Vaigyanik Pradarshan 2022-23 राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन 2022-23
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे ५० वे राज्यस्तरीय विज्ञान
प्रदर्शन Vaigyanik Pradarshan 2022-23 दिनांक २० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२३ (अंदाजित कालावधी) या दरम्यान ५ दिवस कालावधीचे आयोजित करण्याचे
प्रस्तावित आहे. राज्यस्तरीय प्रदर्शन है ऑफलाईन स्वरुपात घेण्याचे नियोजित
करण्यात आलेले आहे.
विषय: ५० वं राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे अनुषंगाने तालुका व जिल्हास्तरीयःविज्ञान, गणित व पर्यावरण २०२२-२३ आयोजित करणेबाबत.
संदर्भ :- १) एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली, भारत सरकार यांचे दिशानिर्देश २०२२-२३
उपरोक्त संदर्भाकित विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे ५० वे राज्यस्तरीय विज्ञान
प्रदर्शन दिनांक २० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२३ (अंदाजित
कालावधी) या दरम्यान ५ दिवस कालावधीचे आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे.
राज्यस्तरीय प्रदर्शन है ऑफलाईन स्वरुपात घेण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे.
यावर्षी एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली च्या संदर्भीय
दिशानिर्देशान्वये विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय "तंत्रज्ञान आणि खेळणी
" / "प्रद्योगिकी व खिलौने" (TECHNOLOGY AND TOYS) असा
निश्चित केला आहे. सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात
घेवून मुख्य विषयाला अनुसरून पुढीलप्रमाणे एकूण सहा उपविषय निर्धारित केलेले आहेत.
१. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती (Advancement in information and Communication Technology)
२. पर्यावरणास अनुकूल सामग्री (Eco Friendly Materials)
३. आरोग्य आणि स्वच्छता (Health
and Cleanliness)
४. वाहतूक आणि नवोपक्रम (Transport
and Innovation )
५. पर्यावरणीय चिंता ( Environmental Concerns)
६. वर्तमान नवोपक्रमासह ऐतिहासिक विकास (Historical Development with Current Innovation )
७. आमच्यासाठी गणित (Mathematics
For Us)
उपरोक्त उपविषयापैकी कोणत्याही एका उपविषयावर आधारित उच्च
प्राथमिकस्तर (इयत्ता ६ वी ते ८. वी पर्यंत) आणि माध्यमिक व उच्च
माध्यमिकस्तरापर्यतच्या (इयत्ता ९ वी ते १२ वी) शालेय विद्यार्थ्यांकडून
प्रदर्शनीयवस्तु, प्रतिकृती वैज्ञानिक प्रकल्प तयार करण्याचे
अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि खेळण्यांमधील
नवकल्पनांचा समावेश असलेली प्रदर्शनीय वस्तू विकसित करण्याचे स्वातंत्र्य आहे.
सहभाग:
एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली यांच्या संदर्भीय दिशा निर्देशान्वाये या विज्ञान
प्रदर्शनात आपल्या जिल्हयातील सर्व मान्यता प्राप्त शाळेतील पुढील दोन गटातील
विद्यार्थी उच्च प्राथमिकस्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतचे विद्यार्थी) माध्यमिक
व उच्च माध्यमिकस्तर (इयत्ता ९ वी ते १२वीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
या विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि शाळेतील
प्रयोगशाळा परिचर / सहाय्यक यांच्या मदतीने वरील उपविषयापैकी एका उपविषयावर आधारित
प्रदर्शनीय वस्तू / प्रतिकृती / वैज्ञानिक प्रकल्प तयार करणे अभिप्रेत आहे. या
व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना मूळ संकल्पनेवर आधारित कोणताही उपविषय निवडण्याचे
स्वातंत्र्य असेल, जर दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाल्यास
त्याच्यामधून एका विद्यार्थ्यांची निवड करून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी
पाठविण्यात यावे. या दिव्यांग विद्यार्थ्यांजवळ सक्षम अधिकाऱ्यांचे अपंगत्वाबाबतचे
प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
NCERT यांचे उपरोक्त संदर्भीय दिशानिर्देशान्वये राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाकरिता Vaigyanik Pradarshan 2022-23 मूल्यमापनासाठी उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत) माध्यमिक द उच्च माध्यमिकस्तर (इयत्ता ९ वी ते १२ वी) असे दोन गट निश्चित केलेले आहेत.
कोणती काळजी घ्यावी –
विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी
यापूर्वीच्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेले वैज्ञानिक प्रकल्प / प्रदर्शनीय
वस्तूंचे पुन्हा यावर्षीच्या विज्ञान प्रदर्शनात सादरीकरण व पुनरावृत्ती होणार नाही, तसेच INSPIRE Award प्रदर्शनात सहभाग
घेतलेले विज्ञान प्रकल्प / वैज्ञानिक प्रतिकृती तालुकास्तरीय / जिल्हास्तरीय
विज्ञान प्रदर्शनात पुन्हा मांडले जाणार नाहीत, त्याचप्रमाणे
बाजारातून रेडीमेड साहित्य विकत घेऊन विज्ञान प्रदर्शनात सादर करण्यात येणार नाही,
याची दक्षता घ्यावी.
