Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ कालावधी निवड समिती रचना

 शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३  कालावधी निवड समिती रचना 

शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजित करण्यात येत आहे.

राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक-प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजित शासनाच्या विचाराधीन होती.

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३  कालावधी निवड समिती रचना


शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजित करण्यात येत आहे.

व्हिडिओ कसा अपलोड करावा?-

शिक्षकांनी आपले तयार केलेले व्हिडीओ आपल्या गुगल ड्राईव्ह (Google Drive) ला अपलोड करून Anyone. With link करून Editor त्याचा Access हा ठेवावा व सदरची लिंक ही उपलब्ध देण्यात येणाऱ्या प्रणालीवर अपलोड करण्यात यावी.

जिल्हा, राज्य स्तरावरील नियोजन असणार आहे. जिल्हा पुरस्कार - ८४, राज्य पुरस्कार - ८४ असणार आहेत. जिल्हा पुरस्कार - जबाबदार संस्था जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, राज्य पुरस्कार -जबाबदार संस्था जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था असणार आहे.

पारितोषिक स्वरूप-

व्हिडिओ स्पर्धा ही जिल्हा, राज्य स्तरावरील नियोजन असणार आहे.तालुका पुरस्कार - ८४,  जिल्हा पुरस्कार - ८४, राज्य पुरस्कार - ८४ असणार आहेत. जिल्हा पुरस्कार - जबाबदार संस्था जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, राज्य पुरस्कार -जबाबदार संस्था जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था घेतली जाणार आहे.

शैक्षणिक व्हिडिओ प्रकार -

च्च माध्यमिक/ शिक्षक प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या स्पर्धेचा माहिती खालीलप्रमाणे.


अ.क्रइयत्ताविषयशै. व्हिडिओ प्रकार
इ. १ ली व ३ रीभाषा, गणित, इंग्रजी● कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर करून स्वतः व्हिडीओ तयार करणे. ● स्वतः स्क्रीन रेकोर्ड करून तयार केलेला व्हिडीओ
३ री ते ५ वीभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे● स्वतः केलेला Animated व्हिडओ ● स्वतः पेन टॅबलेटचा वापर करून बिवलेला व्हिडीओ.
६ वी ते ८ वीभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे● Immersive eContent (Augmented Reality / Virtual Reality / Virtual Lab/ 360 Degree/ Simulations) वर आर्धाशरत व्हिडीओ
९ वी ते १० वीभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे● खेळावर आर्धाशरत व्हिडीओ (Gamification) ● ई-चाचणीवर आधारीत व्हिडीओ (E-assessments)
११ वी ते १२ वीभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे● शासन प्रणालीवर आधारीत केलेला व्हिडीओ
अध्यापक विद्यालयभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, शिक्षक प्रशिक्षण निगडित अधुनिक प्रवाह●दिव्यांगत्व प्रकारानुसार अध्यनासाठी व्हिडिओ .

स्पर्धेचे आयोजन-


अ.क्रस्पर्धेचा प्रकारगटविषय व पुरस्कारजबाबदार व्यक्ती
तालुका पुरस्कारइयत्ता १ ली व रीभाषा, गणित, इंग्रजी प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतियगटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी
तालुका पुरस्कार३ री ते ५ वीभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतियगटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी
तालुका पुरस्कार६ वी ते ८ वीभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतियगटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी
तालुका पुरस्कार९ वी ते १० वीभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतियगटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी
तालुका पुरस्कार११ वी ते १२ वीभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतियगटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी
तालुका पुरस्कारअध्यापक विद्यालयभाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, शिक्षक प्रशिक्षण निगडित अधुनिक प्रवाह प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतियगटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी
वरीलप्रमाणेजिल्हा, राज्य स्तरावरीलनियोजन असणार आहे.जिल्हा पुरस्कार - ८४, राज्य पुरस्कार - ८४असणार आहेत.

पारितोषिकाचे स्वरूप-


अ.क्रस्तरक्रमांकबक्षिसाचे स्वरूप
०१तालुका स्तरप्रथम क्रमांक(रू. ५०००/- रोख व प्रमाणपत्र)
द्वितीय क्रमांक(रू. ४०००/- रोख व प्रमाणपत्र)
तृतीय क्रमांक(रू. ३०००/- रोख व प्रमाणपत्र)
०२जिल्हा स्तरप्रथम क्रमांक(रू. १०,०००/- रोख व प्रमाणपत्र)
द्वितीय क्रमांक(रू. ९०००/- रोख व प्रमाणपत्र)
तृतीय क्रमांक(रू. ८०००/- रोख व प्रमाणपत्र)
०३राज्य स्तरप्रथम क्रमांक(रू. ५०,०००/- रोख व प्रमाणपत्र)
द्वितीय क्रमांक(रू. ४०,०००/- रोख व प्रमाणपत्र)
तृतीय क्रमांक(रू. ३०,०००/- रोख व प्रमाणपत्र)

