शिक्षकाचे वेतन शालार्थ प्रणाली मधून केले
जाते. प्रत्येक महिन्याला प्रथम शाळा लोगिन वरून पगार बिल बनवली जातात. ती तालुका लॉगिनला फॉरवर्ड केले जातात. तालुका
लॉगिन वरून ते जिल्हा लॉगिन ला पाठवली जातात आणि शिक्षकाचा पगार केला जातो. ही झाली शालार्थ ची प्रणाली मात्र काही दिवसापासून शालार्थ प्रणाली
नादुरुस्त आहे. सध्या ती बंद पडली आहे.
साधारणपणे १९ डिसेंबर पासून ती बंद आहे
राज्यातील नगरपालिका जिल्हा परिषद खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक तसेच माध्यमिक
अनुदानित शाळा या सर्वांचे पगार हे शालार्थ प्रणालीतून होत असतात. मात्र ही प्रणाली
सध्या बंद पडल्यामुळे शिक्षकाचे डिसेंबर महिन्याचे पगार होतील की नाही याबाबत शंका
व्यक्त केली जात आहे.
शिक्षकांचे पगार शालार्थ प्रणाली मधून होत
असतात. यासाठी शाळेला जिल्हा पातळीवर शालार्थ प्रणाली द्वारे वेतन बिले सादर करावी
लागतात. मात्र ही प्रणालीच बंद असल्याने शिक्षकाचे डिसेंबरचे वेतन रखडण्याची भीती
व्यक्त केली जात आहे. राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक अनुदानित शाळांतील
शिक्षकांचे वेतन जोपर्यंत शालार्थ प्रणाली सुरू होत नाही तोपर्यंत होणे कठीण आहे.
राज्यातील खाजगी अंशतः व पूर्णतः अनुदानित
प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका
यामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी नोव्हेंबर 2012
पासून शालार्थ प्रणाली सुरू करण्यात आली होती. आणि याच प्रणाली
द्वारे सर्व वेतन बिले जनरेट केली जातात. वेतन अदा केली जातात. नियमित आणि वेळेवर
शिक्षकांचे पगार व्हावे यासाठी या अगोदर वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित करण्यात
आलेले आहेत पत्रक काढण्यात आलेले आहेत तरीही वेतन वेळेवर होत नाही. वेगवेगळे अडथळे
येऊन असे वेतन वेळेवर होत नाही.
शालार्थ शालार्थ वेतन प्रणाली तांत्रिक
बिघाड, अडथळे येऊन ती बंद पडल्याच्या घटना यावेळी या अगोदरही बऱ्याच वेळा
घडले आहेत. या घटना वारंवार घडत असून त्याचा त्रास शिक्षकांना होत आहे.
शालार्थ प्रणाली बंद असल्यामुळे कोणतेही वेतन
दिले जनरेट होत नाहीत त्याला अडचणी निर्माण होतात. त्यातच वेतनबिले तयार करून ती
कोषागृहात सादर करणे व मंजूर करून घेणे आणि बँकांमध्ये निधी जाणे यासाठी बराचसा
कालावधी जातो. त्यामुळे डिसेंबरचं पेमेंट रखली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वेगवेगळ्या शिक्षक संघटना करून ही प्रणाली लवकरात लवकर दुरुस्त करावी आणि शालार्थ
मधून शिक्षकांचे पगार तातडीने करावेत अशी मागणी केली जात आहे.
शालार्थ प्रणालीची दुरुस्ती करून वेतन
काढण्याबाबत शिक्षण विभागाने पावले उचलण्याची मागणी वेगवेगळ्या संघटनांनी केली आहे
शिक्षकाकडून सरल मध्ये आठ दिवसात माहिती भरून घेतली जाते मात्र वेतन प्रणाली
सुधारण्यासाठी इतका कालावधी का लागतो वेळ का लागतो असा प्रश्न वेगवेगळ्या शिक्षक
संघटनाकडून विचारला जात आहे. तेव्हा शिक्षकांचा डिसेंबरचा पगार वेळेत व्हायचा असेल
तर शालार्थ प्रणाली मध्ये झालेला बिघाड दुरुस्त होणे गरजेचे आहे असा बिघाड लवकरात
लवकर दुरुस्त झाला तर आणि तरच शिक्षकांची पदे पगार बिले वेळेवर होतील पगार वेळेवर
होतील.

0 टिप्पण्या