Ticker

6/recent/ticker-posts

शाळापूर्व तयारी मेळाव्याची पूर्वतयारी कशी करावी ?

शाळापूर्व तयारी मेळाव्याची पूर्वतयारी कशी करावी?

इयत्ता १ ली मध्ये दाखल होणाऱ्या मुलांसाठी मागील वर्षी मार्च २०२२ ते जून २०२२ या कालावधीत इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी “शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल" Shalapurv tayari Abhiyan pahile pavul हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला आहे. त्यानुसार २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातही इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी "शाळापूर्व तयारी” Shalapurv tayari अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

शाळापूर्व तयारी मेळाव्याची पूर्वतयारी कशी करावी ?

ज्या बालकांची शाळापूर्व तयारी झालेली असते त्या बालकांची प्राथमिक स्तरावरील संपादणूक चांगली दिसून येते. त्या दृष्टीने इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांची शाळापूर्व तयारी व्हावी व त्यांचे शाळेच्या पहिल्या वर्गात सहज संक्रमण घडून यावे या करिता या उपक्रमाचे आयोजन महत्वपूर्ण आहे. शाळास्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

क्र. १ माहे एप्रिल २०२३

 मेळावा क्र. २ माहे जून २०२३

मध्ये आयोजित करावयाचा आहे. दोन्ही मेळाव्यादरम्यान ६ ते ८ आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालक करून घेणार आहेत. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक यांची मदत घ्यावयाची आहे.

शाळापूर्व तयारी मेळाव्याची पूर्वतयारी कशी करावी ?

शाळापूर्वतयारी मेळाव्याची पूर्वतयारी कशी करावी ? यासाठी खालील व्हिडिओ कळजीपूर्वक पहा.



शाळापूर्व तयारी मेळाव्याची पूर्वतयारी- 

१) मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांची बैठक घेणे- शाळापूर्व तयारी मेळाव्याची पूर्वतयारी करण्यातील पहिले महत्वाचे काम म्हणजे शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वंयसेवक यांची मुख्याध्यापकानी सभा आयोजित करावी व त्या सभेत शाळापूर्व तयारी मेळाव्याबाबत सर्व माहिती द्यावी. कामाची विभागणी करावी.

२) माता, पालक , विद्यार्थी यांना मेळाव्यासाठी आमंत्रित करणे- शाळापूर्व तयारी मेळाव्याची पूर्वतयारी मधील दुसरा भाग म्हणजे आपल्यागावातील सर्व माता पालकांना मेळाव्यासाठी आमत्रित करावे. त्यासाठी त्यांना आगोदर कल्पना द्यावी. निमंत्रण पत्रिका देऊन मेळाव्यासाठी बोलवावे.

३) प्रभात फेरी आयोजन करणे- शाळापूर्व तयारी मेळाव्याची पूर्वतयारी मधील पुढचा भाग म्हणजे आपणास मेळ्यापुर्वी एका प्रभात फेरीचे आयोजन करावयाचे आहे. त्याबाबतचे नियोजन करावे. 

४) मेळाव्या दिवशी शाळा सजावट- शाळापूर्व तयारी मेळाव्याची पूर्वतयारी करताना शाळेची सजावट करण्यात यावी. यामध्ये रांगोळी, शाळा सजावट, फुगे लावणे, साफसफाई करणे यासर्व बाबीची तयारी आपण करून घ्यावी.

५) टेबल मांडणी करणे- शाळापूर्व तयारी मेळाव्याची पूर्वतयारी करताना आपणास मेळाव्यामध्ये ७ स्टाल लावयचे आहेत. त्याची मांडणी व त्याचे नियोजन आपण करावे. हे स्टाल सदर ७ स्टॉल्स पुढीलप्रमाणे

१) नोंदणी (रजिस्ट्रेशन),

२) शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास),

३) बौद्धिक विकास,

४) सामाजिक आणि भावनात्मक विकास,

५) भाषा विकास,

६) गणनपूर्व तयारी,

७) पालकांना मार्गदर्शन. या प्रमामे असतील त्याचे नियोजन करावे. 

६) भितीमुक्त वातावरण तयार करावे-  शाळापूर्व तयारी मेळाव्याची पूर्वतयारी करताना शाळेतील वातावरण भितीमुक्त व आनंदी राहिल याची काळजी मुख्याध्यापकांनी करावे. सोबतच खालील सूचनांचे पालन करावे. 

