Ticker

6/recent/ticker-posts

Income tax 2022-23 आयकर विवरणपत्र सन 2022-23 Income tax 2022-23 income tax 2022-23 excel

आयकर विवरणपत्र सन 2022-23 Income Tax Calculator India for FY 2022-23 (AY 2023-24)

Salary- आयकर कायद्यानुसार आपले करमुक्त उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर कर द्यावा लागतो. कर अकारणीच्या दोन पध्दती आहेत १) जूनी कर आकारणी पध्दत व नवीन कर आकारणी पध्दत. या दोन्ही पध्दतीतील कर आकारणी खालील प्रमाणे आहे.

१) जूनी पध्दत

२) नवीन पध्दत

आपला एका आर्थीक वर्षातील पगार सोबतच खालील बाबी प्राप्त झाल्या असतील तर त्या उत्पन्नात धरल्या जातात. १) सर्व प्रकारचे वेतन २) रजेचा प्राप्त पगार ३) मागील कालावधीतील मात्र या आर्थिक वर्षीत मिळालेला पगार ४) देय झालेले मात्र अद्याप न मिळालेले मात्र ३१ मार्च पूर्वी मिळणारे फरक बील ४) वैद्यकीय बील (आयकर कायद्यात सुट दिलेले रोग वगळून) ५) तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी प्राप्त बील कान, नाक, घसा, मुत्रपींड इ. पकडू नये ६) शासनाद्वारे दिलेल्या विनामुल्य सोयी (उदा कॉटर्स ) ६) वेतनाव्यतिरिक्त मिळालेला नफा (मानधन) या सर्वांचा समावेश आयकर आकारणीसाठी करावा लागतो.   

House Property -घेतलेले घर भाड्याने दिले असेल तर त्यावर प्राप्त झालेले भाडे

Other Sources- आपणास इतर मार्गाने प्राप्त झालेले उत्पन्न यात दाखवावे जसे की, बचत खात्यावरील व्याज, आऱडी वरील व्याज, आयकर परताव्यावर प्राप्त झालेले व्याज इ. चा समावेश यात होतो.

Income-Tax-Calculator-2022-23



कर आकारणी जूनी पध्दती


Income-Tax-Calculator-2021-22


कर आकारणी नविन पध्दती

Income-Tax-Calculator-2021-22



Deducation Chapter VI-A

a.  Deduction u/s 80 CCD (1B)

bDeducation u/s 80 CCD 2

c.  Deducation u/s 80 CCG

d.  Deducation u/s 80 D for  i) Mediclaim insurance (limit upto Rs 25000)

     ii) Medical Expendture (only for senior & very senior citizen)

e.  Deducation u/s 80 DD for Medical Treatment for depadent disability /severe disability

f.  Deducation u/s 80 DDB for Medical Treatment for specified disease

g.  Deducation u/s 80 E for Interest paid on education loan taken for for self ,wife and children

h.  Deducation u/s 80 G for Donation 50%

i.  Deducation u/s 80 GG for H.R.A.   (limit upto Rs 60000)

j.  Deducation u/s 80 U for Handicapped  assessee  Rs 75000/125000

Total Gross  Deducation

Gross

eligible

 


पगारदार व्यक्तीस मिळणारे करमाफ भत्ते :

१) वाहन भत्ता मर्यादा रु.१६००/- दर महा व अपंग कर्मचाऱ्यास रु.३२००/-दर महा वजावट ( चालू आर्थिक वर्ष २०१८-१९ पासून रद्द )

२) घरभाडे भत्ता : अ) प्रत्यक्ष मिळणारा भत्ताब) पगाराच्या ४०% क) प्रत्यक्ष दिलेले घरभाडे यापैकी अ.ब.क.मधील जी कमी रक्कम असेल ती वजावट मिळेल. आवश्यक कागदपत्रे : १) भाडेकरार २) पोलीस व्हेरीफीकेशन

(३) भाडे पावत्या

(४) भाडे बँक खात्यातून दिल्याचा पुरावा बँक स्टेटमेंट किंवा पासबुक झेरॉक्स प्रत

३) मुलांचा शिक्षण भत्ता मर्यादा प्रत्येक मुलामागे रु.१००/- हि वजावट २ मुलांसाठी मिळते.

४) मुलांचा होस्टेलचा खर्च भत्ता मर्यादा प्रत्येक मुलामागे रु.१००/- हि वाजवत २ मुलांसाठी मिळते.

५) वर्दी भत्ता संपूर्ण रक्कम वजावटीस पात्र आहे. परंतु कामावर असताना वर्दी परिधान करणे आवश्यक आहे.

६) Standard Deduction Rs.50000/

७) इतर. ( टीप करमाफ भत्यांची वजावट घेताना विशिष्ट अटी पूर्ण केल्यावरच वजावट मिळते. )

करपात्र उत्पन्नातून मिळणाऱ्या वजावटी :

१) व्यवसाय कर संपूर्ण रकमेची वजावट मिळते.

२) घर कर्जावरील व्याज (Section २४ व 80 EE व EEA) : रु.२ लाख पर्यंत भरलेल्या व्याजावर वजावट मिळतेआवश्यक कागदपत्रे घर कर्जाच्या व्याजाची वजावट घेण्यासाठी घर कर्जाचे स्टेटमेंट किंवा प्रोव्हिजनल प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. घर कर्ज देणारी आर्थिक संस्था अधिकृत घर कर्ज देणारी मान्यताप्राप्त आर्थिक संस्था असावी.

