Google Teacher Training 2021 Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom.MH Webinar- Feedback
Google Teacher Training 2021 Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom. Day 1 & Day 2 Assessment Form
Google Teacher Training Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom.
राज्यातील सर्व शिक्षकांनी गुगल क्लासरूम प्रशिक्षण 2022
कोरोना मुळे राज्यातील मुलांचे शिक्षण सध्या होऊ शकत नाही. अशा परीस्थितीमध्ये मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षकामार्फत केला जात आहे. वेगवेगळे टूल वापरून मुलांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात शिक्षकांना मदत व्हावी या उद्देशाने पुन्हा एकदा गुगल मार्फत ऑनलाईन Google Teacher Training स्वरूपामध्ये गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे या बाबतचे परिपत्रक नुकतेच निर्गमित करण्यात आलेले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध माध्यमांचा वापर केला गेला. यानुसार संदर्भ क्रमांक २ अन्वये प्रथम टप्प्यामध्ये राज्यातील एकूण ४०,००० शिक्षकांना ऑनलाईन स्वरूपामध्ये गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. तरी दैनंदिन अध्यापनामध्ये विविध डिजिटल टूल्सचा प्रभावी व यशस्वी वापर शिक्षकांना करता येणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे व विद्यार्थ्याना शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा •यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे "Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom" या विषयावरील दोन दिवसीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दिनांक २३ व २४ डिसेंबर, २०२१ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. सदरच्या वेबिनारमध्ये अध्यापनासाठी उपयुक्त अशा गुगल टूल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षण दिनांक | प्रशिक्षण लिंक | २३ डिसेंबर, २०२१
(दिवस पहिला) प्रशिक्षण वेळ दुपारी ३:०० ते ५:००
प्रशिक्षण दिनांक | प्रशिक्षण लिंक २४ डिसेंबर, २०२१
(दिवस दुसरा) दुपारी ३:०० ते ५:००
दोन दिवसीय गुगल क्लासरूम प्रशिक्षणासाठी संदर्भ क्रमांक ३ अन्वये राज्यातील एकूण ८०,०६९ शिक्षकांनी आपली नावनोंदणी केलेली आहे. सदरच्या नोंदणी केलेल्या शिक्षकांना G suit आय.डी. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत SMS द्वारे तसेच जिल्ह्यास PDF च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी प्रशिक्षणादरम्यान व नंतर च्या कालावधीमध्ये आवश्यक प्रात्यक्षिक कामकाज प्रशिक्षणार्थी यांनी सदरच्या G suit आय. डी. चा वापर करून करावे. सदरचा G suit आय. डी. व पासवर्ड संबंधित प्रशिक्षणार्थी याने जतन करून ठेवण्याबाबत सूचित करण्यात यावे. तसेच प्रशिक्षण सत्रांच्या व उत्तर चाचणी पूर्ततेनंतर आपणास प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त होईल याची नोंद घ्यावी.
Day 1 & Day 2 Assessment Form
खालील लिंकवर क्लिक करून Assessment सोडवा.
सूचना- MH Webinar- Feedback भरताना गुगल मार्फत देण्यात आलेला आयडी वापरून आपण हा MH Webinar- Feedback भरावा . उदा- गुगल आयडी \ असा असेल त्याचा वापर करून आपण ही MH Webinar- Feedback भरावा
0 टिप्पण्या