शाळा स्तरावर मेळावा आयोजनाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना पुढीलप्रमाणे :

 

१. जिल्ह्यातील जि. प. म.न.पा., व न.पा. च्या सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी (म.न.पा. व न.पा.) तसेच गटशिक्षणाधिकारी (पं. स.) यांनी ICDS विभाग यांच्या समन्वयाने करावे. मेळावे आयोजन करणेबाबतचे नियोजन पर्यवेक्षकीय अधिकारी व शाळांना कळवावे.

२. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४ तासांचा असावा.

३. शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी.

४. मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे, याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी एक / दोन दिवस मेळाव्याबाबत वस्ती, गाव स्तरावर प्रभातफेरी, दवंडी देवून, समाजमाध्यमांचा उपयोग करून तसेच पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात यावी व त्यामाध्यमातून इयत्ता पहिलीतील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे. 

५. उपक्रमाच्या अनुषंगाने प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकान्यात करण्यात याव्यात.

६. शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे आयोजन करण्याच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी म.न.पा. व. न. पा. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे समन्वयाने, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे नियोजन करावे व 

७. केंद्रप्रमुख यांनी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन मेळाव्याच्या आयोजनाबाबत नियोजन आवश्यक सूचना द्याव्यात. त्यानुसार मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांची बैठक घेऊन शाळास्तरावरील मेळाव्याचे नियोजन करावे.

८. प्रत्येक शाळेमध्ये मेळाव्याच्या दिवशी बॅनर व पोस्टर तयार करून लावण्यासाठी रु. ३००/- प्रमाणे (प्रति शाळा) रक्कम मान्य असून शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी म.न.पा. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची संख्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे बॅनर व पोस्टर यांची तालुकास्तरावर विहित कार्यपद्धतीचा वापर करून एकत्रित छपाई करावी व शाळांना मेळाव्यापूर्वी वितरीत करण्यात यावी

संदर्भ क्र. २ अन्वये मा. संचालक, SCERT, पुणे यांचेकडून सन २०२३ - २४ मध्ये प्रस्तावित केलेले स्टार्स निधी प्राप्त झाल्यानंतर संबंधित वेंडर यांना वर्ग करण्यात येईल. अतिरिक्त खर्च मंजूर केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, बॅनर साईज ५ X ३ फूट याप्रमाणे व पोस्टर साईझ २.५x२ फुट याप्रमाणे प्रिंटींग करण्यात यावी. सोबत बॅनर व पोस्टर नमुना जोडला आहे.

 

९.मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना #ShalapurvaTayariAbhiyan 2023. #शाळापूर्व तयारी अभियान 20022 या हॅशटॅगचा (#) उपयोग करावाhttp://www.facebook.com/Mahascert या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे. 

१०. शाळास्तरावरील पहिल्या व दुसऱ्या मेळाव्याची सांख्यिकीय माहिती आपणास जिल्हास्तरावरून देण्यात येणाऱ्या गुगल लिंक वर वेळोवेळी भरण्यात यावी. 

११. दोन्ही मेळाव्यामधील दरम्यानच्या कालावधीत इयत्ता पहिलीत दखलपात्र असलेल्या बालकांचे पालक / माता यांनी शाळेतले पहिले पाऊल" या पुस्तिकेच्या आधारे तसेच मेळावा व साप्ताहिक बैठकीतील मार्गदर्शनानुसार घरी शाळापूर्व तयारीच्या कृती करून घ्याव्यात. 

१२. शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे आयोजन सुव्यवस्थित रित्या व्हावे या करिता सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांनी योग्य सनियंत्रण करावे व मेळाव्यास भेटी द्याव्यात.  

१३. शाळांनी अधिकाधिक लोकप्रतिनिधींना मेळाव्यासाठी आमंत्रित करावे. तसेच शाळा पूर्वतयारी मेळाव्यांचा योग्य प्रचार प्रसार करण्यात यावा. 

१४. शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बालकांच्या शाळापूर्व तयारीची जोडणी पुढील शैक्षणिक सत्रात शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षकांनी इयत्ता पहिलीच्या पाठ्यक्रमाशी / विद्याप्रवेश मोड्यूलशी करावी.

वरील नियोजनाप्रमाणे "शाळापूर्व तयारी अभियान" उपक्रमाची अंमलबजावणी सुयोग्यरित्या करण्यात यावी.

आपणास हे ही आवडेल- 

शाळापूर्व तयारी अभियान २०२३ अंमलबजावणीबाबत


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या