Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ उत्कृष्ट व्हिडीओ निवडीचे निकष

 उत्कृष्ट व्हिडीओ निवडीचे निकष-

शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजित करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४१ / एसडी-४ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२. यांच्या मार्फत दिनांक :- ११ मे २०२३. रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३  उत्कृष्ट व्हिडीओ निवडीचे निकष


शासन निर्णय-

शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या स्पर्धेचा माहिती खालीलप्रमाणे.


अ.क्रइयत्ताविषयशै. व्हिडिओ प्रकार
इ. १ ली व ३ रीभाषा, गणित, इंग्रजी● कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर करून स्वतः व्हिडीओ तयार करणे. ● स्वतः स्क्रीन रेकोर्ड करून तयार केलेला व्हिडीओ
३ री ते ५ वीभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे● स्वतः केलेला Animated व्हिडओ ● स्वतः पेन टॅबलेटचा वापर करून बिवलेला व्हिडीओ.
६ वी ते ८ वीभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे● Immersive eContent (Augmented Reality / Virtual Reality / Virtual Lab/ 360 Degree/ Simulations) वर आर्धाशरत व्हिडीओ
९ वी ते १० वीभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे● खेळावर आर्धाशरत व्हिडीओ (Gamification) ● ई-चाचणीवर आधारीत व्हिडीओ (E-assessments)
११ वी ते १२ वीभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे● शासन प्रणालीवर आधारीत केलेला व्हिडीओ
अध्यापक विद्यालयभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, शिक्षक प्रशिक्षण निगडित अधुनिक प्रवाह●दिव्यांगत्व प्रकारानुसार अध्यनासाठी व्हिडिओ .


व्हिडिओ कसा अपलोड करावा?-

शिक्षकांनी आपले तयार केलेले व्हिडीओ आपल्या गुगल ड्राईव्ह (Google Drive) ला अपलोड करून Anyone. With link करून Editor त्याचा Access हा ठेवावा व सदरची लिंक ही उपलब्ध देण्यात येणाऱ्या प्रणालीवर अपलोड करण्यात यावी.

स्पर्धेचे आयोजन (तालुका/ जिल्हा/ राज्य स्तर)-


अ.क्रस्पर्धेचा प्रकारगटविषय व पुरस्कारजबाबदार व्यक्ती
तालुका पुरस्कारइयत्ता १ ली व रीभाषा, गणित, इंग्रजी प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतियगटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी
तालुका पुरस्कार३ री ते ५ वीभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतियगटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी
तालुका पुरस्कार६ वी ते ८ वीभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतियगटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी
तालुका पुरस्कार९ वी ते १० वीभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतियगटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी
तालुका पुरस्कार११ वी ते १२ वीभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतियगटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी
तालुका पुरस्कारअध्यापक विद्यालयभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, शिक्षक प्रशिक्षण निगडित अधुनिक प्रवाह प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतियगटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी
वरीलप्रमाणेजिल्हा, राज्य स्तरावरीलनियोजन असणार आहे.जिल्हा पुरस्कार - ८४, राज्य पुरस्कार - ८४असणार आहेत.


वरीलप्रमाणे  जिल्हा, राज्य स्तरावरील नियोजन असणार आहे. जिल्हा पुरस्कार - ८४, राज्य पुरस्कार - ८४ असणार आहेत. जिल्हा पुरस्कार - जबाबदार संस्था जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, राज्य पुरस्कार -जबाबदार संस्था जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था असणार आहे.

पारितोषिक स्वरूप-

व्हिडिओ स्पर्धा ही जिल्हा, राज्य स्तरावरील नियोजन असणार आहे.तालुका पुरस्कार - ८४,  जिल्हा पुरस्कार - ८४, राज्य पुरस्कार - ८४ असणार आहेत. जिल्हा पुरस्कार - जबाबदार संस्था जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, राज्य पुरस्कार -जबाबदार संस्था जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था घेतली जाणार आहे यासाठी दिले जाणारे पुरस्कार व त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल-

अ.क्रस्तरक्रमांकबक्षिसाचे स्वरूप
०१तालुका स्तरप्रथम क्रमांक(रू. ५०००/- रोख व प्रमाणपत्र)
द्वितीय क्रमांक(रू. ४०००/- रोख व प्रमाणपत्र)
तृतीय क्रमांक(रू. ३०००/- रोख व प्रमाणपत्र)
०२जिल्हा स्तरप्रथम क्रमांक(रू. १०,०००/- रोख व प्रमाणपत्र)
द्वितीय क्रमांक(रू. ९०००/- रोख व प्रमाणपत्र)
तृतीय क्रमांक(रू. ८०००/- रोख व प्रमाणपत्र)
०३राज्य स्तरप्रथम क्रमांक(रू. ५०,०००/- रोख व प्रमाणपत्र)
द्वितीय क्रमांक(रू. ४०,०००/- रोख व प्रमाणपत्र)
तृतीय क्रमांक(रू. ३०,०००/- रोख व प्रमाणपत्र)


शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेसदर करावयाचा व्हिडिओ कसा असावा याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. व्हिडिओमध्ये कोणत्या बाबी असाव्यात कोणत्या बाबी नसाव्यात याविषयी माहिती दिलेली आहे. खालील बाबींचा विचार करून आपण आपला व्हिडिओ तयार करून स्पर्धेसाठी द्यावयाचा आहे.

