मोफत पाठ्यपुस्तक योजना सन २०२३-२४ | पाठ्यपुस्तक कशी प्राप्त होणार?
प्राथमिक शिक्षणाचे उदिष्ट साथ करण्यासाठी व शालेय शिक्षणातील विद्यार्थ्याचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता १ ली ते इयत्ता ८ च्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके पुरविण्यात येतात. सन २०२३-२४ करीता देखील अशी पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत.
समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या मार्फत जा.क्र. मप्राशिष सशि/मोघा / २०२३-२४/१५४१ या जावक क्रमांकाने एक पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. या पत्रकासाठी देण्यात आलेले संदर्भ-
वाचा :- १) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ दिनांक 31 MAY 2023
२) महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम २०१९
३) दिनांक २४/०४/२०१३ रोजीचे भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ (PAB) च्या बैठकीचे मंजूर इतिवृत्त,
४) शासनाचे पत्र क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.२४८/एसडी-१, दि. १५ मे २०२३
विषय: समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०१३-१४ मध्ये इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याबाबत.
प्रस्तावना:- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ ची स २०१८-१९ पासून समग्र शिक्षा कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षणाचे उदिष्ट साथ करण्यासाठी व शालेय शिक्षणातील विद्यार्थ्याचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता १ ली ते इयत्ता ८ च्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके पुरविण्याकरीता केंद्रशासनाकडून मंजूरी मिळालेली आहे.
पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती पुणे ही संस्था करते. सदर पाठ्यपुस्तक मंडळाकडून इ. १ ली ते ८ वी करीता मराठी, हिंदी, उर्दू इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलगु सिंधी अबी तामिळ व बंगाली माध्यमातील पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात 4 येणार आहे. शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून निश्चिन केलेल्या वाहतूकदारांकडून पाठयपुस्तकांची वाहतूक बालभारती गोडाऊन ते तालुका स्तरापर्यंत करण्यात येते
२. पाठ्यपुस्तक योजनेचे आर्थिक निकष :
२.१ ) सन २०२३ २४ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांकरीता १७.५२.११४ विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तर (इ. १ ली ते ५ वी) प्रति विद्यार्थी सरासरी रु. २५०/- व उच्च प्राथमिक स्तर (इ. ६ वी ते इ. ८ वी) प्रति विद्यार्थी सरासरी रु ४००/- या दराने रु. ३,३४,१०,६१,७५०/- लाख तरतूदीस मंजूरी देण्यात आलेली आली आहे.
२. २) तालुका ते शाळास्तरापर्यंत पाठयपुस्तकांच्या वाहतूकीचा खर्च व तदअनुषंगीक खर्च (पुस्तकांची चढाई, उतराई हमाली खर्च इ.) वगळता देय तरतूद राज्य स्तरावरून अदायगी करण्यात येईल.
२.३) राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेस्तरावरुन निश्चित केलेल्या व शासनाने मान्यता दिलेल्या " शिरीष काग सव्हिसेस प्रा.लि, मुंबई या वाहतूकदाराकडून पाठयपुस्तकांची वाहतूक, विभागीय बालभारती पाठयपुस्तके भांडार ते तालुकास्तरापर्यंत करण्यात येणार आहे.
२.४) तालुका ते शाळास्तरापर्यंत पाठयपुस्तकांच्या वाहतूकीचा खर्च व तद्नुषंगिक खर्च (पुस्तके चढाई व उतराई, हमाली खर्च इ.) संबंधित जिल्हा / तालुकास्तरावरून सर्व वित्तीय नियमांचे पालन करून निविदा प्रक्रियेद्वारे करावी व त्या वाहतूकीचा दर हा शालेय पोषण आहार योजनेच्या तांदूळ वाहतूकीच्या दराप्रमाणे म्हणजेच प्रती किग्रॅ रु.१.५०/- चे मर्यादेतच करण्याची दक्षता घेण्यात यावी. प्रती किग्रॅ रु.१५०/- पेक्षा जास्त वाहतूक दर मान्य केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
२.५) सन २०२३-२४ ची तालुका ते शाळास्तरापर्यंतची पाठयपुस्तकांची वाहतूक व तद्नुषंगिक खर्चाची देयके सन २०२३ २४ याच आर्थिक वर्षात समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठयपुस्तके या लेखाशिर्षाखाली निकाली काढण्यात यावी. सदर देयकांच्या अदायगी, पुढील आर्थिक वर्षात अनुज्ञेय राहणार नाही.
