Ticker

6/recent/ticker-posts

National Initiatives for School Heads and Teachers Holistic Advancement (NISHTA) निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षण

 National Initiatives for School Heads and Teachers Holistic Advancement (NISHTA) निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षण

राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत चे नियजन झाले असून असे प्रशिक्षण शासकीय व अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांना दिक्षा वरून दिले जाणार आहे त्या संबंधातील पत्रक नुकतेच निर्गमित करण्यात आलेले आहे. यामध्ये शिक्षकांना प्रशिक्षण करून प्रमाणपत्र प्राप्त करण्याची संधी आहे.

निष्ठा ३.०-NISHTHA-Nishtha-Teacher-Training


महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र

७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०

संपर्क क्रमांक (०२०) २४४७६९३८

E-mail: itdept@maa.ac.in

जा.क्र.राशैसंप्रथम / आय.टी./NISHTHA FLN प्रशिक्षण / २०२१/४३८१ मार्फत निर्गमित करण्यात आलेले पत्रक प्रथम पाहू त्यानंतर हे प्रशिक्षण विषयी माहिती पाहणार आहोत.

विषय :- राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत...

 

संदर्भ : १. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे प्रशिक्षण आयोजनाबाबतचे पत्र दि. १३ जुलै, २०२१

 

शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेमार्फत निष्ठा (National Initiatives for School Heads and Teachers Holistic Advancement) या एकात्मिक प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक २१ ऑगस्ट, २०१९ रोजी करण्यात आली. यानुसार प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण सन २०२० - २०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले. सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन निष्ठा २ प्रशिक्षण हे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी सुरु आहे. सद्यस्थितीमध्ये दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येत आहे.

 

सद्यस्थितीमध्ये देशातील कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर देशामधील प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA ३.० FLN (National Initiative For School Head's and Teachers Holistic Advancement) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण १२ घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा समावेश असणार आहे. ते खालील प्रमाणे, सामान्य अभ्यासक्रमावर आधारित

 

NISHTHA अभ्यासक्रम- 

१. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची ओळख.  

२. क्षमताधिष्ठीत शिक्षणाकडे वाटचाल. 

३. अध्ययनार्थ्यांचे आकलन: मुल कसे शिकते? 

४. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात पालकांचा व समाजाचा सहभाग 

५. विद्याप्रवेश आणि बालवाटीकेचे आकलन

६. पायाभूत भाषा आणि साक्षरता,

७. प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण ८. अध्ययन मुल्यांकन

९. पायाभूत संख्याज्ञान

१०. अध्ययन अध्यापन व मुल्यांकनामध्ये माहिती व तंत्रज्ञाचा वापर

११. शालेय शिक्षणातील पुढाकार  

१२. खेळणीधारित अध्यापनशास्त्र

एकूण १२ सामान्य अभ्यासक्रमावर आधारित घटकसंचाचे (मोड्यूल्स) चे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे. यामध्ये सदरचे सामान्य अभ्यासक्रमावरील प्रत्येक घटकसंच (मोड्यूल) हे ३ ते ४ तासाचे असणार आहे.

 

NISHTHA प्रशिक्षण सुचना खालीलप्रमाणे,

सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून घेतले जाणार असल्याने सर्व

१) शिक्षकांनी DIKSHA अॅपवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.

२) DIKSHA अॅपवर नोंदणी करणेसाठी https://youtu.be/LFmisU-nk E या लिंकवर क्लिक करून मार्गदर्शनपर व्हिडीओ पाहू शकता.

३)  सदरच्या प्रशिक्षणामध्ये प्रत्येक ३० दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण सामान्य अभ्यासक्रमवार आधारित ४ व दिनांक ०१ एप्रिल २०२२ पासून सदरचे सर्व १२ कोर्सेस (मोड्यूल्स) पुन्हा उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

४) शिक्षकांसाठी सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम हा मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषेमध्ये उपलब्ध होणार आहे.

५)  सदरच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये DIKSHA अॅपवर दर ३० दिवसांसाठी एकूण ४ मोड्यूल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचे सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेले आहे.

