Sanch Manayata 2021/22 संचमान्यता 2021-22 माहिती कशी भरावी.
संचमान्यता Sanch Manayata सन २०२१-२२ बाबत नुकतेच संचालक यांचे पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. त्यानुसार आपणास सन २०२१-२२ ची संचमान्याता पूर्ण करण्यासाठी आपल्या संचमान्याता Sanch Manayata लॉगिनवरून आपल्या शाळेची माहिती ज्यामध्ये शिक्षक माहिती व शिक्षकेत्तर कर्मचारी माहिती भरून पुढे पाठवायची आहे. या आगोदर आलेल्या सूचनेनुसार आफण मागील वर्षीची संचमान्याता Sanch Manayata पूर्ण करून घेतलेली आहे. नवीन सूचनेनुसार आपणास आता सन २०२१-२२ ची संचमान्याता Sanch Manayata माहिती अपडेट व फायनलाईझ करावयाची आहे. आपण संचमान्यता पोर्टल Sanch Manayata Portal ला लॉगिन केल्यानंतर त्या संदर्भातील सूचना देखील देण्यात आलेली आहे.
सन २०२१-२२ च्या संच मान्यतेसाठी दि १.१.२०२२ रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉगिन करून Working Post या मेनूमध्ये Add Working Teaching Post क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून update व Finalize पूर्ण करून त्यानंतरच Add Working Non Teaching Post ची नोंद पूर्ण करावी.
प्राथमिक शिक्षण संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, डॉ. अॅनी बेझंट रोड, मध्यवर्ती इमारत, पुणे १ email: depmah2@gmail.com
दुरध्वनी (०२०) २६०५४३१८
महत्वाचे
प्रति,
website
school.maharashtra.gov.iry क्र. संकीर्ण/संच मान्यता/२०२२/८-५०० 256
दिनांक जानेवारी, २०२२
१. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग २. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा
परिषद, सर्व
विषय: संच मान्यता दुरूस्ती बाबत.
संदर्भ : १. संचालनालयाचे सम क्रमांक २७.०८.२०२१ चे पत्र
वरील विषयाबाबत संदर्भाधीन पत्रान्वये शासन पत्र दिनांक १४.०६.२०२९ अन्वये
विद्यार्थ्याचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण व संच मान्यताबाबत शासन पत्रातील
निर्देशानुसार सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निर्देशित करण्यात आले आहे.
संच मान्यता दुरूस्ती प्रस्तावासंदर्भात आपण शाळानिहाय आधारकार्ड नोंदणी झालेली
आहे किंवा कसे तसेच झालेली असल्यास या शैक्षणिक वर्षातील आधार नोंदणीची माहिती
टक्केवारीमध्ये संचालनालयास सादर करावी. तसेच सन २०१९-२० व २०२०-२१ च्या संच
मान्यता संदर्भात शिक्षक व शिक्षकेतर चा working data भरलेला नसल्यामुळे संच मान्यता जनरेट होत नसल्याने आपण आपल्या स्तरावरून
ज्या शाळांनी working data भरलेला नाही त्या शाळांना working
data भरण्याबाबत निर्देश देण्याबाबत कळविण्यात आलेले होते.
शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ च्या संच मान्यता संदर्भात शिक्षक व शिक्षकेतर चा working data भरण्याकरीता टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला असून
आपण आपल्या विभागातील व जिल्हयातील सर्व शाळांना आपल्या स्तरावरून माहिती
भरण्याबाबत अवगत करावे. कोणतीही शाळा वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी,
(महेश
पालकर)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
१
प्रत: मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण
आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
यांना माहितीस्तव सादर
संचमान्यता 2021-22 माहिती कशी भरावी.
१) सर्वप्रथम School
(www.maharashtra.gov.in) ही वेबसाईट ओपन करा.
२) वेबसाईट ओपन झाल्यानंतर Sanchmanayata Tab वर
क्लिक करून आपल्या शाळेचा युझर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
३) लॉगिन झाल्यानंतर प्रथम आलेल्या सूचनांचे वाचन करा. व ओके बटनवर क्लिक करा.
३) त्यानंतर Working Post Tab वर क्लिक करून प्रथम Teaching Staff या Tab या Tab वर क्लिक करा.
४) त्यानंतर आपल्या शाळेचे माध्यम निवडून 01/01/2022 रोजी कार्यरत असलेल्या
शिक्षक कर्मचाऱ्यांची माहिती भरून प्रथम अपडेट करावे.
५) माहिती अपडेट झाल्यानंतर फानलाईझ करावी. तथपूर्वी माहिती बरोबर असल्याची
खात्री करावी.
६) Teaching Staff या Tab ची माहिती भरल्यानंतर Working Staff Non Teaching या टॅब वर क्लिक करून शिक्षकेत्तर कर्मचारी माहिती भरावी.
७) माहिती भरून प्रथम ती अपडेट करावी व नंतर फानलाईझ करावी. अशाप्रकारे आपली संचमान्यता माहिती भरून पूर्ण करावी.
0 टिप्पण्या