राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2023 ची उन्हाळी सुट्टी व वर्ष 2023-24 सुरु करणेबाबत.
राज्यातील शाळांना कोणत्या तारखेपासून
उन्हाळी सुट्टी सुरू होणार व सन 2023-24 कोणत्या
तारखोला सुरू होणार शाळा याबाबत आलेले पत्रक याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. महाराष्ट्र
राज्यातील शाळांना 2 मे ते 12 जून या कालावधीत उन्हाळ्याच्या सुट्या असतील. येत्या
2022-23 या शैक्षणिक वर्षासाठीच्या शाळा 13 जून रोजी सुरू होणार आहेत, तर विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण
विभागाने दिली आहे.
Schools in Maharashtra state will have summer
holidays from May 2 to June 12. The schools for the coming 2022-23 academic
year will be started on 13th June, while the schools in Vidarbha will be
started from 27th June, informed the school education department through a
circular.
संदर्भ शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-2022/
प्र.क्र.58/ एस.डी. 4. दि.11/04/2022
उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय
परिपत्रकानुसार शासनाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना
देण्यात येत आहेत.
1. मंगळवार, दि. 02
मे 2023 पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर
सुट्टीचा कालावधी रविवार दि. 11 जून 2023 पर्यंत ग्राह्य धरावा. पुढील शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये दुसरा सोमवार, दि. 12 जून,
2023 रोजी शाळा सुरु करण्यात येतील. रुसेच जून महिन्यातील विदर्भाचे
तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा चाचा सोमवार दि. 26
जून, 2023 रोजी सुरु होतील.
2. इ.1 ली ते इ. 9
वी व इ.11 वी चा निकाल दि. 30 एप्रिल, 2023 रोजी अथवा स्थानंतर सुट्टीच्या
कालावधीत लावता येईल. तथापि, तो निकाल विद्यार्थी /
पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील.
3. शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची
दीर्घ सुट्टी कमी करुन त्याएवजी गणेशोत्सव अगर नाताळ पासारख्या सणाचे प्रसंगो ती
समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्या
परवानगीने घेण्याबाबत आवश्यक निर्देश आपले स्तरावरुन द्यावेत.
4. माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2
नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकुण सुट्टया 76 दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात
यावी.
5. वरीलप्रमाणे शाळेच्या सुट्टी
वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आपले स्तरावरुन सर्व संबोधताना सूचीत
करावे.
(कृष्णकुमार पाटील )
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
या पत्रकात
देण्यात आलेला संदर्भित शासन निर्णय-
राज्यातील प्राथमिक,
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व
शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ सुरू करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन परिपत्रक क्रमांका
संकिर्ण-२०२२/प्र.क्र.५८/ एस.डी.-४ मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२. दिनांक - ११ एप्रिल २०२२.
वाचा :- १) शासन परीपत्रक क्रमांक
संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१७८ / एसडी-६, दिनांक
२४ मार्च, २०२२. २) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च
माध्यमिक), पुणे यांचे दिनांक ३१ मार्च, २०२२ चे पत्र.
शासन परिपत्रक:-
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील
इयत्ता १ ली ते ९ वी व इयत्ता ११ वी च्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास तसेच
शाळांची वेळ व कार्यकाळाबाबत संदर्भीय शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेल्या
आहेत.
संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये
एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष
२०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय घेण्याची बाब विचाराधीन
होती.
१) सोमवार दि.०२ मे २०२२ पासून उन्हाळी
सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. १२ जून २०२२ पर्यंत ग्राहय
धरण्यात येवून पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये दुसरा सोमवार दि. १३ जून २०२२
रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता
उन्हाळयाच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. २७ जून २०२२ रोजी सुरू
होतील.
२) इयत्ता १ ली ते ९ वी व ११ वी चा निकाल
दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल,
तथापि तो निकाल विद्यार्थी / पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी
संबंधीत शाळेची राहील.
(३) शाळांतून उन्हाळयाची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी
गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्हयाच्या
शिक्षण अधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांच्या परवानगीने घ्यावी. शासन परिपत्रक
क्रमांक संकिर्ण-२०२२/प्र.क्र.५८/ एस.डी.-४
४) माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार
शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्टया ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत,
याची दक्षता घेण्यात यावी.
५) आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे
दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च
माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी
असल्यास त्यानंतरचा दिवस) तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील
चौथ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) जी तारीख
असेल त्या तारखेपासून शाळा सुरू होतील,
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक
२०२२०४१११८३८५४९९२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन
काढण्यात येत आहे.

0 टिप्पण्या