सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत वेळापत्रक.
जिल्हा
परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे
सुधारित धोरण संदर्भाधीन दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात
आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या सन
२०२२ मधील बदल्या संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. तांत्रिक कारणासह अन्य
कारणास्तव सदर प्रणाली कार्यरत होण्यासाठी काही विलंब झाला आहे. मात्र, आता ऑनलाईनद्वारे बदल्या करण्यासाठीची
कार्यवाही पुर्ण झाली असल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही खालील वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार आहे.
दिनांक :
६:०१ ऑगस्ट, २०२२.
विषय: सन
२०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत वेळापत्रक.
संदर्भ :
ग्रामविकास विभाग, शासन
निर्णय क्र. आंजिब- ४८२०/प्र.क्र.२९१/ आस्था.१४, दिनांक ०७.०४. २०२१
आंतरजिल्हा वेळापत्रक
|
बाब |
दिनांक |
लागणारा कालावधी |
|
जिल्हा परिषद
शिक्षकांचे रोस्टर (बिंदुनामावली) अपलोड करणे. |
२ ते ३ ऑगस्ट २०२२ |
२ दिवस |
|
रोस्टर
(बिंदुनामावली) प्रसिध्द करणे. |
४ ऑगस्ट २०२२ |
१ दिवस |
|
रोस्टर (बिंदुनामावली) शिक्षकांना अवलोकनाकरिता प्रदर्शित करणे.. |
४ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट
२०२२ |
दिवस |
|
जिल्हा परिषद
प्राथमिक शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीकरिता अर्ज
करणे. |
६ ते ९ ऑगस्ट २०२२ |
४ दिवस |
|
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीची कार्यवाही सुरु. |
१० ते १२ ऑगस्ट
२०२२ |
३ दिवस |
|
जिल्हा परिषद
प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीचे आदेश निर्गमीत. |
१३ ऑगस्ट २०२२ |
१ दिवस |
राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे होणाऱ्या आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे राबविण्यात यावी. तसेच सदरची बाब आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांच्या निदर्शनास आणून त्याबाबत संबंधित शिक्षकांकडून पोहोच घ्यावी व आपल्या अभिलेखामध्ये जतन करुन ठेवावी.
(का. गो.
वळवी)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत, माहिती तथा आवश्यक कार्यवाहीस्तव सादर.
१) विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व)
२) श्री.
आयुष प्रसाद (भाप्रसे), मु. का.
अ., जि. प., पुणे तथा अध्यक्ष, जि. प. शिक्षक बदली अभ्यासगट.
३) डॉ. सचिन ओंबासे (भाप्रसे). मु.का.अ., जि.प. वर्धा तथा राज्य समन्वयक, जि.प. शिक्षक बदली ऑनलाईन संगणक प्रणाली.
४) श्री. विनय गौडा (भाप्रसे). मु.का.अ. जि. प. सातारा तथा राज्य समन्वयक, जि.प. शिक्षक बदली ऑनलाईन संगणक प्रणाली.
५) उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व विभाग)
६)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा
परिषद (सर्व)
(७) माहिती व जनसंपर्क संचालनालय यांना प्रसिध्दीसाठी अग्रेषित.
८) सर्व कार्यासने, ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई.
९) Vinsys IT Services (I) Pvt. Ltd, Shivaji Niketan, Tejas Society, Kotharud, Pune.
(१०)
निवडनस्ती कार्यासन आस्था. १४, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई,
परीपत्रक लिंक येथे क्लिक करा.
बदली फॉर्म कसा भरावा-
खालील व्हिडिओ काळजीपूर्व पहा.
संवर्ग १

0 टिप्पण्या