पाठ्यपुस्तकांची मागणी व वाहतूक :
३.१) सन २०२३ २४ साठी पाठयपुस्तकांची मागणी पाठयपुस्तक मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने यापूर्वीच करण्यात आलेली आहे. विद्यार्थी संख्येपेक्षा जादा पाठयपुस्तकांच्या देयकांची अदायगी केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
३.२) सन २०२३ २४ मध्ये विभागीय बालभारती पाठयपुस्तके भांडार (गोदाम) ते तालुकास्तरापर्यंतची वाहतूक राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे कार्यालयामार्फत निश्चित केलेल्या वाहतूकदाराकडून करण्यात येणार आहे.
३. ३) पाठयपुस्तके शाळांना पोहोच केल्यानंतर याबाबतच्या सर्व पोहोच पावत्या व खर्चाची देयके संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद यांचेकडे एका महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक राहील.
३.४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व तसेच शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, महानगरपालिका सर्व यांनी पोहोच पावत्या व झालेल्या खर्चाचे देयके प्रति स्वाक्षरीत करून वाहतूकदारांची देयके त्याच आर्थिक वर्षात तात्काळ अदा करण्याची कार्यवाही करावी. सदर वाहतूकीसाठी, वाहतूकीपूर्वी कोणत्याही स्वरूपाचे अग्रोम अनुज्ञेय नाही, याची नोंद घ्यावी.
(४) पाठ्यपुस्तके वितरणाची कार्यवाही :
४. १ ) शाळा सुरु होण्यापूर्वी, विद्यार्थ्याचे पालक, विद्याथ्र्यांसाठी पाठयपुस्तके खरेदी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सर्व पालक व विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या अनुषंगाने सर्व विद्याथ्र्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात येणार आहेत, याबाबतची पूर्वसूचना टळक अक्षरात शाळेच्या दर्शनी भागावर व सर्वांना दिसेल अशा ठिकाणी फलकावर (Board) वर लिहिण्यात यावी. मराठी शिवाय इतर माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यमानुसार अन्य भाषेत देखील सदर सूचना लिहिण्यात यावी. आपल्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या सभासदांना माता -पालक संघ यांची एकत्रितपणे सभा घेऊन मोफत पाठ्यपुस्तक योजना व वितरणाबाबतची माहिती देण्यात यावी. पालकांनी आपल्या वास्तव्याच्या परिसरात व त्यांचे कार्यक्षेत्रात सदर माहितीचा प्रसार करणेबाबत सूचना देण्यात याव्यात.
४. २) याकरीता शक्य झाल्यास मोफत पाठ्यपुस्तके योजनेबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रसार माध्यमांचे सहकार्य घेऊन सदर उपक्रमाच्या अनुषंगाने विनामूल्य प्रसिद्धी द्यावी
. ४. ३) कोणत्याही विनाअनुदानित शाळेस सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय असणार नाही, याची नोंद घ्यावी.
(५) पाठयपुस्तकांचा पुरवठा :
५.१) तालुका स्तरावर पुस्तके प्राप्त झाल्यानंतर ते तात्काळ माध्यमनिहाय, इयत्तानिहाय व विषयनिहाय संच वर्गीकरण करून घ्यावेत व संबंधित शाळांकडे विनाविलंब वितरण करण्यात यावेत. पुस्तके तालुकास्तरावर आल्यानंतर त्याचे उपरोक्तनुसार वर्गीकरण झाल्याशिवाय गटसमन्वयकांचा प्रभार असलेले शिक्षण विस्तार अधिकारी यांनी कार्यालय सोडू नये.
५.२ ) शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पाठयपुस्तक वितरणापूर्वी शाळानिहाय वर्गनिहाय माध्यमनिहाय, पंचायत समिती निहाय पात्र विद्याथ्र्यांची यादी तयार ठेवावी आणि शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वितरण करण्यात यावे. सदरचा पाठ्यपुस्तके वितरणाचा दिवस पुस्तक दिन ( Boak Day) म्हणून साजरा करणेबाबत संबंधितांना सूचित करण्यात यावे संपूर्ण जिल्हयात एकाच दिवशी पाठयपुस्तकांचे वितरण होईल, याबाबत नियोजन करण्यात यावे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व निकष पात्र शाळांना अशा प्रकारच्या सूचना तात्काळ निर्गमित करण्यात याव्यात.
५.३) शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचा पुरवठा होईल यांचे नियोजन करून वेळापत्रकाची प्रत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई च प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांचे कार्यालयास अवगत करावे.
