MDM Audit mahiti kashi Bharavi ? प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना ऑडिट माहिती कशी भरावी | MDM Audit mahiti kashi Bharavi ?
विषय:- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतंर्गत
शाळांचे लेखा परिक्षण करणेबाबत. संदर्भ:-१.मा.शिक्षण संचालक प्राथमकि यांचे
पत्र क्र.जा.क्र/प्राशिसं/शापोआ/लेप/
१. उपरोक्त संदर्भिय विषयान्वये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतंर्गत पालघर जिल्हयातील २३७७ शाळांचे लेखा परिक्षण सन २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षाच्या कालावधीतील वैधनिक सनदी लेखापालन शिंदे चव्हाण गांधी अॅन्ड कंपनी, पुणे याच्याकडून पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहे.
२. यासाठी तयार करण्यात आलेल्या माहितीच्या नमुन्यात माहिती शाळा स्तरावरुन संकलित करुन ती वेबसाईटवर भरण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी यांची आहे. वरील संदर्भ क्र. ३च्या बैठकीत मा. शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दि. २५/११/२०२२ पर्यंत सदरची माहिती सादर करण्याचे आदेशित केलेले आहे. ३. त्याप्रमाणे पालघर जिल्हयातील केवळ ७ शाळांची माहिती आज अखेर भरल्याचे दिसून येत आहे. ही बाब गंभीर असून सदरचे काम वेळेत पूर्ण करण्यात यावे. ४. गटशिक्षणाधिकारी यांनी सदरचे फॉर्म शाळांकडून तत्काळ भरुन ते संकेतस्थळावर तत्काळ भरुन घ्यावेत याकरीता तालुकयातील DEO, अधिक्षक शापोआ सह आवश्यक असल्यास अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे. मा. संचालक यांचे आदेशानुसार या कामात दिरंगाई बद्दल जबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी व सदरचे काम विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावे.
MDM Audit Excel File click here


0 टिप्पण्या