवोपक्रम स्पर्धेविषयी अधिक माहिती घेऊ या यामध्ये - राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पाच गट कोणते असतील , नवोपक्रमाची उद्दिष्ट्ये कोणती आहेत, नवोपक्रम अहवाल लेखन कसे करावे, स्पर्धेच्या अटी नियम काय आहेत,  प्रतिज्ञापत्र कोणते द्यावयाचे आहेत, नवोपक्रमाचे मुल्यमापन कसे होणार आहे, विजेते कसे निवडले जातील याविषयी आपण सविस्तर माहिती समजून घेऊ या.

 

नवोपक्रम-Innovation-Competition-Year-2021-2022

संशोधन विभाग- राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२

संपूर्ण जगभर उद्भवलेल्या कोविड-१९ या महामारीच्या काळातही सर्व मुलांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत. याचबरोबर राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत आहेत. तसेच प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत सन २०२१-२२ या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पाच गट

१. पूर्व प्राथमिक गट (अगणवाडी कार्यकर्त्या/ सेविका व पर्यवेक्षिका)

२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)

४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती गट

५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

 

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे :

१. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षक व अधिका-यांना प्रोत्साहन देणे.

२. शिक्षक व अधिका-यांना दैनंदिन कामकाजात नाविन्यता आणण्यासाठी प्रोत्साहन देणे.

३. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तर तसेच डी.एल.एड. विद्यालय ते प्रशासन यामध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध घेणा या शिक्षक व अधिका-यांना उत्तेजन देणे.

४. शिक्षक, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिका-यांमधील सृजनशीलता व संशोधक वृत्ती वाढीस लावणे..

५. शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले उपयुक्त नाविन्यपूर्ण नवोपक्रम इतर शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासनाच्या माहितीसाठी ऑनलाइन प्रकाशित करणे.

 

नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे

 

नवोपक्रम अहवाल लेखन पुढील मुद्याच्या आधारे करावे.

१) नवोपक्रमाचे शीर्षक - उपक्रमाचे नेमके नाव लिहावे.

२) नवोपक्रमाची गरज व महत्त्व - उपक्रम निवडण्याचे कारण, उपक्रमाचे वेगळेपण तपशील. उपयुक्तता इ. चा तपशील यामध्ये द्यावा.

३) नवोपक्रमाची उद्दिष्टे - हा उपक्रम मी का करतो आहे. उपक्रमाचा फायदा कोणाला? कसा कोणत्या स्वरुपात, कोणत्या कृतीमुळे होणार? या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार, याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत.

४) नवोपक्रमाचे नियोजन

(i) उपक्रमपूर्व स्थितीचे निरीक्षण

(ii) संबंधित व्यक्तींशी, तज्ज्ञांशी चर्चा

(iii) आवश्यक साधनांचा विचार

(iv) करावयाच्या कृतींचा क्रम

(v) उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण

(vi) कार्यवाहीचे टप्पे (वेळापत्रक)

(vii) उपक्रमासाठी इतरांची मदत

(viii) उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे

५) नवोक्रमाची कार्यपद्धती

i) पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी

ii) कार्यवाही दरम्यान केलेली निरीक्षणे व माहिती संकलन

iii) उपक्रम पूर्ण झाल्यावर केलेली निरीक्षणे व त्यांच्या नोंदी

iV)  कार्यवाही करताना आलेल्या अडचणी

V. माहितीचे विश्लेषण: आलेख, तक्ते (आवश्यक वाटल्यास)

६) नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार) - या उपक्रमातून काय साध्य झाले व शिक्षण क्षेत्रातील कोणत्या घटकाला या उपक्रमाचा लाभ झाला. याबाबतची मांडणी यात करावी. उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी. आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी व आलेखाचा वापर करता येईल. अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी. त्याचप्रमाणे आपण उपक्रमांतर्गत केलेल्या विविध कृतींची फलश्रुती विषद करावीत.

७) समारोप - आपल्या उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीसाठी कसा झाला, हे विशद करावे. ८) संदर्भसूची व परिशिष्टे नवोपक्रम करताना ज्या संदर्भग्रंथांचा वापर केला, त्यांची सूची द्यावी तसेच सहभागी वर्गातील विद्यार्थी व आवश्यकता असल्यास त्यांच्यासाठी तयार केलेली पूर्वचाचणी, उत्तर चाचणी. प्रश्नावली इ. जे असेल ते परिशिष्टामध्ये जोडावे.

९) नवोपक्रम अहवाल लेखनाबाबत मार्गदर्शनासाठी https://youtu.be/7BiMmex1He   या लिंकवर जाऊन व्हिडीओ पाहावा.