  • व्हिडीओ निर्मिती साठी आवश्यक आशय मजकूर आदर्श असावा.
  • लिंग समभाव, शासकीय ध्येय धोरणाशी सुसंगत आशय असावा.
  • व्हिडीओ ची साईज ही विद्यार्थी किंवा इयत्तेनुसार असावी.
  • निर्मित व्हिडीओ मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असेल तर उत्तम. व्हिडिओमधील मजकूर, चित्रे, रंगसंगती अचूक व योग्य असावीत.
  • शिक्षकांनी स्वतः केलेले व्हिडीओ चित्रीकरण.
  • सादरीकरण. एडिटिंग इत्यादी बाबींना महत्व असेल.
  • आवाजात सुस्पष्टता असावी. आवाजाची / बोलण्याची
  • गती योग्य प्रमाणात असावी. आवाज आरोह- 
  • अवरोह युक्त असावा. बँकग्राउंड नॉईज नसावा. जर बँकग्राउंड म्युझिक घेणार असाल तर ते कमी आवाजात असावे. बँकग्राउंड म्युझिक व आवाज हे स्लाईडच्या आशयाशी संबंधित असावे. 
  • व्हिडीओ निर्मितीसाठी महत्वाच्या बाबी-
  •  शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारितच व्हिडीओ बनविणे आवश्यक आहे.
  • वरील व्हिडीओ अध्ययन-अध्यापन प्रणालीशी निगडीत असणे आवश्यक
  • व्हिडिओ बनविणाऱ्याने स्वतः चा थोडक्यात परिचय समावेश करावा. 
  • व्हिडीओ कन्टेन्ट निर्मिती करणाऱ्या शिक्षकाचे नाव, शाळा, पत्ता या बाबी व्हिडिओमध्ये समाविष्ट करू नयेत. व्हिडिओच्या शेवटी या बाबी फक्त स्क्रिनवर दिसाव्यात.
  • घटक, व्हिडिओमधून कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे. हे सुरुवातीला स्क्रिनवर दाखवावे.
  • व्हिडीओ ची लांबी कमीत कमी ५ मि. व जास्तीत जास्त ९ मिनिटांची असावी.
  •  व्हिडीओ फॉरमॅट MP४ असावा. .
  •  व्हिडीओ मध्ये कुठेही स्वतःच्या समाज माध्यमांची. व्यावसायिक जाहिरात समाविष्ट नसावी. उल्लेख नसावा.
  • व्हिडीओ मधील मजकूर व आशयाबाबत पूर्णतः संबंधित शिक्षक जबाबदार असणार आहे, याची नोंद घ्यावी.
  • व्हिडीओ मध्ये वापर करण्यात येणारी इमेज अथवा मजकूर हा कॉपीराईट मुक्त (Creative Commons) असण्याबाबत दक्षता घेण्यात यावी. कॉपीराईटची लायसन्सच्या सर्व मार्गदर्शक सूचनांची काळजी घ्यावी. याबाबत काही आक्षेप आल्यास संबंधित स्पर्थक जबाबदार असतील.
  •  राज्यस्तरावरून निवड करण्यात आलेल्या व्हिडीओजच्या creator ला
  • तो व्हिडीओ त्यांनीच तयार केला आहे हे सिद्ध करावे लागेल. अन्यथा तो व्हिडीओ
  • स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
  • शैक्षणिक व्हिडिओच्या दर्जानुसार शिक्षकांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल व सदरच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओज हे त्याच्या creator च्या नावासह शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
  •   स्टॉक शॉट्स किंवा कोणतेही कॉपीराइट केलेले ग्राफिक्स/इमेज संकलित करून तयार केलेले व्हिडिओ स्पर्धेसाठी पात्र नसतील.
  •  एका स्पर्धकाने एका गटासाठी फक्त एकच व्हिडिओ पाठवावा. सर्व नोंदींची एक प्रत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राखून ठेवली जाईल.
  • पुरस्कार विजेत्या व्हिडिओचे प्रसारण DIKSHA/OER आणि SCERT द्वारे व्यवस्थापित इतर वेबसाइट्स/पोर्टलवर अपलोड करण्यात येतील.
  • तालुका / जिल्हा/ राज्य स्तरावरील स्पर्धांचे निकाल तालुका/ जिल्हा/ राज्य निवड समिती मार्फत अंतिम केला जाईल (स्वतंत्रपणे ऑडिओ आणि अॅनिमेशन/इमर्सिव्ह ई-कॉन्टेंट/ डिजिटल गेम्स आणि अॅप्लिकेशन श्रेणीसाठी ज्युरीने घोषित केलेले निकाल बंधनकारक असतील.

 

व्हिडिओ रद्द करण्याचे अधिकार- 

  • कोणत्याही प्रकारची हिंसा, लैंगिक प्रदर्शन, असभ्य भाषा, अमली पदार्थाचा वापर यांचा व्हिडीओ निर्मितीत समावेश असल्यास,
  • वांशिक, सांस्कृतिक, धार्मिक, स्त्रिया किंवा लिंग पूर्वाग्रहाचे समर्थन करणारी सामग्री व्हिडीओ निर्मितीत समावेश असल्यास,
  • • तांत्रिक त्रुटी असल्यास ( उदा. सुरु न होणे, मध्येच बंद होणे), 
  • कोणत्याही कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन असल्यास,
  • साहित्यिक चोरीचा (plagiarism) समावेश असल्यास,
  • असे व्हिडीओ पडताळणी अंती कोणत्याची स्तरावर बाद करण्यात येतील. यावर स्पर्धकाचा कोणताही आक्षेप ग्राह्य धरण्यात येणार नाही.

 

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ पारितोषिक स्वरूप 

येथे क्लिक करा 


व्हिडिओ स्पर्धा मूल्यमापन / गुणदान कसे असेल येथे क्लिक करा.


शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची उत्कृष्ट व्हिडिओचे निकष 
साठी 

येथे क्लिक करा

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३  कालावधी निवड समिती रचना 

येथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या