विज्ञान प्रदर्शनात राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा
सहभागी होतील. मान्यता प्राप्त शाळा म्हणजे
(१) शासकीय
(२) माजी शासकीय जिल्हा परिषद
(३) महानगर पालिका/ नगर पालिका/ नगर परिषदेच्या शाळा,
(४) खाजगी
अनुदानित/विना अनुदानित/ कायम विना अनुदानित शासन मान्य
(५) आश्रम शाळा इत्यादी प्रकारच्या शाळा होय. प्रत्येक
शाळेतून वरीलपैकी एका गटात एका वैज्ञानिक प्रकल्पासह फक्त एकच विद्यार्थी सहभाग
घेऊ शकेल.
प्रदर्शन कालावधी
(१) राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाच्या Vaigyanik Pradarshan 2022-23 आयोजनाची पूर्व तयारी म्हणजे तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होय. आपल्या जिल्हयात पुढील कालावधीत प्रदर्शनाचे आयोजन करावे.
विज्ञान प्रदर्शनाचा स्तरसंभाव्य कालावधी
(१) तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक १० डिसेंबर ते १ जानेवारी २०१३
(२) जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक १० जानेवारी
फेब्रुवारी २०२३
(३) राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक (संभाव्य कालावधी) २०
फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२३
२) राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (माध्यमिक
शिक्षकाचे) प्रदर्शन स्पर्धा २०२२-२३ -
दरवर्षीप्रमाणे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरीय शैक्षणिक साहित्य
(माध्यमिक शिक्षक प्रदर्शन व स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत फक्त
माध्यमिक शिक्षक सहभागी होतील माध्यमिक शिक्षक म्हणजे इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत
शिकविणारे शिक्षक या स्पर्धेतून जिल्हास्तरावर एका उत्कृष्ट अशा माध्यमिक
शिक्षकाच्या शैक्षणिक साहित्याची निवड करण्यात यावी.
३) राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (प्राथमिक
शिक्षकांचे प्रदर्शन व स्पर्धा २०२२-२३३- २००६-०७ या वर्षापासून राज्यस्तरावर प्राथमिक शिक्षकांनी तयार केलेल्या गणित
विज्ञान) शैक्षणिक साहित्य प्रदर्शन स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. या चालू
वर्षात राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (प्राथमिक शिक्षकांचे
प्रदर्शन व स्पर्धा २०२२-२३ आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. प्राथमिक शिक्षक
म्हणजे इयत्ता ली ते ८ वी पर्यंत शिकविणारे शिक्षक तरी जिल्हयातील सर्व शाळांना या
प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी या या स्पर्धेतून जिल्हास्तरापर एका उत्कृष्ट अशा
प्राथमिक शिक्षकाच्या शैक्षणिक साहित्याची निवड करण्यात यावी.
४) राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांचे प्रायोगिक
साधनांचे प्रदर्शन व स्पर्धा २०२२-२३- सन
२००६-०७ या वर्षापासून राज्यस्तरावर प्रयोगशाला सहायक परिचर यांनी तयार केलेल्या
गणित विज्ञान वैज्ञानिक उपकरण प्रतिकृतीचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात येत
आहे. यावर्षी राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांचे प्रायोगिक साधनांचे
प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. जिल्हास्तरावर वरील प्रमाणे
प्रदर्शन आयोजित करावे व सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील सहाय्यक परिचर
यांना प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन कराये
निवड प्रक्रिया:
१) विद्यार्थ्याच्या प्रदर्शनीय वस्तु राज्यातील आदिवासी
भाग असलेल्या जिल्हयांनी उच्च प्राथमिक स्वरापर्यंतच्या गटातून (इयत्ता ६ वी ते ८
वी पर्यंत चार (४) माध्यमिक माध्यमिक गटातून (इयत्ता ९ वी ते १२ वी मार (1) अशा एकूण आत प्रदर्शनीय वस्तू आणि नगर आदिवासी जिल्हानी उच्च
प्राथमिक स्तरापर्यंतच्या गटातून इयत्ता ६ वी ते ८ वी पद्यार्थी तीन (३) आणि
माध्यमिक व उच्च ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी तीन (एकूण सहा (६) प्रदर्शनी वस्तूंची
मूल्यमापनाच्या निकषानुसार ४९ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन करावी.
२) जिल्हास्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (इयत्ता
९ वी ते १२ वी ला शिकविणारे माध्यमिक शिक्षक प्रदर्शन या स्पर्धेमधून एका उत्कृष्ट
शैक्षणिक साहित्याची राज्यस्तरीय आध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन करीता
निवड करावी.
