OTT Teacher Transfer Portal जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे सुधारीत वेळापत्रक? आपण कधी भरू शकता बदली फॉर्म
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान
पथ,
फोर्ट, मुंबई- ४००००१.दूरध्वनी
क्र. ०२२-२२०२७१०३ E-Mail- est14-rdd@mah.gov.in
क्रमांक, जिपव- २०२२/ प्र.क्र. २९/आस्था-१४ दिनांक १८ नोव्हेंबर २०२२.
प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा
परिषद (सर्व)
विषय: सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत वेळापत्रक.
संदर्भ : १) ग्रामविकास विभाग, शासन
निर्णय क्र. जिप - ४८२०/प्र.क्र. २९०/ आस्था. १४. दिनांक ०७.०४.२०२१.
(२) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र.
जिपव- ४८२०/प्र.क्र.२९० / आस्था. १४. दिनांक
०४.०५.२०२२.
(३) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र.
जिपय- २०२२/प्र.क्र.२९/आस्था. १४, दिनांक २९.०६.२०२२.
४) शासनाचे सनक्रर्माकाचे दिनांक २१.१०.२०२२ चे
पत्र.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत
बदल्यांबाबतचे वेळापत्रक उपरोक्त संदर्भ क्र. ४ नुसार निर्गमीत करण्यात आले आहे.
परंतु प्रशासकीय कारणास्तव दिनांक २९.१०. २०२२ चे पत्र सुधारित करण्यात येत असून
शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत
बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबत सुधारित धोरण दिनांक ०७.०४. २०२१
च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे.
सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिता पदावधीची
परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून २०२२
पर्यंत करण्यास संदर्भ क्र. २ येथील दिनांक ४.५.२०२२ च्या शासन निर्णयान्वये तरतूद
करण्यात आली आहे. तसेच सन २०२२ मध्ये होणान्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या
जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भ क्र. ३ येथील दिनांक २९.६.२०२२ च्या शासन
निर्णयात विहित केलेल्या कालावधीनुसार बदल्यांबाबतची कार्यवाही संगणक
प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. उक्त दिनांक ४.५.२०२२ व दिनांक २९.६.२०२२ च्या
शासन निर्णयानुसार होणारी कार्यवाही फक्त सन २०२२ मध्ये होणान्या बदल्यांकरिताच
लागू राहील.
आता ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक
पुढीलप्रमाणे निश्चित केले आहे :-
राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक
शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे होणाऱ्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही
उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हांतर्गत बदलीच्या
अनुषंगाने करावयाची सर्व कामे विहित कालावधीतच पुर्ण करण्याची दक्षता घ्यावी. जर
सदर कामामध्ये दिरंगाई कुचराई झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई
करण्यात यावी.
सदर वेळापत्रक आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व
प्राथमिक शिक्षकांच्या निदर्शनास आणून त्याबाबत संबंधित शिक्षकांकडून पोहोच घ्यावी
व आपल्या अभिलेखामध्ये जतन करुन ठेवावी.
(उर्मिला जोशी)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
कृतीसुरु होण्याची तारीख संपण्याची तारीख स्थिती
मुख्य कार्यकारी अधिकारी: अवघड क्षेत्रांची यादी प्रकाशित करणे
31/10/2022
02/11/2022
Action Completed
शिक्षण अधिकाऱ्यांनी बदलीपात्र आणि बदली अधिकार पात्र याद्या जाहीर करणे.
11/11/2022
18/11/2022
Action In Process
गट शिक्षण अधिकारी,शिक्षण अधिकारी:
रिक्त पदांची यादी अद्ययावत करणे
11/11/2022
17/11/2022
Action Completed
शिक्षक: विशेष संवर्ग भाग-१ आणि विशेष संवर्ग भाग-२ चे फॉर्म भरणे
18/11/2022
20/11/2022
Action In Process

0 टिप्पण्या