ऑनलाईन नोंदणी व लॉगीन तसेच इतर शंका दूर करण्यासाठी आवश्यक सर्व व्हिडीओ देखील पत्रासोबत देण्यात आलेले आहे. तसेच सदरच्या प्रशिक्षणासाठीची ऑनलाईन नोंदणी असणे आवश्यक आहे. तसेच दिनांक ०१ जानेवारी, २०२२ पासून सदरच्या प्रशिक्षणास सोबतच्या वेळापत्रकानुसार सुरुवात होत आहे.

सदर प्रशिक्षणासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत असून ज्यांनी यापूर्वी प्रत्यक्षामधील निष्ठा प्रशिक्षण तसेच ऑनलाईन स्वरुपामधील प्रशिक्षण यामध्ये काम केले आहे. अशा प्रती जिल्हा २ SRP यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती संदर्भ क्रमांक ३ नुसार करण्यात आलेली आहे.

तसेच कार्यरत आय. टी. विषय सहायक यांना तांत्रिक कामाची जबाबदारी सोपविण्यात याकरिता आवश्यक सविस्तर उद्बोधन आयोजित करण्यात येईल. आलेली आहे.

याचबरोबर सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र हे जो प्रशिक्षणार्थी कोर्स वर आधारित मुल्यांकनामध्ये किमान ७०% गुणांकन प्राप्त करेल अशाच प्रशिक्षणार्थ्यास प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहे, याची नोंद घ्यावी.

तसेच वेळापत्रकानुसार उपलब्ध करून देण्यात आलेला कोर्सेस (मोड्यूल्स) ला सर्व प्रशिक्षणार्थी यांनी जॉईन करून ठेवणे गरजेचे आहे. विहित ३० दिवसांच्या मुदतीच्या ५ दिवस पूर्वीस प्रशिक्षणार्थी कोर्स (मोड्यूल) जॉईन करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.

तरी उपरोक्त मुद्यांच्या अनुषंगाने ऑनलाईन स्वरूपामध्ये निष्ठा प्रशिक्षण DIKSHA अॅपच्या माध्यमातून प्राथमिक शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गाना अध्यापन करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक यांनी पूर्ण करावे यासाठी सर्व शाळा व शिक्षकांना याबाबत अवगत करण्यात यावे. तसेच आवश्यक कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी, जेणेकरून राष्ट्रीय स्तरावरील सूचनांप्रमाणे निर्धारित वेळेमध्ये सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे शक्य होईल.

वेळापत्रक


NISHTHA प्रशिक्षण Link- 

०१ जानेवारी, २०२२ ते ३० जानवेारी, २०२२ 

माध्यम  

कोस स

क्रमांक

लिंक  

 

 

मराठी

 

https://diksha.gov.in/search/Library/1?key=31344141536146227211 508&selectedTab=all

 

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_31344143411389235 21847&selectedTab=all  

 

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_313441691153014784198 6&selectedTab=all  

 

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_31344180935132774 412014&selectedTab=all  

 

 इग्रंजी

 

https://diksha.gov.in/search/Library/1?key=31344170262727065611 643&selectedTab=all  

 

https://diksha.gov.in/search/Library/1?key=31344170447301017611 665&selectedTab=all  

 

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_313441705728868352116 85&selectedTab=all

 

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_313441706870300672110 01&selectedTab=all

 

 

हिंदी

 

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_31344170817619558 411027&selectedTab=all  

 

https://diksha.gov.in/search/Library/1?key=_3134417094370918401 1707&selectedTab=all  

 

https://diksha.gov.in/search/Library/1?key=31344171066992230411 727&selectedTab=all  

 

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_31344177266265292 811249&selectedTab=all  

 

 उर्दू

 

https://diksha.gov.in/search/Library/1?key=31344171267623321611 049&selectedTab=all  

 

https://diksha.gov.in/search/Library/1?key=31344171434862182411 071&selectedTab=all  

 

https://diksha.gov.in/search/Library/1?key=_3134417156409999361 1749&selectedTab=all  

 

https://diksha.gov.in/search/Library/1?key=31344171680132300811 091&selectedTab=all  

NIshtha Teacher Training  

प्राथमिक शिक्षकांसाठी



NIshtha Teacher Training  

माध्यमिक शिक्षकांसाठी 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या