५.४) विभागीय शिक्षण उपसंचालकांनी आपल्या स्तरावर त्यांच्या विभागातील जिल्हयांची व महानगरपालिकांची पाठ्यपुस्तकांची मागणी पुरवठा आणि वितरण याबाबतचे पंचायत समिती तसेच शाळा निहाय नियोजन करण्यासाठी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद (प्राथमिक), महानगरपालिकांचे, शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची बैठक आयोजित करावी. नियोजन करताना सभेच्या वेळी पाठयपुस्तकांच्या संबंधित भांडार प्रमुखांनाही आमंत्रित करावे. जेणेकरून पाठयपुस्तकांच्या पुरवठयामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत.
५. ५) पाठयपुस्तके वितरणासंदर्भातील नोंदी शाळा / पंचायत समिती स्तरावर ठेवण्यात याव्यात.
पाठयपुस्तकाची साठवणूक
६.१) ज्या जागेवर पुस्तके उत्तरावयाची आहेत, ती जागा निश्चित करताना सदरची जागा प्रशस्त असणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. पुस्तकांचे वाटप पंचायत समिती / वार्डातून करावयाचे असल्याने पुस्तकांच्या वर्गीकरणाच्या नंतर त्यांच्या थप्या रचता येतील याची खातरजमा करण्यात यावी. सदरची जागा सुस्थितीत सुरक्षित असावी पुस्तके पुरवठा करण्यापूर्वीचा काळ पावसाळयाची सुरुवात होण्याचा काळ असल्याने पाऊस आल्यास पुस्तके भिजणार नाहीत याची दक्षता घेऊन पुस्तके उत्तरविण्यात यावीत. त्याबाबतची आवश्यक व्यवस्था आधीच करावी.
६.२) पंचायत समिती स्तरावरून शाळांना पुस्तकांचे वाटप करावयाचे आहे याकरीता, पुस्तके ट्रकमध्ये चढवणे आणि उतरवून देणे यासाठी ट्रक येऊ शकेल एवढा मोठा रस्ता निश्चित केलेल्या जागेपर्यंत उपलब्ध असावा. गरज पडल्यास सदरचे काम रात्रीच्या वेळी करावे लागेल म्हणून विजेची व्यवस्था असणे आवश्यक राहील.
पाठयपुस्तके वाटपाचे वेळापत्रक
७. १) सर्व पुस्तके माध्यमनिहाय, इयत्ता निहाय आणि पंचायत समितीनिहाय वेगळी करण्यात यावीत आणि ती ठराविक दिवशी संबंधित पंचायत समितीला / वाडांला वेळेत पोहचविण्यात यावीत. ७.२) पुस्तकाचे वाटप करण्यासाठी पुढील स्वरूपात वेळापत्रक निश्चित करण्यात यावे. जेणेकरून त्या स्तरावर पुस्तके उत्तरवण्यास अधिकारी / कर्मचारी उपस्थित राहतील व वेळेचा अपव्यय होणार नाही. पाठयपुस्तके जून महिन्यात शाळा सुरु होण्यापूर्वी सात दिवस अगोदर शाळास्तरावर उपलब्ध होणे आवश्यक आहे.
| अ.क्र | वाटपाचे ठिकाण | पाठ्यपुस्तक वाटप दिनांक |
|---|---|---|
| १ | पाठ्यपुस्तक भांडार स्तरावरून पंचायत समिती | दि. ३१/०५/२०२३ पर्यंत (अमरावती व नागपूर विभाग वगळता इतर विभागातीलजिल्हयांसाठी) |
| २ | पंचायत समिती / वार्ड स्तरावरून शाळांना | दि. १०/०६/२०२३ पर्यंत (अमरावती व नागपूर विभागातील जिल्हयांसाठी) समिती / वार्ड दि. ०७/०६/२०२३ पर्यंत (अमरावती व नागपूर विभाग वगळता इतर विभागातील दि. १७/०६/२०२३ (अमरावती व नागपूर विभागातील जिल्हयांसाठी) |
| ३ | शाळा स्तरावरून विद्यार्थ्यांना | दि. १५/०६/२०२३ (अमरावती व नागपूर विभाग वगळता इतर विभागातील जिल्हयांसाठी दि. २६/०६/ २०२३ अमरावती व नागपूर विभागातील जिल्हयांसाठी) |
पंचायत समिती / वार्ड स्तरावर पाठ्यपुस्तकांचे वाटप :
८.१) पुस्तके प्राप्त होण्यापूर्वीच कोणत्या जागी पुस्तके उत्तरावयाची आहेत. हे त्या स्तरावर प्रत्यक्षपणे जागेस भेट देऊन निश्चित करावे. ही जागा निवडताना सुद्धा वर नमूद केलेल्या सूचनांचे पालन करावे त्याचप्रमाणे प्रत्येक पंचायत समिती / वार्ड स्तरावर कोणत्या शाळेत कोणत्या माध्यमाची आणि कोणत्या इयत्तेची किती पुस्तकांची आवश्यकता आहे याबाबतचा तपशिल तयार करावा जेणेकरून वाटप सोयीचे होईल.
