Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रप्रमुख प्रशासकीय कर्तव्ये

 

अ) केंद्रप्रमुख प्रशासकीय कर्तव्ये

शाळा भेटी, तपासणी व पर्यवेक्षणाबाबत-

१) समूहातील सर्व प्राथमिक शाळा, बालवाड्या, अंगणवाड्या, महिला प्रबोधन केंद्र, ग्रामीण वाचनालये. अनौपचारिक शिक्षण केंद्रे, आश्रमशाळा, प्रौढ शिक्षण केंद्र यांना नियमित भेटी देणे.

२) प्राथमिक शाळा भेटीमध्ये दरमहा किमान एक भेट अचानक (स्थूलमानाने) व एक भेट पूर्वनियोजित असावी. पूर्वनियोजित भेटीच्या वेळी शाळा सुरू होण्यापूर्वी उपस्थित राहून पूर्ण दिवसभराचे कामकाज पाहणे व शाळा सुटल्यावर शिक्षकांची बैठक घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे. 



३) समूहातील सर्व शिक्षक नियमितपणे शाळेत येतात याची समक्ष पडताळणी करणे.

४) महिन्यातून किमान दोन ग्रामशिक्षण समिती शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकींना उपस्थित राहून मार्गदर्शन करणे. (दर महिन्याच्या वेगवेगळ्या ग्रामशिक्षण समिती / शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीस उपस्थित राहणे) 

५) ग्रामशिक्षण समिती / शाळा व्यवस्थापन समितीच्या कामकाजाची माहिती घेणे व शाळांना तात्काळ पर्यायी शिक्षकाची व्यवस्था करणे.

६) अनियमित, कामचुकार शिक्षकांवर योग्य ती कारवाई होण्यासाठी वरिष्ठांकडे शिफारस करणे.

७) कोणतीही शाळा शिक्षकांविना राहणार नाही याची दक्षता घेणे व शाळांमध्ये तात्काळ पर्यायी शिक्षकाची व्यवस्था करणे.

८) समूहातील सर्व शाळांचे अभिलेख, दस्तऐवज, डेडस्टॉक, शैक्षणिक साधने, नोंदवह्या इत्यादी अद्ययावत व सुस्थितीत राहतील यासाठी शाळांना आवश्यक त्या सूचना देणे. 

९) केंद्रातील सर्व शिक्षक शाळेच्या गावी राहतात याची खात्री करणे 

१०) शाळा सुधार योजना, शैक्षणिक उठाव, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, गणवेश वाटप, मुलींचा उपस्थिती भत्ता, पुस्तकपेढी योजना, शालेय पोषण आहार योजना, वैद्यकीय तपासणी इ. कार्यक्रमांचा आढावा घेऊन त्यांची व्याप्ती व उपयुक्तता वाढविण्यासाठी प्रेरक म्हणून काम करणे.

११) दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होईल यासाठी आवश्यक ते नियोजन व त्यानुसार कार्यवाही करणे. वैदयकीय दोष आढळलेल्या विदयार्थ्यांवर योग्य ते उपचार होतील असे पाहणे.

१२) मुले शाळेत रमावीत याकरिता प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासाला पोषक असे विविध उपक्रम सर्व शाळांमधून राबविणे.

१३) गटशिक्षणाधिकारी यांनी सोपविलेल्या शाळांची वार्षिक तपासणी करणे.

 

अ) कार्यालयीन कर्तव्ये

 

१) प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपूर्वी शाळा भेटीचा संभाव्य कार्यक्रम विस्तार अधिकारी (शिक्षण) यांच्याकडे सादर करणे. 

२) दर महिन्याच्या ५ तारखेपूर्वी मागील महिन्याची मासिक दैनंदिनी, विहित नमुन्यात भेटीच्या सविस्तर अभिप्रायासह विस्तार अधिकारी (शिक्षण) यांच्यामार्फत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करणे.

३) केंद्र शिक्षण सल्लागार समितीची दरमहा एखादी बैठक आयोजित करणे व अशा बैठकीत घेतलेल्या निर्णयावर कार्यवाही करणे. 

४) केंद्रप्रमुखांनी कार्यालयाचे दप्तर अद्ययावत ठेवणे. केंद्रशाळेत स्वतःचे हजेरी रजिस्टर व हालचाल रजिस्टर ठेवणे.

५) केंद्रातील कोणत्याही शाळेच्या ठिकाणी आठवड्यातून किमान दोन मुक्काम करणे. 

