Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रप्रमुखाची ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे | केंद्रप्रमुख स्पर्धा परिक्षा अभ्यासक्रम | केंद्रप्रमुख विभागीय परिक्षा

केंद्रप्रमुखाची ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे|केंद्रप्रमुख स्पर्धा परिक्षा अभ्यासक्रम | केंद्रप्रमुख विभागीय परिक्षा

महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांत सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकवणे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरीता ४८६० केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करुन १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी एक केंद्र प्रमुखांचे पद निश्चित करण्यात आले. केंद्र प्रमुख पद भरतीचे प्रमाण सरळसेवा पदोन्नती व विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे अनुक्रमे ४०: ३०:३० या प्रमाणात निश्चित करण्यात आले. त्यानुसार ग्राम विकास विभागाने दि.१०.०६.२०१४ रोजी अधिसूचनेन्वये केंद्रप्रमुखाचे सेवाप्रवेश नियम प्रसिध्द केले. मात्र पदभरती होऊ शकली नाही. याबाबतीत नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

केंद्रप्रमुखाची ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे|केंद्रप्रमुख स्पर्धा परिक्षा अभ्यासक्रम | केंद्रप्रमुख विभागीय परिक्षा


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१ चौथा मजला, खोली क्र. ४४०, विस्तार इमारत, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई ४०० ०३२ दिनांक: ०१ डिसेंबर २०२२ मार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्याविषयी सविस्तर माहिती आपण पहाणार आहोत. 

संदर्भ वाचा :

(१) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक पीआरई- १०९४/७०४/(एक)/ प्राशि-१, दि.१४.११.१९९४ (२) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांका पीआरई-१०९९ /(२२८३)/ प्राशि-१, दि.१३.०८.१९९९

३) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक: पीआरई २००१/(२७६८)/ दोन/ प्राशि-१, दि.०३.०३.२००१ ४) शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्रमांक: पीआरई २००१ (२७६७) / प्राशि- १, दि.०३.०३.२००१

५) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग क्रमांक: पीआरई -२००१ (२७६७)/प्राशि- १, दि.०३.०९.२००२ 

६) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग क्रमाक पीआरई- २००५ / ४४६०/ प्राशि-१दि.०२.०२.२०१० 

७) शासन अधिसूचना, ग्राम विकास विभाग, क्रमाक सेवाप्र-२०१३/प्र.क्र.१०६/आस्था- ९. दि.१०.०६.२०१४

८) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक संकीर्ण २०१६/ प्र.क्र.१६३ / टिएनटि-१, दि. १६.०२.२०१८ ९) आयुक्त (शिक्षण) यांचे पत्र क्र. आस्था- अ / प्राथ- १०६/१७४७५/२०२२/५७०५ दि.२२.०९.२०२२. 

(१०) शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक संकीर्ण- २०१६/प्र.क्र. १६३ / टिएनटि १, दि. ९.९.२०१९ 

११) शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचे पत्र क्र. प्राशिस/कें. प्र. रिपभप्रस्ताव / २०२२ / ३९१४. दि.१९.०९.२०२२. (१२) शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचे पत्र क्र. प्राशंस / कै. प्र. प्रारुप मान्यता / २०२२/ ४७३२, दि.१७.११.२०२२ 

महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांत सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकवणे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरीता ४८६० केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करुन १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी एक केंद्र प्रमुखांचे पद निश्चित करण्याबाबतचा निर्णय उक्त संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला. त्यानुसार एकूण ४८६० केंद्र प्रमुखांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. शासन निर्णय दिनांक ०२.०२.२०१० अन्वये केंद्र प्रमुख पद भरतीचे प्रमाण सरळसेवा पदोन्नती व विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे अनुक्रमे ४०: ३०:३० या प्रमाणात निश्चित करण्यात आले. त्यानुसार ग्राम विकास विभागाने दि.१०.०६.२०१४ रोजी अधिसूचनेन्वये केंद्रप्रमुखाचे सेवाप्रवेश नियम प्रसिध्द केले. संदर्भ क्र. ८ येथील शासन निर्णयान्वये सदर पदे भरणेबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली. परंतु सदर कार्यपध्दतीनुसार पदे भरली जात नाहीत, असे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे १०० टक्के पदे भरण्यासाठी सदर भरतीचे प्रमाण बदलून ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

 

शासन निर्णय: 

केंद्र प्रमुख पदभरती संदर्भात यापूर्वी पारीत करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक १६.०२.२०१८ अधिक्रमित करण्यात येत आहे व याबाबतीत तद्नुषंगिक शासन निर्णय/ शासन शुध्दीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहेत.  केंद्र प्रमुखाची सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे तसेच सेवानिवृत्ती, राजीनामा, बडतर्फी इत्यादी कारणांनी यापुढे रिक्त होणाऱ्या पदावर ती पदे जसजशी रिक्त होतील, तसतशी ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादेत भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्हयातील उर्दू शाळांची संख्या विचारात घेऊन केंद्रप्रमुखाची पदे निश्चित करावीत. केंद्रप्रमुखांची रिक्त पदे विभागीय मर्यादीत स्पर्धा परीक्षा तसेच पदोन्नतीने भरण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी:- 

४.१ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा:- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येईल.

