Quality Educational Video Production Competition 2023 for Teachers
शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३
In order to create competition among teachers and create a movement of e-literature production, an open competition for the production of quality educational videos is being organized by the government for the primary/secondary/higher secondary/teacher trainer level teachers, principals of all media in the state.
In today's modern times, online education has a unique importance. Information Communication and Technology (ICT) technology is currently being widely used as a step towards knowledge sharing and capacity building of teachers, teacher trainers and students through educational technology. This has created a unique importance of digital education.
शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजित करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४१ / एसडी-४ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२. यांच्या मार्फत दिनांक :- ११ मे २०२३. रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
शासन निर्णय-
शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या स्पर्धेचा माहिती खालीलप्रमाणे.
| अ.क्र | इयत्ता | विषय | शै. व्हिडिओ प्रकार |
|---|---|---|---|
| १ | इ. १ ली व ३ री | भाषा, गणित, इंग्रजी | ● कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर करून स्वतः व्हिडीओ तयार करणे. ● स्वतः स्क्रीन रेकोर्ड करून तयार केलेला व्हिडीओ |
| २ | ३ री ते ५ वी | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे | ● स्वतः केलेला Animated व्हिडओ ● स्वतः पेन टॅबलेटचा वापर करून बिवलेला व्हिडीओ. |
| ३ | ६ वी ते ८ वी | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे | ● Immersive eContent (Augmented Reality / Virtual Reality / Virtual Lab/ 360 Degree/ Simulations) वर आर्धाशरत व्हिडीओ |
| ४ | ९ वी ते १० वी | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे | ● खेळावर आर्धाशरत व्हिडीओ (Gamification) ● ई-चाचणीवर आधारीत व्हिडीओ (E-assessments) |
| ५ | ११ वी ते १२ वी | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे | ● शासन प्रणालीवर आधारीत केलेला व्हिडीओ |
| ६ | अध्यापक विद्यालय | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, शिक्षक प्रशिक्षण निगडित अधुनिक प्रवाह | ●दिव्यांगत्व प्रकारानुसार अध्यनासाठी व्हिडिओ . |
व्हिडिओ कसा अपलोड करावा?-
शिक्षकांनी आपले तयार केलेले व्हिडीओ आपल्या गुगल ड्राईव्ह (Google Drive) ला अपलोड करून Anyone. With link करून Editor त्याचा Access हा ठेवावा व सदरची लिंक ही उपलब्ध देण्यात येणाऱ्या प्रणालीवर अपलोड करण्यात यावी.
स्पर्धेचे आयोजन (तालुका/ जिल्हा/ राज्य स्तर)-
| अ.क्र | स्पर्धेचा प्रकार | गट | विषय व पुरस्कार | जबाबदार व्यक्ती |
|---|---|---|---|---|
| १ | तालुका पुरस्कार | इयत्ता १ ली व री | भाषा, गणित, इंग्रजी प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतिय | गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी |
| २ | तालुका पुरस्कार | ३ री ते ५ वी | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतिय | गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी |
| ३ | तालुका पुरस्कार | ६ वी ते ८ वी | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतिय | गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी |
| ४ | तालुका पुरस्कार | ९ वी ते १० वी | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतिय | गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी |
| ५ | तालुका पुरस्कार | ११ वी ते १२ वी | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतिय | गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी |
| ६ | तालुका पुरस्कार | अध्यापक विद्यालय | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, शिक्षक प्रशिक्षण निगडित अधुनिक प्रवाह प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतिय | गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी |
| वरीलप्रमाणे | जिल्हा, राज्य स्तरावरील | नियोजन असणार आहे. | जिल्हा पुरस्कार - ८४, राज्य पुरस्कार - ८४ | असणार आहेत. |
वरीलप्रमाणे जिल्हा, राज्य स्तरावरील नियोजन असणार आहे. जिल्हा पुरस्कार - ८४, राज्य पुरस्कार - ८४ असणार आहेत. जिल्हा पुरस्कार - जबाबदार संस्था जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, राज्य पुरस्कार -जबाबदार संस्था जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था असणार आहे.
