Ticker

6/recent/ticker-posts

Pradhanmantri Poshan Shakti Nirman Yojana प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे सामाजिक अंकेक्षण

 Pradhanmantri Poshan Shakti Nirman Yojana प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे सामाजिक अंकेक्षण

शालेय शिक्षण क्रीडा विभाग, शासन निर्णय दिनांक २१ जून २०२१ अन्वये राज्यातील प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे सामाजिक अंकेक्षण महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटीद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटीने AFC Inda Ltd. या बाह्यस्थ संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. उक्त संस्थेच्या कामकाजाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यामुळे सामाजिक अंकेक्षणाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. द्यस्थितीत सामाजिक अंकेक्षण सोसायटीचे राज्य समन्वयक साधन व्यक्ती याच्या थेट नियंत्रणाखाली अंकेक्षणाचे कामकाज पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संचालक, महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटी, मंत्रालय, मुंबई यांनी संदर्भ क्र. च्या जादेशान्वये कळविलेले आाहे. यानुषंगाने प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेच्या सामाजिक अंकेक्षणाबाबत आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

 

Pradhanmantri-Poshan-Shakti-Nirman-Yojana

. महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटी यांचेकडून विहित पद्धतीने सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेस खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.

. अंकेक्षण प्रक्रिया विहित पद्धतीने पार पाण्यासाठी सामाजिक अंकेक्षण सोसायटीने रोहयोच्या सामाजिक अंकेक्षणासाठी यापूर्वी नियुक्त केलेल्या अनुभवी ग्राम साधन व्यक्ती / समूह साधन व्यक्ती / तालुका साधन व्यक्ती/ जिल्हा साधन व्यक्ती यांच्या नियुक्त्या कराव्यात.


 

 

. अंकेक्षण कामकाजावर या सोसायटीचे थेट नियंत्रण राहण्यासाठी सोसायटीचे राज्य समन्वयक हे राज्य स्तरावर कामकाज पाहतील. तसेच आवश्यक तेथे शाळांना आकस्मिक भेटी देतील जनसुनावण्या सुयोग्यरीत्या पार पाडण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे जिल्हा तालुका स्तरावरील अधिकारी / कर्मचारी यांच्याशी समन्वय साधतील.

. सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया पार पाडण्यासाठीचे वेळापत्रक करण्यात आले आहे. त्यानुसार सामाजिक अंकेक्षण पार पाहण्यात यावे.

. अंकेक्षण कामकाजासाठी AFC India Ltdo. या संस्थेने विकसित केलेले मोबाईल अॅप्लिकेशनचा उपयोग करून त्याद्वारे माहिती संकलित करण्यात यावी.

. अंकेक्षण प्रक्रियेचे वेळापत्रक १५ दिवस अगोदर शालेय शिक्षण संचालक तसेच शिक्षण विभागातील संबंधित जिल्हा तालुकास्तरीय यंत्रणा यांना कळविण्यात यावे.

. सोसायटीचे राज्य समन्वयक जिल्हास्तरावर हे बैठक घेवून शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय यंत्रणेला सामाजिक अंकेक्षणाबाबत माहिती देतील, तसेच तालुका स्तरावर जिल्हा साधन व्यक्ती हे बैठक घेवून सामाजिक अंकेक्षणाबाबत शिक्षण विभागाच्या तालुकास्तरीय यंत्रणेला माहिती देतील.

 . महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटीयांच्या कार्यालयाकडून सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया माहे डिसेंबर २०२२ अखेर पर्यंत संपविण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे आता दि. डिसेंबर २०२२ च्या आदेशानुसार सामाजिक अंकेक्षण सोसायटीच्या थेट नियंत्रणाखाली सुरु करण्यात आलेल्या अंकेक्षण प्रक्रियेत जिल्हा, तालुका शाळा स्तरावरील सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी आवश्यक ते सहकार्य करावे, सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया पार पाडण्यासाठी संबंधित यंत्रणेसोबत समन्वय साधून खालील निर्देशानुसार कार्यवाही करावी.

सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया कार्यवाही

. महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटीयांच्या कार्यालयास योजनेचे सामाजिक अंकेक्षण मूल्यांकन करण्यासाठी संचालनालय स्तरावरून संदर्भ क्र. च्या आदेशान्वये आवश्यक निधी वर्ग करण्यात आलेला आहे.

. महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटीने नियुक्त केलेल्या AFC India Ltd. या बाास्थ संस्थेचा यापूर्वीचा अनुभव विचारात घेता शाळा स्तरावरील मुख्याध्यापक / शिक्षक यांचेकडुन तपासणीच्या नावाखाली पैशांची मागणी केल्यास संबंधितांविरुद्ध प्रचलित कार्यपद्धतीनुसार तात्काळ तक्रार नोंदवावी.

. योजनेचे सामाजिक अंकेक्षण मूल्यांकन करण्यासाठी संचालनालय स्तरावरून निधी वर्ग करण्यात आलेला असल्यामुळे तपासणीच्या नावाखाली प्रवास व्यवस्था, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था यासाठी कोणताही खर्च करण्यात येऊ नये.

. सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी जिल्हयातील ५१% शाळांची निवड करण्यात आलेली आहे अशा शाळांची माहिती आपणास नक्षा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर यादीतील शाळाव्यतिरिक्त इतर शाळांचे सामाजिक अंकेक्षण करण्यास प्रतिबंध करावा.

. सामाजिक अंकेक्षणाबाबत आवश्यक असलेली कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश संदर्भ क्र. च्या पत्रान्वये आपणास देण्यात आलेले आहेत. यानुषंगाने संदर्भ क्र. च्या पत्रामधील निर्देशानुसार संबंधित यंत्रणेसोबत समन्वय साधावा.

. सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी ज्या शाळाची निवड करण्यात आलेली आहे अशा शाळाच्या सामाजिक अंकेक्षणावेळेस तालुक्यातील क्षेत्रीय अधिकारी / केंद्रप्रमुख उपस्थित राहतील याबाबत सबंधिताना आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावेत,

. महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटी यांच्या जिल्हा स्तरावरील प्रतिनिधी यांनी केलेल्या नियोजनानुसार जिल्ह्यातील शाळांचे सामाजिक अंकेक्षण करण्याची प्रक्रिया पार पाडावी. . जिल्ह्यात योजनेचे सामाजिक अंकेक्षणाचे सुरु होत असल्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी/ पालक/ शिक्षक/ मुख्याध्यापक यांना माहिती देण्यात यावी.

. संचालक, महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटी, मंत्रालय, मुंबई यांनी संदर्भ क्र. नुसार दिलेले नियोजन कार्यआदेश यासोबत सलग्न करण्यात येत आहे. सदर नियोजनानुसार कामकाज पार पाडावे.

 

१०. योजनेच्या सामाजिक अंकेक्षणाच्या कामकाजावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे स्वतः सनियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पार पाडतील. राज्यातील प्रधानमंत्री घोषणशक्ती निर्माण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये विद्यार्थी / पालक / लोकप्रतिनिधी/ समाजसमूह यांचा सहभाग तसेच योजनेची फलनिष्पती योजनेमध्ये आवश्यक सुधारणा यानुषंगाने महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटी यांच्या कार्यालयाकडून योजनेची सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया सुरु करण्यात

 

येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या प्रतीनिधीसोबत योग्य तो समन्वय साधून सदरची प्रक्रिया सुपणे पार पाडण्यात यावी.

सामाजिक अंकेक्षण  संस्था- महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी Maharashtra State Society for Social Audit and Transparency (MS-SSAT) Reparador under Society Registration Act 1950 M0/2018 21:57 28, 2018

 

विषय: शालेय पोषण आहार (MDM) सामाजिक अंकेक्षण मुल्यांकन करणे तसेच जनसुनावणी आयोजित करण्याबाबत.

