शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३
शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजित करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४१ / एसडी-४ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२. यांच्या मार्फत दिनांक :- ११ मे २०२३. रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
आजच्या आधुनिक काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. शैक्षणिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान (ICT) तंत्रज्ञानाचा सध्या मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसत आहे. यामुळे डिजिटल शिक्षणाचे वेगळेच महत्त्व निर्माण झालेले आहे. कोविड-१९ काळात प्रत्यक्ष शाळा बंद असताना ऑनलाईन शिक्षणाच्या विविध माध्यमाद्वारे व साधनांद्वारे वर्गावर्गातून अध्ययन-अध्यापन प्रणाली घडतांना दिसून येत होती.
शिक्षक, विद्यार्थी कधी शाळेच्या ओट्यावर, कधी शेतात, कधी मंदिराच्या ओट्यावर, कधी निवासी पार्किंग मध्ये तर कधी गल्लीतील चौकात एकत्र येवून ऑनलाईन प्रणालीने अभ्यास. चाचण्या पूर्ण करतांना दिसत होते. शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले अध्यापन अधिक रंजक आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच विद्यार्थी याच डिजिटल साधनांचा वापर करून आपले अध्यापन सुकर करताना आढळून येत आहे. राज्यामधील शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही चळवळ अधिक सक्रीय होऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचेमार्फत राज्यातील २.८९.५६० शिक्षक हे तंत्रस्नेही झाल्याचे आढळून आले आहे.
शिक्षकांनी फक्त आपापले वर्गच ऑनलाईन घेतलेले नाहीत तर स्वतःच्या विद्यार्थ्यांनाही तंत्रस्नेही केलेले आहे, ज्यामुळे आज राज्यातील विद्यार्थी स्वतः डिजिटल साहित्य तयार करून आपले शिक्षण मनोरंजक करत आहेत. देशातील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधून विविध साहित्य वापरत आहेत. उदा. शैक्षणिक व्हिडीओ, मनोरंजक खेळ, AI/AR/VR वापर करून बनविलेले ई-साहित्य, कृतियुक्त PDF, आनंददायी PPT, पोस्टर्स, प्रमाणपत्रे आदी. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्यापन करत असताना शिक्षकांमार्फत बनवले गेलेले ई-साहित्य हे जास्त परिणामकारक असल्याचे दिसून येते.
शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक-प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजित शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय-
शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या स्पर्धेचा माहिती खालीलप्रमाणे.
| अ.क्र | इयत्ता | विषय | शै. व्हिडिओ प्रकार |
|---|---|---|---|
| १ | इ. १ ली व ३ री | भाषा, गणित, इंग्रजी | ● कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर करून स्वतः व्हिडीओ तयार करणे. ● स्वतः स्क्रीन रेकोर्ड करून तयार केलेला व्हिडीओ |
| २ | ३ री ते ५ वी | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे | ● स्वतः केलेला Animated व्हिडओ ● स्वतः पेन टॅबलेटचा वापर करून बिवलेला व्हिडीओ. |
| ३ | ६ वी ते ८ वी | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे | ● Immersive eContent (Augmented Reality / Virtual Reality / Virtual Lab/ 360 Degree/ Simulations) वर आर्धाशरत व्हिडीओ |
| ४ | ९ वी ते १० वी | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे | ● खेळावर आर्धाशरत व्हिडीओ (Gamification) ● ई-चाचणीवर आधारीत व्हिडीओ (E-assessments) |
| ५ | ११ वी ते १२ वी | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे | ● शासन प्रणालीवर आधारीत केलेला व्हिडीओ |
| ६ | अध्यापक विद्यालय | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, शिक्षक प्रशिक्षण निगडित अधुनिक प्रवाह | ●दिव्यांगत्व प्रकारानुसार अध्यनासाठी व्हिडिओ . |
व्हिडिओ कसा अपलोड करावा?-
शिक्षकांनी आपले तयार केलेले व्हिडीओ आपल्या गुगल ड्राईव्ह (Google Drive) ला अपलोड करून Anyone. With link करून Editor त्याचा Access हा ठेवावा व सदरची लिंक ही उपलब्ध देण्यात येणाऱ्या प्रणालीवर अपलोड करण्यात यावी.
स्पर्धेचे आयोजन (तालुका/ जिल्हा/ राज्य स्तर)-
| अ.क्र | स्पर्धेचा प्रकार | गट | विषय व पुरस्कार | जबाबदार व्यक्ती |
|---|---|---|---|---|
| १ | तालुका पुरस्कार | इयत्ता १ ली व री | भाषा, गणित, इंग्रजी प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतिय | गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी |
| २ | तालुका पुरस्कार | ३ री ते ५ वी | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतिय | गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी |
| ३ | तालुका पुरस्कार | ६ वी ते ८ वी | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतिय | गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी |
| ४ | तालुका पुरस्कार | ९ वी ते १० वी | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतिय | गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी |
| ५ | तालुका पुरस्कार | ११ वी ते १२ वी | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतिय | गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी |
| ६ | तालुका पुरस्कार | अध्यापक विद्यालय | भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, शिक्षक प्रशिक्षण निगडित अधुनिक प्रवाह प्रत्येक विषयात प्रत्येकी एक १) प्रथम २) द्वितीय ३) तृतिय | गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी |
| वरीलप्रमाणे | जिल्हा, राज्य स्तरावरील | नियोजन असणार आहे. | जिल्हा पुरस्कार - ८४, राज्य पुरस्कार - ८४ | असणार आहेत. |
वरीलप्रमाणे जिल्हा, राज्य स्तरावरील नियोजन असणार आहे. जिल्हा पुरस्कार - ८४, राज्य पुरस्कार - ८४ असणार आहेत. जिल्हा पुरस्कार - जबाबदार संस्था जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, राज्य पुरस्कार -जबाबदार संस्था जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था असणार आहे.
पारितोषिक स्वरूप-
व्हिडिओ स्पर्धा ही जिल्हा, राज्य स्तरावरील नियोजन असणार आहे.तालुका पुरस्कार - ८४, जिल्हा पुरस्कार - ८४, राज्य पुरस्कार - ८४ असणार आहेत. जिल्हा पुरस्कार - जबाबदार संस्था जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, राज्य पुरस्कार -जबाबदार संस्था जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था घेतली जाणार आहे यासाठी दिले जाणारे पुरस्कार व त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल-
| अ.क्र | स्तर | क्रमांक | बक्षिसाचे स्वरूप |
|---|---|---|---|
| ०१ | तालुका स्तर | प्रथम क्रमांक | (रू. ५०००/- रोख व प्रमाणपत्र) |
| द्वितीय क्रमांक | (रू. ४०००/- रोख व प्रमाणपत्र) | ||
| तृतीय क्रमांक | (रू. ३०००/- रोख व प्रमाणपत्र) | ||
| ०२ | जिल्हा स्तर | प्रथम क्रमांक | (रू. १०,०००/- रोख व प्रमाणपत्र) |
| द्वितीय क्रमांक | (रू. ९०००/- रोख व प्रमाणपत्र) | ||
| तृतीय क्रमांक | (रू. ८०००/- रोख व प्रमाणपत्र) | ||
| ०३ | राज्य स्तर | प्रथम क्रमांक | (रू. ५०,०००/- रोख व प्रमाणपत्र) |
| द्वितीय क्रमांक | (रू. ४०,०००/- रोख व प्रमाणपत्र) | ||
| तृतीय क्रमांक | (रू. ३०,०००/- रोख व प्रमाणपत्र) |

0 टिप्पण्या