८. २) पंचायत समिती स्तरावर त्यांना प्राप्त झालेल्या पुस्तकांची मोजणी करून आवश्यक तेवढी पुस्तके प्राप्त झाली किंवा नाही याची खातरजमा करावी.
८.३) पुस्तके कमी अधिक असल्यास तात्काळ संबंधित वरिष्ट अधिकाऱ्यास कळवावे.
८.४) प्राप्त पुस्तकांचे इयत्तानिहाय माध्यमनिहाय आणि शाळानिहाय वर्गीकरण करण्यात यावे.
८.५) ज्या शाळांसाठी जी जागा निश्चित केली असेल त्याच ठिकाणी तो पुस्तके ठेवण्यात यावी.
८. ६) पुढील नमुन्यात पुस्तकांचे वाटपाचे नोंद रजिस्टर पंचायत समिती / वार्ड स्तरावर ठेवावे व पुस्तके प्राप्त झाल्यावर त्यावर मुख्याध्यापकांची व त्यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधीची स्वाक्षरी घ्यावी. सदर नोंद रजिस्टरची पडताळणी नजिकच्या वरिष्ठ पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी करावी.
मोफत पाठ्यपुस्तके पुरवठा रजिस्टर प्रपत्राचा नमूना
| क्र | शाळेचे नाव | यु-डायस क्रमांक | दिनांक | इयत्ता निहाय पुस्तक संच संख्या | एकुण | स्वाक्षरी | शेरा | |||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| १ ली | २ री | ३ री | ४ थी | ५ वी | ६ वी | ७ वी | ८ वी | |||||||
| १ | जि.प शाळा | 27360317123 | 15/06/2023 | 29 | 35 | 42 | 40 | 35 | 61 | 64 | 66 | 372 | xxxxx | |
| २ | जि. प शाळा | 27361321623 | 15/06/2023 | 10 | 10 | 10 | 10 | 10 | 10 | 10 | 10 | 80 | XXXX | |
पुस्तकांचे विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक वितरण :
९.१) प्रथम सत्राच्या ज्या दिवशी शाळा सुरु होईल त्या दिवशी उपस्थित असलेल्या सर्व विद्याथ्र्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण मुख्याध्यापक करतील.
९.२) पुस्तके वितरणाच्या वेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, माता-पालक संघ, संस्थेचे पदाधिकारी आणि इतर शिक्षण प्रेमी नागरीक यांना उपस्थित राहण्याबाबत मुख्याध्यापकानी निमंत्रित करावे आणि त्यांचे उपस्थित सभारंभपूर्वक पाठयपुस्तकांचे वितरण करावे.
९.३) पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थी शाळेत न आल्यास ज्या दिवशी विद्यार्थी प्रथमतः शाळेत येईल त्या दिवशी पात्र विद्याथ्यांना पाठयपुस्तके देण्यात यावीत. तसेच नंतर जस जसे विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतील तस तसे प्रवेशाच्याच दिवशी पात्र विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके देण्यात यावीत.
९.४) समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांकरीता असलेल्या निकषपात्र शाळांमध्ये शाळाबाहय विद्याथ्र्यांनी प्रवेश घेतला असल्यास, सदर विद्यार्थ्यास शिल्लक असलेल्या पाठयपुस्तकांमधून, पाठयपुस्तके देण्यात यावीत. पुस्तके उपलब्ध नसल्यास वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून, शाळाबाहय विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.
