Ticker

6/recent/ticker-posts

Balrakshak Maharashtra App स्थलांतरीत होणाऱ्या कामगारांच्या बालकांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी सर्वेक्षण

 Balrakshak Maharashtra balrakshak app बालरक्षक,बालरक्षक मोबाईल App,maharashtra हंगामी स्थलांतरीत होणाऱ्या कामगारांच्या बालकांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी सर्वेक्षण व त्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणे 

Balrakshakapp मा शिक्षण आयुक्तांच्या कल्पने प्रमाणे, शालेय शिक्षण शिभाग आणि Tata Trusts याांनी संयुक्त विद्यामाने राज्यभरातील स्थलाांतरीत मुले, शाळाबाह्य मुले शिक्षणापासून वंचित मुले याांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बालरक्षक हे Balrakshak Maharashtra App तयार केले आहे. हे App

राज्यपातळिवर तयार केलेल्या SARAL प्रणालीवर हे app काम करेल आणि यातून तयार होणारा data व माहिती SARAL पोर्टलवर राहिल. आजच्या Post Balrakshak Maharashtra App स्थालांतरीत मुलांचे सर्वेक्षण 2022? ‘बालरक्षक’ App कसे वापरावे ? याविषयी माहिती दिली आहे.

Balrakshak-Maharashtra-app-2022

संदर्भ: (१) संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं संकीर्ण / २०२२/५१६/४४८०, दिनांक-२७/१०/२०२२.

(२) दिनांक ०८ नोव्हेंबर २०२२ रोजी मा. आयुक्त शिक्षण यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेली क्षेत्रीय अधिकारी यांची VC द्वारे आढवा बैठक. 

(३) दिनांक १० नोव्हेंबर २०२२ रोजी मा. आयुक्त साखर, पुणे यांचे अध्यक्षतेखाली त्यांच दालनात दुपारी ४.०० वा. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या अनुषंगाने संपन्न झालेली बैठक

उपरोक्त विषयाच्या संदर्भ क्र. १ नुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाने SOP तयार करून पुढील योग्य या कार्यवाहीसाठी आपणास पाठविली आहे. त्यानुसार आपण तसेच आपल्या अधिनस्त सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी यातील सुचनांचे तंतोतंत पालन करून कार्यवाही करावयाची आहे. या बद्दल आपण संबंधितांना तशा सुचना दिल्या असतीलच.

संदर्भ क्र.- २ अन्वये, संबंधित VC मध्ये मा. आयुक्त शिक्षण यांनी उपरोक्त विषयाबाबत काही महत्त्वाच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यात मा. आयुक्त महोदयांच्या कल्पनेप्रमाणे, टाटा ट्रस्ट या संस्थेने व महाराष्ट्र राज्य शिक्षण व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी संयुक्त विद्यमाने SARAL data शो सलग्न असे "बालरक्षक" नावाचे Mobile App विकसित केले आहे. सदरचे App Play Store वर उपलब्ध असून तेथून सदर Mobile App: संबंधित सर्व अधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी त्यांचे Mobile वर load करून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत. या App बाबतची माहिती पुस्तिका (User Manmual) सुलभ संदर्भासाठी तसेच पुढील कार्य होसाठी सोबत जोडली आहे. त्याचा अभ्यास करून त्यानुसार कार्यवाही सुरू करावयाची आहे. तसेच App बाबत काही अडचण उद्भवल्यास टाटा ट्रस्ट या संस्थेचे संबंधित तज्ञ श्री. परेश असून त्यांचा संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९८२२९१४७५१ असा आहे. तरी सदरील App चा अभ्यास करून त्यानुसार कार्यवाही करावी.

संदर्भ क्र. ३ नुसार, मा. आयुक्त साखर, पुणे यांचे अध्यक्षतेखाली त्यांचे दालनात संपन्न झालेल्या ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत मा. आयुक्त शिक्षण यांचे सह राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई. समाजकल्याण आयुक्तालय, कामगार आयुक्तालय तसेच एकात्मिक बालविकास आयुक्तालय यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीत मा. आयुक्त शिक्षण यांनी स्थलांतरील होणान्या चालकांच्या स्थलांतराच्या प्रकारानुसार खालील प्रमाणे तीन प्रकार निदर्शनास आणून दिले आहेत. तरी त्याबाबत करावयाच्या कार्यवाही संदर्भात त्यांनी खालीलप्रमाणे काही व इतर अनुषंगिक सुचना दिल्या आहेत.


