Ticker

6/recent/ticker-posts

Salapurv tayari abhiyan pahile paul 2023 शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल 2023

 शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल 2023

इयत्ता १ ली मध्ये दाखल होणाऱ्या मुलांसाठी मागील वर्षी मार्च २०२२ ते जून २०२२ या कालावधीत इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी “शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल" Shalapurv tayari Abhiyan pahile pavul हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला आहे. त्यानुसार २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातही इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी "शाळापूर्व तयारी” Shalapurv tayari अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

#shalapurvtayari2023

Salapurv-tayari-abhiyan-pahile-paul-2023

विषय : शाळापूर्व तयारी अभियान २०२३ अंमलबजावणीबाबत

संदर्भ :- १. जा. क्र. राशैसंप्रपम/शापूअ /बालशिक्षण / शापूस /२०२२-२३/१३८९ दि. १८/०३/२०२३ चे मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांचे पत्र 

२. जा.क्र.राशैसंप्रपम/शापूअ / बालशिक्षण / निधी / २०२२-२३/१५७३ दि. २७/०३/२०२३ मा. उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये मागील वर्षी मार्च २०२२ ते जून २०२२ या कालावधीत इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी “शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल" हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला आहे. त्यानुसार २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातही इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी "शाळापूर्व तयारी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे

 

ज्या बालकांची शाळापूर्व तयारी झालेली असते त्या बालकांची प्राथमिक स्तरावरील संपादणूक चांगली दिसून येते. त्या दृष्टीने इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांची शाळापूर्व तयारी व्हावी व त्यांचे शाळेच्या पहिल्या वर्गात सहज संक्रमण घडून यावे या करिता या उपक्रमाचे आयोजन महत्वपूर्ण आहे. शाळास्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ माहे एप्रिल २०२३ आणि मेळावा क्र. २ माहे जून २०२३ मध्ये आयोजित करावयाचा आहे. दोन्ही मेळाव्यादरम्यान ६ ते ८ आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालक करून घेणार आहेत. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक यांची मदत घ्यावयाची आहे.


याअंतर्गत राज्यस्तरीय प्रशिक्षण दि. ५ ते ६ एप्रिल २०२३ या कालावधीत SCERT पुणे येथे असून त्यानंतर जिल्हा तालुका केंद्र व शाळा स्तरावर या अभियानाची अंमलबजावणी आपल्या कार्यक्षेत्रात करावयाची आहे. त्यानुसार उपक्रमांतर्गत प्रशिक्षणे व मेळाव्याचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे. 

अ.क्र.

उपक्रम स्तर व तपशील

जिल्हास्तरीय प्रशिक्षण

तालुकास्तरीय प्रशिक्षण

केंद्र स्तरीय प्रशिक्षण

कालावधी

आयोजन जबाबदारी

सहभागी घटक

Salapurv tayari abhiyan pahile paul 2023 शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल 2023

प्रशिक्षण आयोजनाच्या दृष्टीने आवश्यक सूचना

 

1) जिल्हा स्तर प्रशिक्षण या कार्यालयामार्फत दि. १२ एप्रिल २०२३ रोजी जिल्हास्तर एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन (स्थळ : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेळ : स. ९.०० ० ते दु. ५,३०) करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यातून / मनपातून ( BRC, URC) दोन व्यक्तीची निवड करण्यात यावी. तालुका / मनपा मध्ये या विषयाची जबाबदारी असलेले विषय साधन व्यक्ती यांची समन्वयक म्हणून निवड करण्यात यावी.


जिल्हा स्तर प्रशिक्षणासाठी समन्वयक विषय साधन व्यक्ती १ तसेच शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख अंगणवाडी पर्यवेक्षिका यामधून कोणतेही १ असे एकूण २ व्यक्ती सहभागी होतील. या प्रशिक्षणासाठी आपल्या स्तरावर सदर २ प्रशिक्षणार्थींची निवड करावी व ती नावे दि. ६ एप्रिल पर्यंत या कार्यालयास कळविण्यात यावीत. तसेच आपल्या स्तरावरून संबंधिताना प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त करण्यात यावे.