पारितोषिक स्वरूप-
| अ.क्र | स्तर | क्रमांक | बक्षिसाचे स्वरूप |
|---|---|---|---|
| ०१ | तालुका स्तर | प्रथम क्रमांक | (रू. ५०००/- रोख व प्रमाणपत्र) |
| द्वितीय क्रमांक | (रू. ४०००/- रोख व प्रमाणपत्र) | ||
| तृतीय क्रमांक | (रू. ३०००/- रोख व प्रमाणपत्र) | ||
| ०२ | जिल्हा स्तर | प्रथम क्रमांक | (रू. १०,०००/- रोख व प्रमाणपत्र) |
| द्वितीय क्रमांक | (रू. ९०००/- रोख व प्रमाणपत्र) | ||
| तृतीय क्रमांक | (रू. ८०००/- रोख व प्रमाणपत्र) | ||
| ०३ | राज्य स्तर | प्रथम क्रमांक | (रू. ५०,०००/- रोख व प्रमाणपत्र) |
| द्वितीय क्रमांक | (रू. ४०,०००/- रोख व प्रमाणपत्र) | ||
| तृतीय क्रमांक | (रू. ३०,०००/- रोख व प्रमाणपत्र) |
व्हिडिओ स्पर्धा मूल्यमापन / गुणदान
व्हिडीओ उमेदवारांचे मूल्यमापन / गुणदान करण्यासाठी खालील निकषांचा वापर करावा. आपण व्हिडिओ बनवत असताना खालील निकषांचा विचर करून व्हिडिओ निर्मिती करावी. गुणादानासाठी विविध घटक देण्यात आलेले आहेत. त्या घटकांचा विचार करून त्यानुसार आपल्या व्हिडिओचे नियोजन करून त्या प्रमाणे व्हिडिओ निर्मिती करावी. जेणे करून आपणास अधिकाधिक गुण प्रप्त होतील.
| अ.क्र | निकष | गुण | तपशील |
|---|---|---|---|
| ०१ | स्पष्टपणा (Simplicity) | १५ | प्रस्तावना, शीर्षक, उदिष्ट/अध्ययन निष्पत्ती लेखन, समस्या मांडणी विद्यार्थीकेंद्रित आशय |
| ०२ | गरजाधष्ठितपणा (Relevance) | १५ | शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा प्रमुख यासाठी उपयुक्त, शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या गरजा, कार्य स्पष्टता. |
| ०३ | परिणाम (Impact) | १५ | विविध लाभार्थी, जिल्हा/ राज्य / राष्ट्रीय / आंतर राष्ट्रीय विविध स्तरावर कार्य, आलेख, सांख्यिकी वापर |
| ०४ | नाविण्यता (Creativity) | १५ | शैक्षणिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर २१ व्या शतकातील कौशल्ये यापर, नवीन संकल्पना, योग्य editing |
| ०५ | समन्वय (Engagement) | १५ | स्थानिक, देश-विदेशातील तज्ञांचे अनुभव, विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा प्रमुख यांचा समावेश, पुरावे |
| ०६ | उपयोगिता (Reusability) | १५ | इतर वर्ग, शाळा, क्षेत्र येथे वापर, सांख्यिकी वापर |
| ०७ | चित्रफित दर्जा (Video Quality) | १० | रंगसंगती, ओळख, उद्दिष्टे, कृती, यशोगाथा, लाभार्थी मते, size, चुकीचे शब्दप्रयोग |
| एकूण | १०० |
आपला व्हिडिओ बनवत असताना वरील बाबींचा विचार करून व्हिडिओ बनवावा. व्हिडिओ बनवत असताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे -स्पष्टपणा (Simplicity), गरजाधष्ठितपणा (Relevance) परिणाम (Impact) नाविण्यता (Creativity) समन्वय (Engagement) उपयोगिता (Reusability) यांचा विचार करून आपला व्हिडिओ तयार करावा.
-min.png)
0 टिप्पण्या