निपुण भारत अभियान केंद्रस्तरीय शिक्षक उद्बोधन सत्र National Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy - NIPUN Bharat
निपुण भारत अभियान केंद्रस्तरीय शिक्षक उद्बोधन सत्र आयोजित करणेबाबत. संदर्भ :- १. भारत सरकारच्या National Initiative For Proficiency In Reading with Understanding And Numeracy (NIPUN BHARAT) अंतर्गत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. NIPUN BHARAT निपुण भारत बाबत करण्यात आलेल्या सूचना कोणत्या आहेत. याविषयी माहिती पाहू या.
निपुण भारत अभियान केंद्रस्तरीय शिक्षक उद्बोधन सत्र आयोजित करणेबाबत. संदर्भ :-
१. भारत सरकारच्या National Initiative For Proficiency In Reading with Understanding And Numeracy (NIPUN BHARAT) अंतर्गत मार्गदर्शक सूचना
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण - २०२१/ प्र.क्र. १७९ / एसडी - ६ दि. २७.१०.२०२१
३. प्रस्तुत कार्यालयाचे जा.क्र. राशैसंप्रपम / गवि / FLN/२०२१-२२/१५६, दि. १०.०१.२०२२ चे पत्र
४. भारत सरकार शिक्षा मंत्रालयाचे D.O.No.01-02/2022-15-13 दि. ०७.०३.२०२२ चे पत्र
५. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे जा.क्र.मप्राशिप/सशि/निपुण भारत / २०२२-२३/१५५७, दि. २७.०५.२०२२ पत्र
केंद्रस्तरावरून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील बालकांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान [Foundational Literacy & Nurneracy (FLN) ] यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. त्यासाठी केंद्रशासनामार्फत ५ जुलै २०२१ रोजी निपुण भारत अभियान सुरू करण्यात आले आहे. निपुण भारत अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित होण्यासाठी राज्यात विविध उपक्रम / कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
निपुण भारत अभियानाबाबत मुख्याध्यापक, शिक्षक तथा पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी यांच्यात जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. या अभियानांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने शिक्षकांना त्यांची भूमिका स्पष्ट होण्यासाठी समूह साधन केंद्रातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांसाठी (इ. १ ते ५ च्या शिक्षकांसाठी) व अंगणवाडी सेविकांसाठी दि. ६ ऑगस्ट २०२२ रोजी निपुण भारत अभियान एक दिवसीय केंद्रस्तरीय शिक्षक उद्बोधन सत्र सोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्यक्षपणे घेण्यात यावे. जिल्हास्तरावरून प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, प्रशासन अधिकारी (मनपा) यांच्या समन्वयाने संपूर्ण नियोजन करावे. निपुण भारत अभियान अंतर्गत केंद्रस्तरीय शिक्षक उद्बोधन सत्र या उपक्रमाच्या पूर्वतयारीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत दि. २९ जुलै २०२२ रोजी दुपारी ३:३० वाजता राज्यस्तरीय ऑनलाइन उद्बोधन बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ऑनलाइन कार्यशाळेसाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व जिल्हे), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, प्रशासन अधिकारी म. न. पा/न. पा, निपुण भारत जिल्हा नोडल अधिकारी यांनी उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून उचित आदेश देण्यात यावेत. सदर ऑनलाईन बैठकीची झूम लिंक आपणास मेलद्वारे कळविण्यात येईल.
केंद्रस्तरीय उद्बोधन सत्रापूर्वी जिल्हास्तरावर तालुकास्तरीय सुलभकांचे तसेच तालुकास्तरावर केंद्रस्तरीय सुलभकांचे प्रत्यक्ष उद्बोधन बैठकीचे आयोजन करावे. सदर बैठकीमध्ये राज्यस्तरावरून करण्यात आलेले मार्गदर्शन तसेच सूचनांचे प्रसारण योग्य पद्धतीने करण्यात यावे. आपल्या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे नियोजन असल्यास त्यासाठी वेगळे नियोजन न करता हेच उद्बोधन सत्र इयत्ता १ ते ५ च्या शिक्षकांसाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद म्हणून गृहित धरावे. इयत्ता ६ ते ८ च्या शिक्षकांसाठी शिक्षण परिषदेबाबत स्वतंत्रपणे सूचना देण्यात येतील. या संदर्भात आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करण्यात यावी ही विनंती.
केंद्रस्तरीय निपुण भारत शिक्षक उद्बोधन सत्राच्या अंमलबजावणी
बाबतच्या मार्गदर्शक सूचना
१) दिलेल्या दिवशी वेळापत्रकाप्रमाणे शिक्षक उद्बोधन सत्राचे आयोजन सर्व केंद्रातून करण्यात यावे. २) या सत्राचे आयोजन केंद्रातील सर्व शाळांना मध्यवर्ती असणाऱ्या शाळेत / सभागृहात करण्यात यावे,
३) आयोजित करण्यात येणान्या शाळा / सभागृहामध्ये सत्रासाठी आवश्यक ध्वनी व्यवस्था / L.C.D सुविधा उपलब्ध असावी.
४) तालुकास्तरावर उद्बोधन सत्राबद्दल ज्या सुलभकांचे सुलमन झालेले आहे त्यांनीच केंद्रस्तरावरील उद्बोधन सत्रांमध्ये मार्गदर्शन करावे.
५) सत्रातील विविध विषयांबद्दल व्याख्यान पद्धतीने मार्गदर्शन करणेऐवजी गट चर्चा / गटकार्य याला प्राधान्य देण्यात यावे.
६) राज्यस्तरावरून FLN च्या अनुषंगाने वितरीत करण्यात आलेले साहित्य शिक्षकांना उद्बोधन सत्रामध्ये प्रत्यक्ष दाखवून त्यावर चर्चा घडवून आणावी. चर्चेतील मुद्द्यांची नोंद घेण्यात यावी.
७) सुलभकांनी www.education.gov.in केंद्रशासनाच्या या संकेत स्थळावर उपलब्ध असणाऱ्या निपुण भारत अभियान मार्गदर्शक सूचनांचे वाचन करावे व त्या आधारे सखोल मार्गदर्शन करण्यात यावे.
८) सदर उद्बोधन सत्रामध्ये विषय सोडून इतर कोणतेही सत्कार समारंभ किंवा अशैक्षणिक कामकाज करण्यात येवू नये.
९) सदर उपक्रमास विविध समाज माध्यमातून योग्य ती प्रसिद्धी देण्यात यावी. त्यासाठी #NIPUNMAHA 22 या हॅशटॅगचा वापर करण्यात यावा.

0 टिप्पण्या