सेतू अभ्यासक्रम नंतर विद्यार्थ्यांची अध्ययनस्थिती तपासली जाणार
इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास Setu abhyas तयार करण्यात आलेला होता.स दर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमतांवर आधारित होता.
पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) होता यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या होत्या. तसेच सदर अन्यास मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला होता.सदर पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या Setu abhyas अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्याथ्र्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या होत्या.पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित होत्या. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयं अध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप होते. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत. सेतू अभ्यासातील विषयनिहाय
कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले होते.
विषय: सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासणेबाबत...
संदर्भ : या कार्यालयाने पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/ संशोधन/सेतू अभ्यास/ २०२२-२३/२९०४, दि. १७/०६/२०२२
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत राज्यातील विद्यार्थ्यांचे अध्ययन क्षय भरून काढण्यासाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी संशोधन विभागामार्फत संशोधन हाती घेण्यात आले आहे. याकरिता राज्यातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याच्या संदर्भात इयत्ता २ री ते १० वी या इयत्तेतील विद्यार्थ्यांची सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी पूर्वीची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी सर्व्हे लिंकच्या माध्यमातून पूर्व चाचणीद्वारे माहिती संकलन करण्यात आलेली आहे. त्यानुसार या संशोधनासाठी सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासणे आवश्यक आहे.
त्यासाठी खालील सर्व्हे लिंकमध्ये देण्यात आलेल्या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपल्या अधिनरथ वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित शिक्षण तज्ज्ञ व विशेष शिक्षक यांच्या सहकार्याने सोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे विद्याथ्यांची माहिती संकलित करण्यात यावी. तसेच यापूर्वी पूर्व चाचणीमध्ये ज्या विद्यार्थ्यांकडून प्रश्नावली सोडवून घेण्यात आली होती, त्याच विद्याथ्र्यांची उत्तर चाचणी सोडवून घेण्याविषयी अवगत करावे. सदर संशोधन है कालमर्यादित असल्याने पुढील नियोजनाप्रमाणे https://www.research.net/r/ Bridgecours22 या लिंकद्वारे विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात यावी.
अंमलबजावणी कालावधी उत्तर चाचणी-
राज्यातील शाळा (विदर्भ वगळून) दि. २७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२२ (८ दिवस)
विदर्भातील शाळा- दि. ११ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२२ (८ दिवस)
वर नमूद केलेले अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या स्तरावरून यासंदर्भात आदेशित करावे. तसेच आपल्या स्तरावरून याबाबतचा आढावा घ्यावा. आपल्या अधिनस्थ अधिकारी व कर्मचारी यांनी किती विद्यार्थ्यांची माहिती
संकलित केली याबद्दलचा गोषवारा संशोधन विभागाच्या researchdenter.maa.ac.in या ई-मेलवर पाठविण्यात यावा. याबाबतच्या आवश्यक मार्गदर्शक सुचना सोबत जोडण्यात आलेल्या आहेत.
पत्रक लिंक - क्लिक here

0 टिप्पण्या