२. तालुकास्तरीय प्रशिक्षण तालुकास्तर प्रशिक्षणाचे आयोजन सबंधित शिक्षणाधिकारी ( मनपा) गटशिक्षणाधिकारी यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयाने करावे.


एक दिवसीय वेळापत्रकाप्रमाणे मनपास्तर / तालुकास्तर प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे. जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती हे तालुकास्तरावर तज्ञ मार्गदर्शक / सुलभक म्हणून काम करतील. तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रत्येक CRC / केंद्र मधून दोन व्यक्ती केंद्रप्रमुख CRC १ तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्याध्यापक यामधून कोणतेही १ यांची आपल्या स्तरावर प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करावी. तालुकास्तरीय / मनपा स्तरीय प्रशिक्षण दि. १७ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात यावे.


३. केंद्र स्तरीय प्रशिक्षण प्रत्येक CRC मध्ये दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी सकाळी अर्धवेळ शाळा भरवून स. १० ते ५ या वेळेत नियोजनाप्रमाणे केंद्रस्तर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे.


 तालुकास्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती हे केंद्र स्तरीय प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक / सुलभक म्हणून काम करतील. केंद्रातील सर्व जि.प., न.प., न.पा., म.न.पा., शाळांचे शिक्षक (इ. १ ते ५) व मुख्याध्यापक तसेच केंद्राच्या कार्यकक्षेतील सर्व अंगणवाडी सेविका याना केंद्रस्तरीय प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यात यावे.


४. प्रशिक्षणासाठी व उपक्रम अंमलबजावणीसाठी या विषयाची जबाबदारी BRC URC मधील एका विषय साधनव्यक्तीवर समन्वयक म्हणून देण्यात यावी. त्यांचे नाव या कार्यालयास दोन दिवसात कळविण्यात यावे.

 

सर्व स्तरीय प्रशिक्षण उपस्थिती, प्रशिक्षण अभिलेखे ( खर्चाचे) प्रशिक्षण अहवाल छायाचित्रे, मूळ प्रतीसह प्रशिक्षणानंतर ८ दिवसात प्रशिक्षण समन्वयक यांचेमार्फत आपल्या स्वाक्षरीसह या कार्यालयास सादर करण्यात यावे.

 

५. संदर्भ क्र. २ अन्वये मा. संचालक, SCERT, पुणे यांचेकडून सन २०२३ २४ मध्ये प्रस्तावित केलेले स्टार्स निधी प्राप्त झाल्यानंतर तालुका व केंद्रस्तरावरील एक दिवसीय प्रशिक्षणासाठी आर्थिक निकषांप्रमाणे झालेला प्रत्यक्ष खर्च संबंधित वेंडर यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत वर्ग करण्यात येईल.

 

प्रशिक्षणाचे सुस्पष्ट व्हिडीओ (२ किंवा ३ मिनिटांचे) फोटो इ. माहिती समाजसंपर्क माध्यमांवर ( फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, इ. ) #shalapurvtayari2023 या HASHTAG (# ) चा वापर करून अपलोड करावेत. समाजसंपर्क माध्यमांवर पोस्ट अपलोड करताना स्थळाचे नाव व तालुका व जिल्हा नमूद करावा. प्रशिक्षण खर्चाबाबत निकष आपणास वेगळ्याने पत्राद्वारे कळविण्यात येतील.

 

शाळा स्तरावर मेळावा आयोजनाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना पुढीलप्रमाणे :

 

१. जिल्ह्यातील जि. प. म.न.पा., व न.पा. च्या सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी (म.न.पा. व न.पा.) तसेच गटशिक्षणाधिकारी (पं. स.) यांनी ICDS विभाग यांच्या समन्वयाने करावे. मेळावे आयोजन करणेबाबतचे नियोजन पर्यवेक्षकीय अधिकारी व शाळांना कळवावे.

 

२. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४ तासांचा असावा.

 

३. शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी.

 

४. मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे, याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी एक / दोन दिवस मेळाव्याबाबत वस्ती, गाव स्तरावर प्रभातफेरी, दवंडी देवून, समाजमाध्यमांचा उपयोग करून तसेच पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात यावी व त्यामाध्यमातून इयत्ता पहिलीतील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे. 


५. उपक्रमाच्या अनुषंगाने प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकान्यात करण्यात याव्यात.