६) प्रत्येक केंद्रप्रमुखाने आपल्या वार्षिक कामाचा तपशीलवार आरसा म्हणून दरवर्षी एक याप्रमाणे केंद्र रजिस्टर ठेवावे व ते नियमित आपल्याबरोबर ठेवावे.

७) केंद्रप्रमुखांनी केंद्र कार्यालयात शासन निर्णय, परिपत्रके यांची अद्ययावत फाईल ठेवणे. 

८) केंद्रातील शाळांसंबंधीच्या विविध योजना, उपक्रमांबाबतचे मासिक/त्रैमासिक अहवाल विहित कालमर्यादित गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सादर करणे.

 

९) दरवर्षी तीस सप्टेंबरच्या विदयार्थी पटाच्या आधारे शाळानिहाय शिक्षक निश्चित करण्यासाठी विस्तार अधिकारी (शिक्षण) यांना सहकार्य करणे. केंद्राचा ३० सप्टेंबर अखेरचा सांख्यिकीय अहवाल ३० ऑक्टोबर पर्यंत सादर करणे. 

१०) मुख्याध्यापकांचे लॉगबुक प्रत्येक भेटीत तपासणे तसेच मुख्याध्यापक स्वतः अध्यापन करतात का याची पाहणी करणे.

११) वरिष्ठांकडे करावयाचा पत्रव्यवहार विस्तार अधिकारी (शिक्षण) यांच्यामार्फत करणे. 

१२) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे.

१३) अनधिकृत गैरहजर असणाऱ्या शिक्षकांची माहिती योग्य त्या शिफारशींसह वरिष्ठांकडे पाठविणे. 

१४) समूहातील सर्व शिक्षकांचे गोपनीय अभिलेख लिहिणे, तसेच सदर गोपनीय अभिलेख पुनर्विलोकनासाठी विस्तार अधिकारी (शिक्षण) यांच्याकडे सादर करणे.

१५) प्राथमिक शाळांतील चाचण्या / सत्र परीक्षा व क्षमता चाचण्या यांचे व्यवस्थापन करणे.

 

क) शैक्षणिक कर्तव्ये

 

१) शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासंदर्भातील कर्तव्ये

१) दरवर्षी शाळेत दाखल करावयाच्या मुलामुलीचे १०० टक्के सर्वेक्षण शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यामा करवून घेणे. 

२) पटनोंदणीचे शाळानिहाय लक्ष्य निश्चित करून ३१ जुलैपूर्वी दाखलपात्र मुलामुलीची १०० टक्के पट नोदणी झाली याची खात्री करणे.  ५ टक्के पटनोंदणी प्रत्यक्ष पडताळणे. 

३) ६ ते १४ वयोगटातील एकही मूल शाळेबाहेर राहणार नाही यासाठी संबंधित शिक्षक मुख्याध्यापक, पालव आणि ग्रामशिक्षण समिती / शाळा व्यवस्थापन समिती व सदस्य यांच्यामार्फत विशेष प्रयत्न करणे.

४) प्रत्येक मूल शाळेत नियमित उपस्थित राहील व शाळेची सरासरी उपस्थिती ९५ टक्क्यांपेक्षा कमी राहणार नाही याची खबरदारी घेणे, यासाठी पालक गटांचे शिक्षकनिहाय नियोजन करून अशा भेट नियमितपणे होतात याची वेळच्या वेळी पाहणी करणे.

५) प्रत्येक विदयार्थी विषयनिहाय किमान अध्ययन क्षमता संपादन करील या दृष्टीने शिक्षकांना उद्दिष्टं ठरवून देणे व त्याची कार्यवाही होत आहे, याबाबत पुढील भेटीत खात्री करणे.

६) प्रत्येक शाळेत पटनोंदणी, सरासरी उपस्थिती, गळती व स्थगिती यांची लक्ष्ये ठरवून देणे व ती साध्य करण्याचा कटाक्षाने प्रयत्न करणे. 

७) केंद्र परिसरातील अपंग, मागासवर्गीय, आदिवासी, मतिमंद व मुली इत्यादींसाठी असणाऱ्या शासनाच्या अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे, सुधारगृहे इत्यादींची माहिती पालकांना देऊन पात्र मुलामुलींना त्या त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत व मार्गदर्शन करणे.