३) अवलंबून असलेल्या अपंग व्यक्तीच्या औषधोपचार व पालनपोषणासाठी केलेला खर्च : कलम ८० डी डी बी नुसार  वजावटीची मर्यादा रु.७५०००/- व गंभीर अपंगत्व असल्यास रु.१२५०००/- ची वजावट मिळते. म्हणजेच ४०% ते ९०% = रु.७५०००/- वजावट व गंभीर अपंगत्व रु.१२५०००/- ची वजावट मिळते. अपंग प्रमाणपत्र देणे आवश्यक.

४) शारीरिक दुर्बलता (अपंग) असणाऱ्यांना मिळणारी वजावट :  वजावटीची मर्यादा रु. ७५०००/- व गंभीर अपंगत्व असल्यास रु.१२५०००/- ची वजावट मिळते. म्हणजेच ४०% ते ९०% = रु.७५०००/- वजावट व गंभीर अपंगत्व रु.१२५०००/- ची वजावट मिळते. अपंग प्रमाणपत्र देणे आवश्यक

५) विशिष्ट आजारांच्या औषधोपचारावर केलेल्या खर्चाची वजावट : वजावटीची मर्यादा रु.६००००/ मेडिकल खर्च बिल आपल्या कार्यालयास सादर केल्यास याची सूट मिळणार नाही. तसे हमीपत्र मेडिकल बिल सादर केले नाही व करणार नाही त्या संबंधी आपल्या कार्यालयाचे पत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. डॉक्टरकडून फॉर्म नं १० आय भरून घेणे अनिवार्य असून त्यासोबत खर्चाच्या पावत्या देणे आवश्यक आहे. (हि सवलकत) विशिष्ट आजारांच्या खर्चावरच वजावट मिळते..

आजारांची नावे ब्लाइंडनेसलो व्हिजनलेप्रसिक्यूई हिअरिंग इपेअरमेंट लोकोमीटर, Disability, मतिमंदत्वमॅटल रीटार्डेशन आणि ओटीझमसेरेब्रल पाल्सीबहुविकलांग, मानसिक आजार इ. अर्थात जे आजार बरे होत नाहीत व व्यक्ती अपंग किंवा काम न करण्याच्या क्षमतेचा राहण्यासारखे आजार

६) उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज : वजावटीला मर्यादा नाही आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक कर्जाच्या व्याजाची वजावट घेण्यासाठी कर्जाचे स्टेटमेंट किंवा प्रोव्हिजनल प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

७) उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज : वजावट मर्यादा रु.१५००००/

इलेक्ट्रिक कार कर्जाच्या व्याजाची वजावट घेण्यासाठी कर्जाचे स्टेटमेंट किंवा

प्रोव्हिजनल प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

कलम ८० सी

Deducation u/s 80 C, CCC, CCD1(upto Rs 1,50,000)

a)

Own  contribution to G.P.F

b)

 L.I.C , P.L.I Premium

c)

P.P.F

d)

N.S.C Purchased

e)

Accrued Interest on NSC

f)

GIS

g)

Housing Loan (H.B. + Repayment)

h)

Tution fees paid for two children

i)

Bank Fixed deposit (Above 5 years)

j)

Stamp Duty & Regestration fee

k)

Shares &Debenture of company engaged in infrasturctural facility ,units of mutual Fund

l)

Sukanya Scheme

0)

Other

Deducation u/s 80 C Total

 

 

 

a)

 u/s 80 CCC

b)

 u/s 80 CCD1

 

Total Deducation

 

गुंतवणूक वजावटी : (मर्यादा रु.१५००००/- सोडून)

१) केंद्र सरकारची नवीन पेन्शन योजना एन पी एस (मर्यादा रु.५००००/-)

कलम ८० सी सी डी (1बी) नुसार स्वतः किंवा व्यक्तिगत गुंतवणूक केलेली रक्कम

आवश्यक कागदपत्रे स्टेटमेंट किंवा रिसीट

कलम ८० सी सी डी (२) नुसार पगारात एन पी एस स्वरुपात मिळणारी रक्कम पगारातून कपात करून एन पी एस कपात करून गुंतवणूक केलेली रक्कम

महत्वाचे -

१) १ कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना १२% सरचार्ज भरावा लागेल.

२) ५ लाख पेक्षा कमी करपात्र उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना रु.१२५००/- ची सूट आहे (कलम ८७ अ नुसार)

३) नवीन पद्धत स्वीकारल्यावर पुढील वर्षापासून नवीन पद्धतीनेच कर आकारणी केली जाणार असून नवीन पद्धतीने कर आकारणी करताना पुढील २-३ वर्षात करत असलेल्या गुंतवणुकीबाबत आधीच विचार करून कर पद्धत निवडावी.

करगणना

4

TOTAL  TAXABLE  INCOME

 

 

 

5

Tax on Total Income

 

6

  TOTAL TAX PAYABLE  

7

Rebate  On  Total Tax  ( Rs 12500) under Section 87A

8

Total Tax Payable (13-14)

9

 Education Cess 4% I T  under14 above

10

Total Tax Payable (8+9)

 

 

11

Less: Relief under section 89           (attach Form 10E)

12

Income Tax  deducated

13

Balance of tax payable (17-18)

14

Tax  Payable or Refundable

व्हिडिओ पहा आणि तुमचा Tax तुम्हीच काढा.




वरील माहिती आपणास माहितीस्तव देण्यात आलेली आहे अधिक माहिती साठी आपण आयकर नियम पहावा. 

आयकर विवरणपत्र सन 2022-23 डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.

आयकर विवरणपत्र सन 2021-22



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या