Ticker

6/recent/ticker-posts

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ परीक्षार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ०४कोविड- १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२परीक्षार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ०४ कोविड- १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ आयोजित करण्यात येणार आहेत अशा परीक्षा देत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत.

इ.१२ वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२परीक्षार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना

लेखी परीक्षा

१. लेखा परीक्षा विद्याथ्र्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातच घेण्यात येईल. १५ पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये एकत्र करून परीक्षा घेण्यात येईल. एखादा विद्यार्थी आरोग्यविषयक कारणामुळे परीक्षेस गैरहजर राहिल्यास अशा गैरहजर विद्यार्थ्यांना मंडळामार्फत आयोजित पुरवणी परीक्षेस प्रचलित पध्दतीने प्रविष्ट होता येईल.

२. मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि. ०४/०३/२०२२ ते दि. ३०/०३/२०२२ या कालावधीत प्रचलित पध्दतीने (ऑफलाईन) आयोजित करण्यात आलेली आहे. 

३. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्यकाविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह शाळा उशीराने सुरू झालेल्या आहेत. तद्नंतर काही ठिकाणी त्या वेळोवेळी बद ठेवाव्या लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखानाचा सराव पुरेसा होऊ न शकल्यामुळे लेखी परीक्षेतील पेयरचा वेळ या परीक्षेला ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे व ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वाढविण्यात आला असून त्यानुसार अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलेआहे.

४. या जादा बेळेव्यतिरिक्त पात्र दिव्यांग विद्यार्थ्यासाठी असलेल्या जादा वेळेसह इतर सर्व सुविधा व सवलती कायम राहतील. (उदा. तीन तासाच्या पेपरसाठी या परीक्षेला ३ तास ३० मिनीटे देण्यात आलेली आहे. या बळव्यतिरिक्त पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सदर तीन तासांच्या पेपरसाठी ६० मिनीटे प्रचलित जादा बेळेची सवलन देय राहील.)

५. सदर लेखी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना २५ टक्के कपात केलेला अभ्यासक्रम वगळून उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा दयावी लागणार आहे.

६. परीक्षा संचालनाची संपूर्ण जबाबदारी केंद्रसंचालक/ उपकेंद्रसंचालक म्हणून नियुक्त केलेल्या संबंधित घटकांची / उच्च माध्यमिक शाळा वा कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची राहील,

७. परीक्षा केंद्रावर येणाऱ्या सर्व घटकांनी कोविड-१९ विषाणु प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाच्या आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.

 

८. १२ वी परीक्षा सकाळ सत्रात १०.३० वाजता व दुपार सत्रात ३.०० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे परीक्षाथ्र्यांनी Thermal Screening साठी परीक्षेच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी किमान एक ते दीड तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना प्रवेश देताना प्रथम परीक्षार्थ्यास सर्व घटकाचे Thermal Screening द्वारे तापमान मोजण्यात येईल.

९. विद्यार्थ्याचे पमान तपासल्यानंतर प्रत्यक्ष पेपरच्या वेळेपूर्वी किमान ३० मिनिटे अगोदर आपल्या निर्धारित परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्थानापन्न होईल असे पहावे. प्रत्यक्ष लेखी परीक्षा सुरु होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येईल.

१०. परीक्षा केंद्रामध्ये पिण्याच्या पाण्याची व सॅनिटायझारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तथापि, अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात येताना स्वतःची पाण्याची बाटली व सॅनिटायझरची छोटी बाटली सोबत ठेवावी. तसेच मास्क व लेखन साहित्य (उदा-पेन, पेन्सिल, कपास इ.) सुध्दा स्वतःसोबत आणणे आवश्यक राहील. परीक्षार्थी/ विद्यार्थ्याने एकमेकांचे पेन, पेन्सिल बापरु नये,

११. परीक्षेपूर्वी वा परीक्षेदरम्यान एखादया परीक्षार्थ्यास कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने त्रास झाल्यास व त्याची परीक्षा देण्याची इच्छा असल्यास परीक्षार्थ्याच्या संमतीने त्याची परीक्षा केंद्रात स्वतंत्र कक्षात बैठक व्यवस्था करण्यात येईल.

१२. कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी म्हणून परीक्षा केंद्र उपकेंद्राजवळील शासकीय आरोग्य केंद्रामार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागाला विनंती करण्यात यावी.

१३. परीक्षेदरम्यान दोन विद्याथ्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवून बैठक व्यवस्था झिगझॅग (Zig-Zag) पध्दतीने करण्यात येईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी निर्धारित बैठक व्यवस्थेचे पालन करुन परीक्षा दयावी तसेच शारीरिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी.

१४. कीविड १९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण-तणाव कमी करण्याच्या अनुषंगाने विद्यार्थी, पालक संबंधित घटक यांच्या शंकांचे निरसन व मार्गदर्शन करण्यासाठी राज्यमंडळ व विभागीय मंडळ स्तरावर स्वतंत्रपण नियंत्रण कक्ष / हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच राज्यमंडळ व विभागीय मंडळ स्तरावर समुपदेशकही नेमण्यात आलेले आहेत.

१५. प्रत्येक पेपरच्या वेळी परीक्षा केंद्र/ उपकेंद्रात प्रवेश करतांना व पेपर संपल्यावर बाहेर जातांना विद्याथ्र्यांनी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आरोग्यविषयक सर्व सूचनांचे पालन करावे.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या