शैक्षणिक दिशादर्शिका प्रमाणे कामकाज करणे बाबत
मा.
आयुक्त शिक्षण म. रा. पुणे यांच्या संकल्पनेतून प्रशासकीय कामकाजात एकसूत्रता व
गतिमानता या हेतूने शिक्षण आयुक्तालय व अधिनरत राज्यस्तरीय कार्यालय, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
कार्यालये आणि शिक्षणाधिकारी (प्राथ / माध्य / योजना) व गटशिक्षणाधिकारी या सर्व
कार्यालयांची एकत्रित दिनदर्शिका म्हणजे "दिशादर्शिका २०२३" साकारली
आहे.
विषय:- शैक्षणिक दिशादर्शिका प्रमाणे कामकाज करणे बाबत....
संदर्भ :- १) मा. आयुक्त (शिक्षणाम. रा. पुणे यांचेकडील निर्देश दिनांक: ०९.०१.२०२३ २)मा. शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे जा.क्र.शिरांयो / स्वीस / दिशादर्शिका / २०२२/३ दि. ०९.०१.२०२३
मा. आयुक्त शिक्षण म. रा. पुणे यांच्या संकल्पनेतून प्रशासकीय कामकाजात एकसूत्रता व गतिमानता या हेतूने शिक्षण आयुक्तालय व अधिनरत राज्यस्तरीय कार्यालय, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालये आणि शिक्षणाधिकारी (प्राथ / माध्य / योजना) व गटशिक्षणाधिकारी या सर्व कार्यालयांची एकत्रित दिनदर्शिका म्हणजे "दिशादर्शिका २०२३" साकारली आहे.
शिक्षण आयुक्तालयाची एकत्रित दिनदर्शिका म्हणजे "दिशादर्शिका" बनण्याचा हा प्रयोग अभिनव असाच आहे. या दिशादर्शिका" मध्ये महिनानिहाय व दिनांकनिहाय कामकाज दिलेले आहे. यातून वार्षिक नियोजन तयार करण्यात आलेले आहे. तरी उपशिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य) शिक्षण विभाग, जि.प. यांनी मुख्यालयात व गटशिक्षणाधिकारी यांनी तालुकास्तरावर कामकाज करताना या "दिशादर्शिका " मध्ये हिरव्या रंगात, गुलाबी रंगात व करड्या रंगात दिलेली कामे आपण "दिशादर्शिका" मध्ये नमूद केलेल्या महिनानिहाय व दिनांकनिहाय नियोजना प्रमाणे पूर्ण करावीत.
या कामकाजाचा अहवाल तीनही रंगाप्रमाणे आपल्या स्तरावर अद्ययावत ठेवण्यात यावे. गटशिक्षणाधिकारी यांनी आपली दैनंदिनी दरमहा दि.०५ रोजी सादर करताना या दैनंदिनी मध्ये दिशादर्शिकाप्रमाणे कामकाज केल्याबाबतचे नमूद करावे.















0 टिप्पण्या