Ticker

6/recent/ticker-posts

शाळापूर्व तयारी पहिला मेळावा झाल्यानंतर काय करावे?

शाळापूर्व तयारी पहिला मेळावा झाल्यानंतर काय करावे?

इयत्ता १ ली मध्ये दाखल होणाऱ्या मुलांसाठी मागील वर्षी मार्च २०२२ ते जून २०२२ या कालावधीत इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी “शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल" Shalapurv tayari Abhiyan pahile pavul हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला आहे. त्यानुसार २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातही इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी "शाळापूर्व तयारी Shalapurv tayari अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

ज्या बालकांची शाळापूर्व तयारी झालेली असते त्या बालकांची प्राथमिक स्तरावरील संपादणूक चांगली दिसून येते. त्या दृष्टीने इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांची शाळापूर्व तयारी व्हावी व त्यांचे शाळेच्या पहिल्या वर्गात सहज संक्रमण घडून यावे या करिता या उपक्रमाचे आयोजन महत्वपूर्ण आहे. शाळास्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

क्र. १ माहे एप्रिल २०२३ मेळावा क्र. २ माहे जून २०२३ मध्ये आयोजित करावयाचा आहे. दोन्ही मेळाव्यादरम्यान ६ ते ८ आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालक करून घेणार आहेत. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक यांची मदत घ्यावयाची आहे.

शाळापूर्व तयारी पहिला मेळावा झाल्यानंतर काय करावे?


शाळापूर्व तयारी पहिला मेळावा झाल्यानंतर काय करावे? 

शाळापूर्व तयारी पहिला मेळावा झाल्यानंतर काय करावे. यासाठी खाली दिलेला व्हिडिओ काळजी पूर्वक पहा. सर्व गोष्टी समजून घ्या.


शाळापूर्व तयारी पहिला मेळावा झाल्यानंतर काय करावे?

माता शाळापुर्व तयारीचे नेतृत्व करतात.- 

        शाळापूर्व तयारी पहिला मेळावा झाल्यानंतर मातांना शाळा पुर्व तयारी करण्यामधील त्यंची भूमिका समजून सांगावी. माता पालक या शाळा पुर्व तयारीचे नेतृत्व करत आहेत याची जाणीव करून द्यावी.


शाळापुर्व तयारी मेळाव्यानंतर मातांचे गट करणे- 

        शाळापूर्व तयारी पहिला मेळावा झाल्यानंतर मातांचे विभाग, गल्ली, भाग यानुसार गट तयार करून घ्यावेत. मातांच्या सोयीनुसार आपण असे गट तयार करावे.


गल्ली/ भाग यानुसार मातांचे Whatsup Group - 

        शाळापूर्व तयारी पहिला मेळावा झाल्यानंतर आपण मातांचे गट तयार केले असतील त्यानुसार त्याचे वाट्स अप ग्रुप तयार करून घ्यावेत. या ग्रुपवर आपण पुढील सर्व सूचना माहिती देणार आहोत. त्याप्रमाणे ग्रुप बनवून घ्यावेत.


मातांना आयडिया व्हिडीओ पाढवणे- 
   

    शाळापूर्व तयारी पहिला मेळावा झाल्यानंतर आपण वाट्स अप ग्रुप बनवले असतील अशा ग्रुपवर येणार आयडिया व्हिडिओ पाठवावा. तो मातांना पहाण्याच्या व त्याप्रमाणे कृती करून घेण्याचा सूचना द्याव्यात.


माता पाठवलेला आयडिया व्हिडिओ पहातील-

       शाळापूर्व तयारी पहिला मेळावा झाल्यानंतर आपण येणारा आयडिया व्हिडिओ पाठवणार आहोत तो पाहून त्यावर चर्चा करून व्हिडिओमधील दिलेली कृती कशी करावी यावर चर्चा करतील.


माता दिलेल्या कृती करून घेतील-

 आयडिया व्हिडिओमध्ये सागितलेली कृती माता आपल्या मुलांकडून करून घेतील. तशाच प्रकारच्या इतर कृती करून मुलांचा सराव करून घेतील.


मुलांना मदत करून शाळेसाठी तयार करतील- 

           शाळापूर्व तयारी पहिला मेळावा झाल्यानंतर माता आपल्या मुलांना विविध कृती करून शाळेत जाण्यासाठी तयार करतील.


दुसऱ्या मेळव्यापर्यंत मातांना मुलांची प्रगती दिसेल-

        शाळापूर्व तयारी पहिला मेळावा झाल्यानंतर माता आपल्या मुलांकडून विविध कृती करून त्यांना शाळेसाठी तयार कतील. त्याना आपल्या मुलांची प्रगती झालेली दिसून येईल. 



आपणास हे ही आवडेल 


शाळा स्तरावर मेळावा आयोजनाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना पुढीलप्रमाणे :

१. जिल्ह्यातील जि. प. म.न.पा., व न.पा. च्या सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी (म.न.पा. व न.पा.) तसेच गटशिक्षणाधिकारी (पं. स.) यांनी ICDS विभाग यांच्या समन्वयाने करावे. मेळावे आयोजन करणेबाबतचे नियोजन पर्यवेक्षकीय अधिकारी व शाळांना कळवावे.

२. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४ तासांचा असावा.

३. शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी.

४. मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे, याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी एक / दोन दिवस मेळाव्याबाबत वस्ती, गाव स्तरावर प्रभातफेरी, दवंडी देवून, समाजमाध्यमांचा उपयोग करून तसेच पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात यावी व त्यामाध्यमातून इयत्ता पहिलीतील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे. 

५. उपक्रमाच्या अनुषंगाने प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकान्यात करण्यात याव्यात.

सदर ७ स्टॉल्स पुढीलप्रमाणे

१) नोंदणी (रजिस्ट्रेशन),

२) शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास),

३) बौद्धिक विकास,

४) सामाजिक आणि भावनात्मक विकास,

५) भाषा विकास,

६) गणनपूर्व तयारी,

७) पालकांना मार्गदर्शन.

६. शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे आयोजन करण्याच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी म.न.पा. व. न. पा. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे समन्वयाने, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे नियोजन करावे. 

७. केंद्रप्रमुख यांनी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन मेळाव्याच्या आयोजनाबाबत नियोजन आवश्यक सूचना द्याव्यात. त्यानुसार मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांची बैठक घेऊन शाळास्तरावरील मेळाव्याचे नियोजन करावे.

८. प्रत्येक शाळेमध्ये मेळाव्याच्या दिवशी बॅनर व पोस्टर तयार करून लावण्यासाठी रु. ३००/- प्रमाणे (प्रति शाळा) रक्कम मान्य असून शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी म.न.पा. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची संख्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे बॅनर व पोस्टर यांची तालुकास्तरावर विहित कार्यपद्धतीचा वापर करून एकत्रित छपाई करावी व शाळांना मेळाव्यापूर्वी वितरीत करण्यात यावी.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या