 

स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी

१. स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगर पालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अथवा मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. १ ली ते १२ वीला अध्यापन करणारे असावेत. माध्यमिक शाळांमधील इ. ६ वी ते ८वी ला शिकवणारे शिक्षक प्राथमिक स्तर स्पर्धेसाठी गणले जातील.

२. राज्यातील ICDS विभागाच्या अधिनस्थ अंगणवाडीतील कार्यकर्ती/ सेविका व पर्यवेक्षिका या स्पर्धेसाठी भाग घेऊ शकतील.

३. डी.एल.एड. विद्यालयातील अध्यापकाचार्य व शिक्षणक्षेत्रातील पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षण), गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, जेष्ठ अधिव्याख्याता) या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. ४. स्पर्धक सध्या SCERT/ प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA)/ DIET मध्ये विषय सहाय्यक / DIET अंतर्गत विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असावा,

 

स्पर्धेचे नियम

नवोपक्रम स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे :-

१. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा वर्षातून एकदाच घेण्यात येईल.

२. स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम यापूर्वी या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा. त्यासाठी स्पर्धकाने स्वघोषित प्रमाणपत्र सादर करावे. (प्रमाणपत्राचा नमुना सोबत दिला आहे.)

३. नवोपक्रम शिक्षकांनी स्वतः राबविलेला असावा. याबाबतीत शिक्षकांनी नवोपक्रमाच्या प्रकल्प अहवालासमवेत खालील नमुन्यात प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.

४. सादर करण्यात आलेला नवोपक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना / मुलांना उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृतिसंशोधन व लघुसंशोधन पाठवू नये.

५. नवोपक्रम लेखन मराठी, इंग्रजी किंवा हिंदी यांपैकी कोणत्याही एका भाषेत लिहिलेला असावा.

६. नवोपक्रम टाईप केलेला असावा. टाईपिंग साठी Unicode या फॉन्टचाच वापर करावा. फॉन्ट साईझ १२, पेज मार्जिन डावी बाजू दीड इंच व उजवी बाजू, वरील बाजू, तसेच खालच्या बाजूस प्रत्येकी १ इंच मार्जिन /समास असावा.

7. हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

८. सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा सन २०२०-२१ किंवा २०२१-२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेला असावा.

९. नवोपक्रम अहवाल शब्द मर्यादा ४००० ते ५००० असावी. फाईलमध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त ५ फोटोंचा समावेश अहवाल लेखनात करावा.

१०. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना त्यामध्ये १०० शब्द मर्यादेत नवोपक्रमाचा संक्षिप्त सारांश लिहिणे आवश्यक आहे.

११. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना स्पर्धकाने स्वत:चा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा. नवोपक्रम फाईल PDF MS WORD स्वरूपात जोडावी. PDF फाईल ५. MB पेक्षा जास्त नसावी.

१२. स्पर्धकाने आपल्या नवोपक्रमाशी निगडीत इतरांना उपयुक्त होईल असा व्हिडिओ अथवा youtube वर असलेली लिंक नवोपक्रम स्पर्धेच्या लिंकवर विहित ठिकाणी नोंदवावी.

१३. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ साठी स्पर्धकांनी आपले नवोपक्रम

http://innovation.scertmaha.ac.in या लिंकवर दि. १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अपलोड करावेत.

 

१४. जिल्हास्तर, विभाग स्तर व राज्यस्तरावर प्रथम १० क्रमांकांच्या स्पर्धकांना आपापल्या नवोपक्रमाचे

सादरीकरण करणे बंधनकारक असेल.

१५. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत पारितोषिके व उत्तेजनार्थ बक्षीसपात्र स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रम

अहवालाची एक प्रत संशोधन विभागाकडे कार्यक्रमाच्यावेळी सादर करणे बंधनकारक राहील.

प्रतिज्ञापत्र

नवोपक्रम-Innovation-Competition-Year-2021-2022

नवोपक्रम-Innovation-Competition-Year-2021-2022

नवोपक्रम अहवालाचे मूल्यांकन :

नवोपक्रम स्पर्धेचे मूल्यांकन प्रत्येक स्तरावर दोन फेरीमध्ये केले जाणार आहे. जिल्हा व विभाग स्तरावर द्वितीय फेरी ही पहिल्या फेरीत गुणानुक्रमे पहिल्या १ ते ७ क्रमांकासाठी तर राज्यस्तरावर पहिल्या फेरीतील गुणानुक्रमे पहिल्या १ ते १० क्रमांकासाठी राबविण्यात येईल.

