शाळापूर्व तयारी
प्रत्यक्ष मेळावा
इयत्ता १ ली मध्ये दाखल होणाऱ्या मुलांसाठी मागील
वर्षी मार्च २०२२ ते जून २०२२ या कालावधीत इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी
“शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल" Shalapurv tayari Abhiyan
pahile pavul हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला आहे.
त्यानुसार २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातही इयत्ता पहिलीमध्ये
दाखल होणाऱ्या बालकांसाठी "शाळापूर्व तयारी” Shalapurv tayari अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
ज्या बालकांची शाळापूर्व तयारी झालेली असते त्या
बालकांची प्राथमिक स्तरावरील संपादणूक चांगली दिसून येते. त्या दृष्टीने इयत्ता
पहिलीला दाखलपात्र बालकांची शाळापूर्व तयारी व्हावी व त्यांचे शाळेच्या पहिल्या
वर्गात सहज संक्रमण घडून यावे या करिता या उपक्रमाचे आयोजन महत्वपूर्ण आहे.
शाळास्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित
करण्यात येणार आहे.
क्र. १ माहे एप्रिल २०२३
मेळावा
क्र. २ माहे जून २०२३
मध्ये आयोजित करावयाचा आहे. दोन्ही मेळाव्यादरम्यान
६ ते ८ आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालक करून घेणार आहेत. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक यांची मदत घ्यावयाची
आहे.
शाळापूर्व तयारी
प्रत्यक्ष मेळावा
शाळापूर्व तयारी प्रत्यक्ष मेळावा आजोजन कसे करावे. यासाठी खालील व्हिडिओ काळजीपूर्व पहा. त्यानुसार आपण आपल्या शाळेत मेळावा आयोजित करावयाचा आहे. सोबतच खालिल बाबी कराव्यात.
शाळापूर्व तयारी मेळावा (SRM)
मुलांना शाळेत शिकण्यासाठी तयार करणे आणि त्यांच्या
पालकांना,
विशेषत: मातांना त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून
घेण्यासाठी शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित केले जातात.
1) मजेदार क्रिया द्वारे वेगवेगळ्या डोमेनवर
मुलांचे मूल्यांकन करण्यासाठी बूथ सेट करणे.
2) मुले त्यांच्या पालक/पालकांसह शाळापूर्व तयारी
मेळाव्यामध्ये उपस्थित असतात
3) शाळापूर्व तयारी मेळावा हा नोंदणीसह सुरू होतो.
4) आणि नंतर रिपोर्ट कार्डमध्ये नोंद घेण्यासाठी वजन
आणि उंची मोजली जाते.
5) शारीरिक विकास यावर आधारीत विविध क्रिया करून
घेतल्या जातात.
6) मुलांना विविध क्रिया करण्यास सांगितले जाते
जसे की jumping, coloring, वर्गीकरण इत्यादी.
7) संज्ञानात्मक विकास - मुलांची विचार करण्याची आणि तर्क करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन
करण्यासाठी भिन्न संज्ञानात्मक कार्ये आयोजित केली जातात ज्यामध्ये एकत्रित करणे,
मोजणे, फरक सगणे, लहान
मोठेपणा सारख्या क्रियाकलापांचा समावेश होतो.
8) सामाजिक भावनिक विकास - आपल्या कुदुबतील नावे
सागणे. इत्यादी
9) भाषा विकास - चित्रांबद्दल बोला आणि त्यांच्या
भाषा कौशल्याचे मूल्यांकन करण्यासाठी लिहा . मुलांना वाचनास सांगितले जाते.
10) पूर्व-गणित कौशल्ये- विविध साधनाच्या सहायाने मोजणी, बेरीज आणि वजाबाकी करण्यास सांगितले जाते.
11) अभिमुखता आणि उत्सव - सरतेशेवटी, माता सोप्या क्रिया कलापांबद्दल अभिमुख असतात जे ते त्यांच्या मुलांसोबत
घरी करू शकतात
12) माता नेतृत्व करतात घरी शाळा तयारी उपक्रम
13) माता त्यांच्या मुलांसोबत घरी अशाच वरील प्रकारचे
विवध उपक्रम करतात.
शाळा स्तरावर मेळावा आयोजनाच्या अनुषंगाने आवश्यक
सूचना पुढीलप्रमाणे :
१. जिल्ह्यातील जि. प. म.न.पा., व न.पा. च्या सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी (म.न.पा. व न.पा.) तसेच गटशिक्षणाधिकारी (पं. स.) यांनी ICDS विभाग यांच्या समन्वयाने करावे. मेळावे आयोजन करणेबाबतचे नियोजन पर्यवेक्षकीय अधिकारी व शाळांना कळवावे.
२. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४ तासांचा असावा.
३. शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी.
४. मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र सर्व
बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे, याकरिता मेळावा आयोजनाच्या
आधी एक / दोन दिवस मेळाव्याबाबत वस्ती, गाव स्तरावर
प्रभातफेरी, दवंडी देवून, समाजमाध्यमांचा
उपयोग करून तसेच पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात यावी व त्यामाध्यमातून इयत्ता
पहिलीतील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे.
५. उपक्रमाच्या अनुषंगाने प्रशिक्षणातील
मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या
कृतींच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकान्यात करण्यात याव्यात.
सदर ७ स्टॉल्स
पुढीलप्रमाणे
१) नोंदणी (रजिस्ट्रेशन),
२) शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास),
३) बौद्धिक विकास,
४) सामाजिक आणि भावनात्मक विकास,
५) भाषा विकास,
६) गणनपूर्व तयारी,
७) पालकांना मार्गदर्शन.
६. शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे आयोजन करण्याच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी म.न.पा. व. न. पा. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे समन्वयाने, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे नियोजन करावे.
७. केंद्रप्रमुख यांनी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन मेळाव्याच्या आयोजनाबाबत नियोजन आवश्यक सूचना द्याव्यात. त्यानुसार मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांची बैठक घेऊन शाळास्तरावरील मेळाव्याचे नियोजन करावे.
८. प्रत्येक शाळेमध्ये मेळाव्याच्या दिवशी बॅनर व
पोस्टर तयार करून लावण्यासाठी रु. ३००/- प्रमाणे (प्रति शाळा) रक्कम मान्य असून
शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी म.न.पा. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या शाळांची संख्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे बॅनर व पोस्टर यांची
तालुकास्तरावर विहित कार्यपद्धतीचा वापर करून एकत्रित छपाई करावी व शाळांना
मेळाव्यापूर्वी वितरीत करण्यात यावी.

0 टिप्पण्या