८) वरचेवर गैरहजर राहणाऱ्या विदयार्थ्यांची वैयक्तिक माहिती घेऊन असे विद्यार्थी उपस्थित राहतील यासाठी संबंधित शिक्षकांवर निश्चित जबाबदारी सोपविणे.

९) शासनाकडून मिळालेल्या अनुदानाचा अध्यापन व अध्ययन प्रक्रिया आनंददायी होण्यासाठी पुरेपूर वापर करणे. 

१०) केंद्रातील शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबाबतची जबाबदारी आपल्यावर आहे याचे भान ठेवणे.

 

 

२) अध्यापन व मूल्यमापनविषयक कर्तव्ये 

 

१) केंद्र प्रमुखाने केंद्रशाळेत आठवड्यातील किमान चार तासिका अध्यापन करणे.

२) प्रत्येक शाळेतील सर्व मुलामुलींची त्रैमासिक, क्षमताधिष्ठित चाचणी घेणे ज्यामध्ये ज्यांनी क्षमतांबाबतची संपादणूक केलेली नाही, त्यांच्यासाठी उपचारात्मक अध्यापन करवून घेणे. 

३) शासकीय विद्यावेतन प्रवेश परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, विषयाच्या बहिस्थ परीक्षा इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी मुलांची निवड शाळा सुरू झाल्यानंतर एक महिन्याच्या आत करण्याबाबत शिक्षकांना सूचना देणे व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल असे पाहणे.

५) गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने परिसरात असलेल्या माध्यमिक शाळा व इतर शैक्षणिक संस्थांचे आवश्यक ते सहकार्य मिळविणे, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड व इतर योजनांतर्गत प्राप्त झालेल्या साहित्याचा योग्य प्रकारे उपयोग होत आहे याची खात्री करणे व आवश्यक तेथे वापराबाबत व निगा ठेवण्याबाबत मार्गदर्शन करणे.

६) उपलब्ध साधनामधून व कमी खर्चात शैक्षणिक साहित्य / स्वयं अध्ययन साहित्य तयार करण्यासाठी केंद्रातील शिक्षकांना मार्गदर्शन करणे, त्यासाठी कृतिसत्र घेणे..

७) प्रत्येक शाळेत क्षमताधिष्ठित मूल्यमापनाचे रजिस्टर ठेवले जाईल व ते वेळच्या वेळी भरले जाईल है। पाहणे. सर्व शिक्षकांच्या व मुख्याध्यापकांच्या कार्याचे वर्षअखेरीस मूल्यमापन करणे, त्या अनुषंगाने गोपनीय अभिलेखात त्याचे प्रतिबिंब उमटेल असे पाहणे, वस्तुनिष्ठपणे गोपनीय अभिलेख लिहिणे. 

८) प्रत्येक शाळेत केंद्रप्रमुखाने आपल्या सूचना नोंदविण्यासाठी २०० पानी फुलस्केप बाऊंड बुक स्वतंत्र रजिस्टर केंद्रप्रमुख लोगबुक' म्हणून ठेवावे व त्यामध्ये भेटीच्या वेळी नोंदी कराव्यात. 

९) सखोल शाळाभेटीच्या वेळी प्रत्येक शिक्षकाने केलेले काम, मुलांची तयारी व मुलांकडून करवून घेतलेले स्वाध्याय, गृहपाठ, प्रयोग इत्यादी बाबी प्रत्यक्ष पडताळून पाहणे (सदर पाहणी वर्गशिक्षक, विषयशिक्षक व शिक्षक निहाय करावी.)

 

(१०) सर्व मुख्याध्यापक व शिक्षक आपापली कर्तव्ये नीट पार पाडतात किंवा नाही याची वरचेयर पाहणी करून त्यांना त्याबाबत गरजेअंती जाणीव करून देणे.

 

११) रेडिओ, टी. व्ही., टेपरेकॉर्डर, व्हीसीआर, ओव्हरहेड प्रोजेक्टर, संगणक इत्यादी आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाची आपण माहिती करवून घेणे व त्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करणे, त्यांची निगा ठेवणे व परिणामकारकता वाढविण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देणे.

 

शालेय नियोजनविषयक कर्तव्ये

 

१) अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तिका व शिक्षक हस्तपुस्तिका यांच्या आधारे अध्यापन प्रक्रियेचे नियोजन करून घेणे. नियोजनानुसार कार्यवाहीबाबत खबरदारी घेणे.