३ राज्यस्तरावर अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (इयत्ता
१८ नाशिकविणारे प्राथमिक शिक्षक) प्रदर्शन या स्पर्धेतून एका उत्कृष्ट शैक्षणिक
साहित्याची राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैकि साहित्याची राज्यस्तरीय प्रदर्शन
स्पर्धेसाठी निवड करावी.
(४) जिल्हास्तरावर प्रयोगशाळा सहाय्यक परिचर
यांच्या वैज्ञानिक साधनाच्या प्रदर्शन व स्पर्धेमधून परिचरांच्या एका उत्कृष्ट
वैज्ञानिक साधनांची निवड करावी उपरोक्त ५ से ४ गुरात नमुद केल्याप्रमाणे निवड यादी
शिफारशीसह या संस्थेस पाठवावी.
प्रदर्शनीय वस्तूंची मांडणी प्रदर्शनीय वस्तूंच्या
मांडणीकरीता प्रत्येक गटातील प्रदर्शनीय वस्तूसाठी साधारण 122 cm X 76cm X 274 cm एवढी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी.
विज्ञान प्रदर्शन शाळांच्या इमारती अथवा सर्वजनिक इमारतीमध्ये घेण्यात यावी.
आवश्यक सूचना
1 ) शिक्षणधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांनी जिल्हयातील सर्व शासन मान्यता प्राप्त उच्च प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांना परिपत्रक व पाठविण्याची कार्यवाही करावी परिपत्रक शाळांना उशिरा मिळाल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना विचार करण्यास फार थोडा वेळ शाळांना मिळतो. त्यामुळे परिपत्रक शाळाना लवकरात लवकर पाठवण्यात यावे.
2 ) गणित, विज्ञान व
पर्यावरण प्रदर्शनाबाबतची माहिती प्रसार माध्यमांमार्फत जनसामान्यापर्यंत पोहचवावी
3) तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन तीन (३)
दिवस कालावधीचे नमूद कालावधीतील आयोजित
करावे
4) जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कालावधीत विज्ञानरंजन
कार्यक्रमाचे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे
5) प्रदर्शनाची माहिती प्रसार याशिवाय चित्रपटगृह विडीओ गृह, रेडिओ, टी.सी सिटी केवल द्वारे
प्रसिद्धीला प्रदर्शनाची माहिती ग्रामीण जनतेला विद्यार्थ्यांना शिक्षकांना होण्यासाठी
शिक्षण परिषद चर्चासत्रातून दडीद्वारे देऊन आस्तीत जास्त विद्यार्थ्यांना
प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन करावे विज्ञान प्रदर्शन हे केवळ धारिता राहणार
नाही याची
6) प्रदर्शन वस्तूंची निवड उज्ञामार्फत करतांना पुनरावृत्ती
(Repetitions) होणार नाही याची दक्षता घ्यावी
यासाठी मागील पाच वर्षातील निवड झालेल्या तालुका व जिल्हास्तरावरील निवड याची पुनरावृत्ती
(Repetition) टाळता येईल. प्रदर्शनीय वस्तूचे मूल्यमापन निकषानुसार
वस्तुनिष्ठ कावे. याबाबत पालक व विद्यायांकडून कोणतीही तक्रार येणार नाही
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षा बालकांकरिता राज्यस्तरीय विज्ञान, गणित आणि पर्यावरण प्रदर्शनी २०२२-२३ मा ५० में राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन २०२३ चे आयोजन होत आहे. त्या निमित्त्याने जनतेत जनजागृती करावी राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन स्थळ संबंधित राज्याचे नाव यथावकाश कळविण्यात येईल.
सांख्यिकीय माहिती
जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आटोपताय निर्धारित प्रपत्रात माहिती भरुन त्वरीत सादर करावी.
तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन, प्राथमिक
शिक्षक व माध्यमिक शिक्षक यांचे शैक्षणिक साहित्य व प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर
यांची वैज्ञानिक साधने याबाबत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची शिक्षकांची
प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर यांच्या माहिती त्या सरावाची उपरोक्त प्रमाणे नमूद
केलेल्या अधिक योग्य ती कार्यवाही करावी. आपल्या सुलभ संदर्भाकरिता विज्ञान
प्रदर्शन आयोजनासंबंधी नियमावली व मूल्यमापनाचे निकष यासोबत जोडलेले कार्यप्रदर्शन
आटोपताच १३ फेब्रुवारी २०२३ सांख्यिकीय माहिती इत्यादी सर्व माहिती विहित
प्रपत्रात या संस्थेन चुकता सादर करावी. अधिक माहितीसाठी NCERT ची वेबसाईट (www.ncert.nic.in) पहावी
परिपत्रक - येथे क्लिक करा

0 टिप्पण्या