४.२ परीक्षेचे आयोजन व स्वरुपः- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षाद्वारे केंद्रप्रमुखाच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल, अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येईल. सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यामधील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील. या चाचणी परीक्षेचे आयोजन व स्वरुप खालीलप्रमाणे राहील:-

१. अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येईल. अर्थात विषयनिहाय चाचणी घेतली जाणार नाही. सदर परीक्षा आवश्यकतेनुसार ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येईल. सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल.

२. ऑनलाईन परीक्षा घेताना समान काठिण्य पातळीच्या किमान १० प्रश्नपत्रिका संच सदर परीक्षा यंत्रणा तयार ठेवेल. परीक्षार्थ्यांना समान काठिण्यपातळीचे विविध प्रश्नपत्रिका देण्यात येतील.

३. उपलब्ध रिक्त पदे विचारात घेऊन सदर परीक्षा घेण्यात येईल.

४. परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक परीक्षा परीषदेमार्फत जाहीर करण्यात येईल.

४. परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम:- परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील.

५.१. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम / बी.एस्सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

५.२ मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील.

५.३ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल त्याच जिल्ह्यासाठी पात्र राहतील.

०६. पदोन्नतीने नियुक्तीसाठी:- ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण केली असेल अशा उमेदवारामधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल.

०७. कागदपत्रांची पडताळणी:- केंद्रप्रमुख पदी विभागीय मर्यादित परीक्षेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्राची पडताळणी संकेतस्थळावर उमेदवारांची सूची जाहीर झाल्यानंतर १५ दिवसाच्या मुदतीत खालील समितीमार्फत करण्यात येईल.

संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती राहील:-

१. संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी - अध्यक्ष

२. समाजकल्याण अधिकारी - सदस्य

३. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) - सदस्य

४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक)- सदस्य सचिव

कागदपत्रांच्या पडताळणीस उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या उपस्थितीत नोंद ठेवणे आवश्यक राहील. उमेदवारांची मुळ कागदपत्रे तपासल्याची नोंद घेऊन उमेदवारांकडून प्रमाणपत्राच्या प्रतीचा एक संच घ्यावा व त्यावर कागदपत्राच्या पडताळणीचा दिनांक व नोंद क्रमांक नोंदविण्यात यावा. मूळ प्रमाणपत्रे उमेदवारास तात्काळ परत करण्यात यावीत.

०८. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

०९. शासन निर्णय, दिनांक ०२.०२.२०१० ते दि. १०.०६.२०१४ या कालावधीत अभावितपणे नियुक्त केंद्रप्रमुखांच्या सेवा दिनांक १६.०२.२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये नियमित करण्यात आल्या आहेत. सदर आदेश कायम राहतील.

१०. तक्रारीचे निवारण:- उमेदवाराच्या तक्रारीचे निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील. उमेदवाराने याबाबत लेखी तक्रार संबंधित प्राधिकान्यांकडे करावी. प्राप्त झालेल्या तक्रारीचे निवारण संबंधित प्राधिकाऱ्यांनी १५ दिवसांत करणे आवश्यक राहील. याबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) हे अपिलीय प्राधिकारी राहतील.

११. केंद्र प्रमुखांची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदे भरण्याची संपूर्ण प्रक्रिया शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येईल. यासंदर्भात संचालनालय स्तरावरून वेळोवेळी सविस्तर सूचना निर्गमित करण्यात येतील.

उपरोक्तप्रमाणे केंद्रप्रमुखांच्या मंजूर पदाच्या ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे या प्रमाणात राहतील. सद्यस्थितीत पदोन्नतीच्या कोट्यातील पदे ५० टक्के पेक्षा अधिक असल्यास सदर पदे जस जशी रिक्त होतील तस तशी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.

१२. केंद्र प्रमुख ही पदे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेमधील असल्याने त्यांच्या सेवा प्रवेशासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी ग्राम विकास विभागाने कार्यवाही करावी.

१३. ज्या जिल्हयांनी केंद्रप्रमुखाची पदे भरण्याची प्रक्रीया प्रस्तावित शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पूर्ण केली असल्यास ती वैध असेल.

१४. सदर शासन निर्णय ग्रामविकास विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक ४८ / आस्था- १४, दिनांक १७.११.२०२२ रोजीच्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२१२०११४५१५६२२२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

 आपणास हे ही आवडेल - 








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या