२) शिक्षकाने केलेल्या अध्यापन प्रक्रियेबाबत पाक्षिक / मासिक आढावा घेणे व राहिलेला अभ्यासक्रम व त्रुटींबाबत सूचना देऊन पूर्तता करून घेणे.

३) चाचणी परीक्षा व सत्र परीक्षांचे नियोजन करणे व कार्यवाही करणे. (जिल्हा नियाजनाप्रमाणे) ४) निबंध, गृहपाठ, प्रयोग, प्रात्यक्षिके, निरीक्षणे, स्वाध्याय इ. विदयार्थ्यांकडून करवून घ्यावयाच्या सर्व शालेय वर्षाच्या सुरवातीलाच इयत्तानिहाय व वनाय भौतिक लक्ष्य भेटीच्या वेळी त्याच्या अंमलबजावणीबाबत कटाक्षाने लक्ष देणे व ५ टक्के कामाची पडताळणी भेटीच्या वेळी स्वत: करने. 

५) शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांची गटसंमेलने, मेळावे, चर्चासत्र, कृतिसत्र, उद्बोधन वर्ष नमुनापाठ, स्नेहसंमेलने इत्यादी महिन्यातून एकदा आयोजित करावी. त्यांचे वार्षिक नियोजन करावे. त्यास केंद्र सल्लागार समितीची मान्यता घ्यावी. त्यासाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवून त्यामध्ये शिक्षकांची उपस्थिती व थोडक्यात कार्यवृत्तांत नोंदवावेत.

 

६) समूहातील सर्व शाळा स्तरावर, आंतरशालेय स्तरावर सहशालेय कार्यक्रमाचे नियोजन करून घ्यावे. शक्य तेथे शाळा एकत्र करून विविध खेळ, सांस्कृतिक स्पर्धा घ्याव्या व विदयार्थी / शाळांना बक्षिसे व प्रमाणपत्रे दयावीत.

७) जिल्हा परिषद, शासन व स्थानिक पातळीवरून आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे प्रभावी नियोजन, आयोजन व कार्यवाही करणे,

८) विविध राष्ट्रीय सण, सांस्कृतिक कार्यक्रम, बालसभा इ. चा वार्षिक आराखडा तयार करून त्यानुसार सर्व शाळांत कार्यवाही करून घ्यावी,

९) शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची प्रभावी अंमबजावणीच्या स्वरूपात आवश्यक ती कार्यवाही करणे. योजनेची माहिती घेणे, लाभार्थी निवडणे, त्यांना वेळेवर योजनेचा लाभ देणे व नियमित अहवाल पाठविणे.

१०) दरवर्षी समूहातील शाळांची प्रतवारी वस्तुनिष्ठपणे निश्चित केली आहे किंवा नाही ते पाहणे. प्रतवारी उंचावण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी शाळांना मार्गदर्शन करणे.

११) प्रत्येक प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी व शाळेने दर महिन्यात कोणकोणती शैक्षणिक कामे करावयाची याची सुरुवातीलाच माहिती देणे व त्यानुसार कार्यवाही करून घेणे.

१२) पालक मेळावे, माता मेळावे, शिबिरे, नवसाक्षर मेळावे इ. अनुषंगिक मेळाव्यांचे आयोजन करणे व मार्गदर्शन करणे.

१३) शाळा सुधार योजना, शैक्षणिक उठाव, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, गणवेश वाटप, पुस्तक पतपेढी योजना, उपस्थिती भत्ता, शालेय पोषण आहार इ. कार्यक्रमांचा आढावा घेऊन त्यांची व्याप्ती व उपयुक्तता वाढविण्यासाठी प्रेरक म्हणून काम करणे.

१४) केंद्रांतर्गत शाळांतील घटक शाळांचे सहशालेय उपक्रमांचे वार्षिक नियोजन करून घेणे. 

१५) शैक्षणिक वर्षांरंभीच शाळा व शिक्षक निहाय वर्ग व विषय वाटप करून देणे.

१६) केंद्रांतर्गत शाळांतील सर्व शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी वार्षिक नियोजन करणे.

१७) केंद्रांतर्गत शाळांमधील १०० टक्के विदयार्थ्यांची वैदयकीय तपासणी करण्यासाठी नियोजन व पाठपुरावा करणे.

१८) विद्यार्थी व शिक्षक यांचेसाठी शारीरिक शिक्षणविषयक प्रशिक्षण आयोजित करणे.

१९) शिक्षकांचे वार्षिक शैक्षणिक स्नेहसंमेलन आयोजित करणे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या