व्हिडिओ गुणदान निकष-

 

अ.क्रनिकषगुणतपशील
०१स्पष्टपणा (Simplicity)१५प्रस्तावना, शीर्षक, उदिष्ट/अध्ययन निष्पत्ती लेखन, समस्या मांडणी विद्यार्थीकेंद्रित आशय
०२गरजाधष्ठितपणा (Relevance)१५शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा प्रमुख यासाठी उपयुक्त, शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या गरजा, कार्य स्पष्टता.
०३परिणाम (Impact)१५विविध लाभार्थी, जिल्हा/ राज्य / राष्ट्रीय / आंतर राष्ट्रीय विविध स्तरावर कार्य, आलेख, सांख्यिकी वापर
०४नाविण्यता (Creativity)१५शैक्षणिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर २१ व्या शतकातील कौशल्ये यापर, नवीन संकल्पना, योग्य editing
०५समन्वय (Engagement)१५स्थानिक, देश-विदेशातील तज्ञांचे अनुभव, विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा प्रमुख यांचा समावेश, पुरावे
०६उपयोगिता (Reusability)१५इतर वर्ग, शाळा, क्षेत्र येथे वापर, सांख्यिकी वापर
०७चित्रफित दर्जा (Video Quality)१०रंगसंगती, ओळख, उद्दिष्टे, कृती, यशोगाथा, लाभार्थी मते, size, चुकीचे शब्दप्रयोग
एकूण१००

निवड समितीची रचना

वरीलप्रमाणे प्रत्येक तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर विषय व गटनिहाय प्रथम तीन क्रमांक निवडण्यात येतील. सदर उत्कृष्ट शिक्षकांना उपरोक्तप्रमाणे रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरवांकीत करण्यात येईल, तसेच सहभागी स्पर्धक यांनाही सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. सदर निवड करण्याकरिता तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यास शासन मान्यता देत आहे.

तालुका स्तरावरील निवड समिती

अ.क्र अधिकारी/ कर्मचारी समितीतील पद
०१ गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी अध्यक्ष
०२ अधिव्याख्याता DIET सदस्य
०३ तंत्रस्नेही / पुरस्कार प्राप्त शिक्षक (०२) सदस्य
०४ विस्तार अधिकारी (शिक्षण)/ केंद्रप्रमुख सदस्य सचिव

जिल्हा स्तरावरील निवड समिती

अ.क्र अधिकारी / कर्मचारी समितीतील पद
०१ प्राचार्य, DIET अक्ष्यक्ष
०२ वरिष्ठ अधिव्याख्याता, DIET सद्स्य
०३ शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सद्स्य
०४ तंत्रस्नेही पुरस्कार प्राप्त शिक्षक (०२) सद्स्य
०५ शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सदस्य सचिव सद्स्य सचिव

राज्य स्तरावरील निवड समिती

अ.क्र अधिकारी / कर्मचारी समितीतील पद
०१ संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे अध्यक्ष
०२ राष्ट्रीय ICT पुरस्कार प्राप्त शिक्षक (०२) सदस्य
०३ उपविभागप्रमुख, आय. टी. सदस्य
०४ उपविभागप्रमुख, प्रसार माध्यम सदस्य
०५ प्राचार्य (आय. टी. व प्रसार माध्यम), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे सदस्य सचिव

कालावधी-

प्रस्तुत पुरस्कार दरवर्षी खालीलप्रमाणे कालावधीत आयोजित करण्यात येतील.

अ.क्र तपशील महिना
०१ में जाहिरात प्रसिद्धी
०२ जून ऑनलाईन नामांकन नोंदणी
०३ जूलै तालुका व जिल्हास्तर निवड समितीमार्फत पडताळणी व पुढील टप्यासाठी उत्कृष्ट उमेदवारांची शिफारस
०४ ऑगस्ट राज्यस्तर निवड समितीमार्फत पडताळणी व अंतिम उत्कृष्ट उमेदवारांची शासनास शिफारस
०५ सप्टेंबर पुरस्कार वितरण समारंभ


शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ पारितोषिक स्वरूप 

येथे क्लिक करा 


व्हिडिओ स्पर्धा मूल्यमापन / गुणदान कसे असेल येथे क्लिक करा.


शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची उत्कृष्ट व्हिडिओचे निकष 
साठी 

येथे क्लिक करा

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३  कालावधी निवड समिती रचना 

येथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या