 

 

पहिला प्रकार जे विद्यार्थी पालकांसोबत कामाच्या ठिकाणी न येता स्वग्रामीचा राहणार आहेत अशा बालकांसाठी त्यांच्या राहण्याच्या व खाण्याच्या सुविधेची अंमलबजावणी करणे, त्यांना समग्र शिक्षा योजनेंतर्गत लाभ मिळवून देण्याबाबत तत्परतने प्रयत्नशिल असणे तसेच अशा बालका समाजिक न्याय विभागांतर्गत असणारी वसतिगृहे, अनुदानित वसतिगृह, आश्रमशाळा इत्यादी उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्नशील राहणे.

दुसरा प्रकार ने विद्यार्थी स्थलांतरीत पालकांसोबत कामाच्या ठिकाणी न जाता दुसऱ्या गावांमध्ये नातेवाईकांकडे राहणार असल्यास अशा बालकांचा तपास घेऊन त्यांना राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यरत असावे.

तीसरा प्रकार जी बालक पालकांसोबत कामाच्या ठिकाणी आलेले आहेत अशा बालकांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था संबंधित साखर उद्योगांकडून करून घेण्याचा प्रयत्न करावा. अशा सर्व बालकांना शिक्षण हमी कार्ड देण्यात यावे.

इतर अनुषंगिक बाबीसंदर्भात बैठकीत सार्वमताने घेण्यात आलेले निर्णय व सुचना वालरक्षक" नावाचे Mobile App Mobile वर Load करून ज्या गावातून विद्यार्थी स्थलांतरीत होऊन बाहेर ज्या ठिकाणी जिल्ह्यात/तालुक्यात गावात/वाडी वस्तीमधील शाळेत जात असेल अशा विद्यार्थ्याची आगाऊ माहिती असल्यास ती आवर्जून या App च्या सहाय्याने upload करावयाची आहे. 

 तसेच ज्या ठिकाणी विद्यार्थी बाहेरून स्थलांतरीत होऊन येत असेल त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी देखील अशा विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्यांची माहिती आवर्जून सदर App माध्यमातून त्यांची नोंद करणे व त्यांना तत्परतेने शाळेच्या प्रवाहात दाखल करावे. • या बालकांसाठी प्रधानमंत्री घोषण शक्ती निर्माण योजनेची (पूर्वाश्रमीची शालेय पोषण आहार योजना) सुविधा सोपस्करपणे कशी उपलब्ध होईल असे पाहणे.साखर उद्योगांकडून विद्याथ्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था होण्याची खात्री करणे.

स्थलांतरीत बालकांना त्यांच्या पालकांच्या कामाच्या जागेपासून त्यांना दाखल केलेल्या शाळेपर्यंत जाण्यासाठी लागणारा प्रवासखर्च हा जिल्हा वार्षिक योजनेतील एखाद्या योजनेतून (उदा. नाविन्यपूर्ण योजना शाश्वत विकास ध्येयांतर्गत असलेल्या राखीन निधीतून) मिळू शकतो किंवा कसे याबाबत जिल्हा निर्वात अधिकारी यांचेशी संपर्क साधून खात्री करावी. • तसेच कामगार कल्याण, समाज कल्याण, महिला व बालविकास विभाग इत्यादी विविध विभागांशी सर्वेक्षणामध्ये संपकात राहून त्यांचे विभागांकडे उपलब्ध असलेली वसतिगृहे तसेच इतर सुविधा सदर बालकांना कशा उपलब्ध करून देण्यात येतील याबाबत कार्यरत रहावे.

वरील सर्व बाबींचा विचार करून ज्याप्रमाणे नुकताच शालाबाह्य बालकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले. होते, त्याच धर्तीवर या सर्वेक्षणाशी संबंधित शासनाच्या विविध विभागातील अधिकान्यांची संपकांत राहून कार्यवाही करावयाची असून सदरचे काम पूर्णत्वास आणावयाचे आहे.

तर याबाबत सर्व विभागिय शिक्षण उपसंचालक यांना आपल्या अधिनस्त सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) तसेच सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषद मधील संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने आदेशित करावे.

बालरक्षक मोबाईल App कसे वापरावे येथे क्लिक करा.

सर्वेक्षण पत्रक- 

 


 

 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या