विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार
शालेय
जीवनात मुलांना भावी आयुष्याबाबत मार्गदर्शन करावे यासाठी विविध उपक्रम घेण्यात
येत असतात. असाच एक नवीन व उपयुक्त उपक्रम राबवला जाणार आहे. तो म्हणजे विद्यार्थ्यांना
करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार ज्यामध्ये मुलांना भावी करिअर बाबत
मार्गदर्शन केले जाणार आहे. करिअर मार्गदर्शन शिबीराचा आपण फायदा घेऊन आपले करिअर
निवडण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र
शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३० दि. १०.०१.२०२३ यांच्याकडून पत्रक क्रमांक - जाक/राशसंवप्रपम/
व्हीजीपीजी वेबिनार/ २०२२ २०२३ / १७८ रोजी एक पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.
दिनांक वेळ विषय
करिअर निवडताना
२० जाने २०२३ दुपारी ३.०० ते ४.००
प्रति,
१)
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२)
प्राचार्य, जिल्हा
शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) ३) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद
(सर्व)
४)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद (सर्व)
(५)
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व)
६)
प्रशासन अधिकारी महानगरपालिका / नगर परिषद/नगर पालिका.
विषय:-
विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार बाबत.
उपरोक्त
विषयाच्या अनुषंगाने आपणा सर्वाना विवित आहेच की राज्यांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे
विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक म्हणून राज्याच्या देशाच्या विकासात महत्वाचे
योगदान देत असतात. राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वीच्या वर्गामध्ये
शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व सोबतच भविष्यातील करिअरच्या विविध संधी
आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परिषदे मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन
करण्यात येत असते याअंतर्गतच करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी
वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर वेबिनार चे राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन
प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
पत्रक येथे क्लिक करा


0 टिप्पण्या