आदेश:-

शासन निर्णय, शालेय शिक्षण क्रीडा विभाग दिनांक २१ जून २०२१ अन्वये राज्यातील % शाळां शालेय पोषण आहार योजनेचे सामाजिक अंकेक्षण महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटीद्वारे करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. सामाजिक अंकेक्षण सोसायटीचे राज्य समन्वयक साधनव्यक्ती यांच्या थेट नियंत्रणाखाली पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-

शालेय पोषण आहार सामाजिक अंकेक्षण सूचना -

) अंकेक्षण प्रक्रिया विहित पद्धतीने पार पाडण्यासाठी सामाजिक अंकेक्षण सोसायटीने रोहयोच्या सामाजिक अंकेक्षणासाठी यापूर्वी नियुक्त केलेल्या अनुभवी ग्राम साधन व्यक्ती/ समूह साधनव्यक्ती तालुका साधन व्यक्ती/ जिल्हा साधन व्यक्ती यांच्या नियुक्त्या कराव्यात.

) अंकेक्षण कामकाजावर या सोसायटीचे थेट नियंत्रण राहण्यासाठी सोसायटीचे राज्य समन्य राज्य स्तरावर कामकाज पाहतील, तसेच आवश्यक तेथे शाळाना आकस्मिक भेटी देतील जनसुनावण्या सुयोग्यरीत्या पार पाडण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे जिल्हा तालुका स्तरावरील अधिकारी/कर्मचारी यांच्याशी समन्वय साधतील.

) ही अंकेक्षण प्रक्रिया पार पाडण्यासाठीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे. त्यानुसार सामाजिक अंकेक्षण पार पाडण्यात यावे.

) शालेय पोषण आहार योजनेच्या सामाजिक अंकेक्षणासाठी नियुक्त करण्यात येणाच्या ग्राम साधन व्यक्ती याना आवश्यक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही जिल्हा साधन व्यक्ती याच्याद्वारे करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये अप्रशिक्षित साधन व्यक्तीद्वारे ही अंकेक्षण प्रक्रिया राबविली जाणार नाही याची दक्षता राज्य समन्वयक यांनी घ्यावी.

) अंकेक्षण कामकाजासाठी AFC India Ltd. या संस्थेने विकसित केलेल्या मोबाईल अॅप्लिकेशनचा उपयोग करून त्याद्वारे माहिती संकलित करण्यात यावी.

) या अंकेक्षण प्रक्रियेचे १५ अगोदर शालेय शिक्षण संचालक तसेच शिक्षण विभागातील जिल्हा तालुकास्तरीय यंत्रणा यांना कळविण्यात यावे.

) शिक्षण संचालक, शालेय शिक्षण विभाग यांनी आपल्या नियंत्रणाखालील जिल्हा तालुकास्तरीय यंत्रणेला सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेबाबत अवगत करून, या प्रक्रियेसाठी सामाजिक अंकेक्षण सोसायटीद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या साधन व्यक्ती यांना हे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात.

) सोसायटीचे राज्य समन्वयक जिल्हास्तरावर बैठक घेवून शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय यंत्रणेला सामाजिक अंकेक्षणाबाबत माहिती देतील. तसेच तालुका स्तरावर जिल्हा साधन व्यक्ती बैठक घेवून सामाजिक अंकेक्षणात शिक्षण विभागाच्या तालुकास्तरीय यंत्रणेला माहिती देतील.

) शालेय पोषण आहार योजनेची सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया ही या सोसायटीच्या थेट नियंत्रणाखाली राविण्यात येईल. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी संबंधित जिल्ह्यातील शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना अंकेक्षण कार्यक्रमाबाबत वरीलप्रमाणे आवश्यक असलेल्या सुचना द्याव्यात.

 

शालेय पोषण आहार योजनेचे सामाजिक अंकेक्षण Social Audit

 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या