नवोपक्रम-Innovation-Competition-Year-2021-2022

जिल्हास्तर व प्रादेशिक विद्या प्राधिकरण स्तरावर प्रथम फेरीत नवोपक्रम अहवालांचे मूल्यांकन करून प्रथम १ ते ७ क्रमांकावर असलेल्या नवोपक्रमांचे सादरीकरण कार्यालयात करून द्वितीय फेरीत मूल्यांकन करण्यात येईल. द्वितीय फेरीतील गुणांच्या आधारावरच जिल्हा व विभाग प्रथम पाच क्रमांक निर्धारित करण्यात येऊन तेच पुढे राज्यस्तरावर पाठविण्यात येतील.

(टीप: मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी या स्पर्धेचे पाच ही गटाचे मूल्यमापन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई या स्तरावर करण्यात येईल.)

नवोपक्रम अहवालाचे जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर मूल्यांकन पुढील निकषांच्या आधारावर करण्यात येईल. स्पर्धेचा निकाल सर्वस्वी परीक्षकांवर अवलंबून राहील.

नवोपक्रम-Innovation-Competition-Year-2021-2022

राज्यस्तरावर वरीलप्रमाणेच नवोपक्रम अहवालावरून प्रथम फेरीतील गुणांच्या आधारे प्रत्येक गटातील १० उत्कृष्ट नवोपक्रम काढण्यात येतील. त्या स्पर्धकांना नवोपक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी बोलविण्यात येईल द्वितीय फेरीतील गुणांच्या आधारे पाच गुणानुक्रम व पुढील पाच उत्तेजनार्थ क्रमांक निश्चित करण्यात येतील.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची कार्यवाही :

 

पहिला टप्पा :

अ) जिल्हास्तरावरील पुरस्कार - पूर्व प्राथमिक गट, प्राथमिक गट, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील प्रथम पाच क्रमांकामधील ज्यांना ७५ % पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले त्यांचे नवोपक्रम पुढे SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले जातील. त्यामुळे केवळ उत्कृष्ट नवोपक्रम राज्यस्तरावर येण्यासाठी उपयोग होईल. तसेच प्रथम पाच क्रमांकांना जिल्हास्तरावर पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.

आ) विभागस्तरावरील पुरस्कार- विषय सहायक व विषय साधन व्यक्ती तसेच अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी यांचे नवोपक्रम प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या लिंकवर जातील व त्यामधून प्रत्येक गटातील प्रथम पाच क्रमांकामधील ज्यांना ७५ % पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले त्यांचे नवोपक्रम पुढे SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले जातील. तसेच प्रथम पाच क्रमांकांना जिल्हास्तरावर पारितोषिक व

(टीप: मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी या स्पर्धेचे पाच ही गटाचे मूल्यांकन प्रादेशिक विद्या

प्राधिकरण, मुंबई या स्तरावर करण्यात येईल)

प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.

दुसरा टप्पा :

राज्यस्तरावरील पुरस्कार

नवोपक्रम अहवाल लेखन व नवोपक्रम सादरीकरण या आधारित पुढील पाच गटातील पारितोषिकांचे वितरण केले जाईल.

नवोपक्रम-Innovation-Competition-Year-2021-2022

नवोपक्रम बँक :

राज्य स्तरावर पुरस्कार प्राप्त सर्व नवोपक्रमांचा तसेच जिल्हा व विभाग स्तरावरील प्रत्येक गटातील गुणानुक्रमे पहिल्या पाच नवोपक्रमांचा समावेश राज्याच्या नवोपक्रम बँक (Innovation Bank) मध्ये करण्यात येईल. हे नवोपक्रम SCERT, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या वेबसाईट वर Innovation Bank मध्ये प्रसिध्द करण्यात येतील.

नवोपक्रम लेखन मार्गदर्शक व्हिडिओ- 



महत्वाच्या लिंक - 
1) नवोपक्रम वेबसाईट http://innovation.scertmaha.ac.in 
2) प्रतिक्षापत्र - http://innovation.scertmaha.ac.in/DLDocs/PramanPratidnya.pdf 
3) माहितीपत्रक -  http://innovation.scertmaha.ac.in/DLDocs/MahitiPatrak2021.pdf 
4) राज्यस्तरीय नवोपक्रम अहवाल लेखन मार्गदर्शन कार्यशाळा

सहभागी होण्यसाठी लिंक - 

    पूर्व प्राथमिक गट -  क्लिक करा
    प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गट - क्लिक करा 
    मा.,उच्च मा. शिक्षक व मुख्याध्यापक गट  क्लिक करा 
    विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती गट क्लिक करा 
    अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या