राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून सुधारणा करण्याबाबत
महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक : मभवा-
१३२२/प्र.क्र.८/सेवा-९ मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२ दिनांक
१७ ऑगस्ट २०२२
वाचा - १. शासन निर्णय क्रमांक : ममवा- १३२१/ प्र. क्र. १४/ सेवा-९, दिनांक ३० मार्च, २०२२
२. भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभाग कार्यालयीन ज्ञापन क्रमांक : ५/२/२०२२-इ. (बी), दिनांक ३१ मार्च, २०२२
शासन निर्णय
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून 19 व्या वेतन आयोगानुसार सुधारित चैतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३१ % वरुन ३४ % करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी २०२२ ते दिनांक ३१ जुलै २०१२ या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट, २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
3. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.
यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उम लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा. क्रमांकरमा १३२२/प्र.क्र.८/ सेवा-९
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०८१७१४४४३००४०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
माहे ऑगस्ट, २०२२ चे माहे सप्टेंबर, २०२२ मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करणेबाबत.
महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण २०२२/प्र.क्र.९८/ कोषा - प्रशा ५मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ तारीख: २४ ऑगस्ट, २०२२
वाचा: शासन निर्णय क्रमांक: डिडिओ १००५/प्र.क्र.५/ कोषा प्रशा ५. दि.२९.०८.२००५
शासन परिपत्रक :
गणेशोत्सवाची सुरुवात यावर्षी दि. ३१ ऑगस्ट २०२२ पासून होत आहे. राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना गणेशोत्सव सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा • सामना करावा लागू नये याउद्देशाने माहे ऑगस्ट, २०२२ चे माहे सप्टेंबर २०२२ मध्ये देय होणारे वेतन /निवृत्तीवेतन गणेशोत्सव सणापूर्वी प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
२. उपरोक्त संदर्भीय क्र. १ मधील परिच्छेद १(८) मधील तरतूद शिथील करून असे कळविण्यात येते की, माहे ऑगस्ट २०२२ या महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतनायें प्रदान दि. २९ ऑगस्ट, २०२२ रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ३. यादृष्टीने मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम ७१ च्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम क्र. ३२८ मधील तरतुदी शिथिल करण्यात येत आहेत.
४. वेतन देयकाचे प्रदान विहित कालावधीत होण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी चेतन देयके त्वरीत कोषागारात सादर करावीत.
५. सदर तरतूदी जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषि विद्यापीठे / कृषि विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी/ कर्मचारी, तसेच निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांना देखील लागू होतील.
6. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय तसेच राज्यातील सर्व कोषागारे व उपकोषागारे यांना आवश्यक त्या सुचना तात्काळ निर्गमित कराव्यात.. शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२२/प्र.क्र.१८/कोषा-प्रशा ५ सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२२०८.२४१२३२३२०३०५ असा आहे, हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे.
फरक कसा काढाल -
फरक कसा काढणार ?
अ) सध्याचे मूळ वेतन टाका. (उदा- ४३२००)
ब) आपणास मिळणारी घरभाडे रक्कम टाका.
क) प्रवास भत्ता टाका.
क) जर तुम्ही NPS लाभार्थी असतील तर होय निवडा अथवा नाही हा पर्याय निवडावा
5) शेवटी go वर क्लिक करा.
महागाई फरक काढण्यासाठी येथे क्लिक करा- फरक काढा

0 टिप्पण्या