सदर ७ स्टॉल्स पुढीलप्रमाणे

१) नोंदणी (रजिस्ट्रेशन),

२) शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास),

३) बौद्धिक विकास,

४) सामाजिक आणि भावनात्मक विकास,

५) भाषा विकास,

६) गणनपूर्व तयारी,

७) पालकांना मार्गदर्शन.

 

६. शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे आयोजन करण्याच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी म.न.पा. व. न. पा. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे समन्वयाने, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे नियोजन करावे व 

 

७. केंद्रप्रमुख यांनी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन मेळाव्याच्या आयोजनाबाबत नियोजन आवश्यक सूचना द्याव्यात. त्यानुसार मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांची बैठक घेऊन शाळास्तरावरील मेळाव्याचे नियोजन करावे.

 

८. प्रत्येक शाळेमध्ये मेळाव्याच्या दिवशी बॅनर व पोस्टर तयार करून लावण्यासाठी रु. ३००/- प्रमाणे (प्रति शाळा) रक्कम मान्य असून शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी म.न.पा. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची संख्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे बॅनर व पोस्टर यांची तालुकास्तरावर विहित कार्यपद्धतीचा वापर करून एकत्रित छपाई करावी व शाळांना मेळाव्यापूर्वी वितरीत करण्यात यावी

 

संदर्भ क्र. २ अन्वये मा. संचालक, SCERT, पुणे यांचेकडून सन २०२३ - २४ मध्ये प्रस्तावित केलेले स्टार्स निधी प्राप्त झाल्यानंतर संबंधित वेंडर यांना वर्ग करण्यात येईल. अतिरिक्त खर्च मंजूर केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, बॅनर साईज ५ X ३ फूट याप्रमाणे व पोस्टर साईझ २.५x२ फुट याप्रमाणे प्रिंटींग करण्यात यावी. सोबत बॅनर व पोस्टर नमुना जोडला आहे.

 

९.मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना #ShalapurvaTayariAbhiyan 2023. #शाळापूर्व तयारी अभियान 20022 या हॅशटॅगचा (#) उपयोग करावाhttp://www.facebook.com/Mahascert या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे.

 

१०. शाळास्तरावरील पहिल्या व दुसऱ्या मेळाव्याची सांख्यिकीय माहिती आपणास जिल्हास्तरावरून देण्यात येणाऱ्या गुगल लिंक वर वेळोवेळी भरण्यात यावी.

 

११. दोन्ही मेळाव्यामधील दरम्यानच्या कालावधीत इयत्ता पहिलीत दखलपात्र असलेल्या बालकांचे पालक / माता यांनी शाळेतले पहिले पाऊल" या पुस्तिकेच्या आधारे तसेच मेळावा व साप्ताहिक बैठकीतील मार्गदर्शनानुसार घरी शाळापूर्व तयारीच्या कृती करून घ्याव्यात.

 

१२. शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे आयोजन सुव्यवस्थित रित्या व्हावे या करिता सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांनी योग्य सनियंत्रण करावे व मेळाव्यास भेटी द्याव्यात. 

 

१३. शाळांनी अधिकाधिक लोकप्रतिनिधींना मेळाव्यासाठी आमंत्रित करावे. तसेच शाळा पूर्वतयारी मेळाव्यांचा योग्य प्रचार प्रसार करण्यात यावा.

 

१४. शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बालकांच्या शाळापूर्व तयारीची जोडणी पुढील शैक्षणिक सत्रात शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षकांनी इयत्ता पहिलीच्या पाठ्यक्रमाशी / विद्याप्रवेश मोड्यूलशी करावी....

 

वरील नियोजनाप्रमाणे "शाळापूर्व तयारी अभियान" उपक्रमाची अंमलबजावणी सुयोग्यरित्या करण्यात यावी.


आपणास हे ही आवडेल - 

१) शाळांतील शिक्षक संवर्गातील पदांसाठी संच मान्यतेचे निकष

२) शाळा प्रवेशासाठी आधारसक्ती नाही. संचमान्यता मात्र आधार लिंक विद्यार्थींवर 

३) शाळांची सन 2023 ची उन्हाळी सुट्टी व वर्ष 2023-24 सुरु करणेबाबत 






 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या