पाठयपुस्तके वितरणाचा अहवाल सादर करणे
१०.१) पुस्तकांचे वितरण झाल्यानंतर पुस्तके वितरणाचा अहवाल शाळांनी पंचायत समिती पंचायत समित्यांनी जिल्हा परिषदांना व जिल्हा परिषदांनी / महानगरपालिकांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई व प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयास शाळा सुरु झाल्यानंतर सात दिवसात पाठवावा. सदर माहिती शासनास सादर करावयाची असल्याने उपरोक्त अहवाल सादर करण्यास विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
१०.२) शाळेत पहिल्या दिवसापासून पुढील आठ दिवसातील पाठ्यपुस्तकांच्या वाटपाचा आढावा घेण्यात यावा. विद्यार्थी संख्या आणि वाटप यात तफावत दिसून आल्यास, त्याचप्रमाणे काही शाळांत काही इयत्तांची पाठ्यपुस्तके अधिक तर काही ठिकाणी कमी पडण्याची शक्यता दिसून आल्यास, जिल्हा परिषद, क्षेत्रात केंद्रप्रमुख / शिक्षण विस्तार अधिकारी यांनी, तर नगरपालिका / महानगरपालिका क्षेत्रात त्यांचे वरिष्ट पर्यवेक्षीय अधिकारी यांनी आढावा घेतल्यानंतर जास्त पुस्तके असलेल्या शाळांतून कमी पुस्तके असलेल्या शाळांमध्ये समायोजन करावे आणि याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंचायत समिती / महानगरपालिकेला कळविण्यात यावा.
१०. ३) पाठयपुस्तके आणि शैक्षणिक गुणवत्ता यांचा घनिष्ठ संबंध आहे. सदर बाब लक्षात घेऊन प्रत्येक टप्यावरील कार्यवाही अत्यंत दक्षतेने पार पाडणे आवश्यक आहे. आपल्या जिल्हा परिषद / महानगरपालिका क्षेत्रात पात्र लाभाथ्र्यांपैकी कोणताही लाभार्थी विद्यार्थी पाठयपुस्तकांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
१०.४) पाठयपुस्तकाच्या वितरणाची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी व कोणत्याही परिस्थितीत शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व लाभार्थी विद्यार्थ्याना पुस्तके वितरीत करण्यात यावीत. याबाबत आपल्या अधीनस्त सर्व अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात यावे. ज्या अधिकान्यांकडून उपरोक्तनुसार कार्यवाही न झाल्यास त्यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
१०. ५) सदर योजना योग्यरितीने राबविता यावी, यासाठी ठळक मुद्द्याची पडताळणी परिशिष्ट १ मध्ये मार्गदर्शनासाठी देण्यात आलेली आहे. त्याचा उपयोग करण्यात यावा.
(११) पत्रकार परिषद:
११. १) शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, शिक्षण प्रमुख, शिक्षण निरीक्षक यांनी आपल्या स्तरावर समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके पुरविली जाणार आहेत. ही माहिती देण्यासाठी शाळा सुरु होण्याच्या सर्वसाधारणपणे ५ दिवस अगोदर त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करावी.
११.२) सर्वापर्यंत सूचना पोहोचण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे त्या त्या विभागात प्रकाशित होणारी दनिका वृत्तपत्रांच्या माध्यमातून जर सदर माहिती सर्वापर्यंत पोहोचवली तर निश्चितच त्याचा फायदा होईल आणि शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येक पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळेल.
११.३) पत्रकार परिषदेच्या वेळी पाठ्यपुस्तके वितरणाचे नियोजन, विद्याथ्र्यांची संख्या, विद्यार्थ्यापर्यंत पाठ्यपुस्तके पुरविण्याची करण्यात येणारी कार्यवाही इ. ची सविस्तर माहिती देण्यात यावी. सोबत प्रेस नोटचा नमूना परिशिष्ट २ मध्ये मार्गदर्शनासाठी दिला आहे. त्यात जिल्हा परिषद अथवा महानगरपालिका संदर्भात योग्य ती माहिती भरून त्याची स्वच्छ प्रत तयार करावी व त्याच्या आवश्यक तेवढ्या प्रती पत्रकार परिषदेच्या वेळी वाटण्यात याव्यात.
११.४) प्रेसनोटमध्ये आपल्या जिल्हयातील परिस्थितीनुसार काही बदल आवश्यक वाटल्यास आवश्यक तो बदल करण्यास हरकत नाही.
(१२) पाठयपुस्तके वाटपाबाबतचा अहवाल:
१२.१) पाठयपुस्तक मंडळाकडून जसजशी पाठ्यपुस्तके प्राप्त होतील त्या त्या वेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई व प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयास त्वरित कळविणे आवश्यक आहे.
१२.२) पत्रकार परिषदेत वितरण केलेल्या, प्रेस नोटची प्रत पत्रकार परिषद घेतल्याबाबतचा अहवाल विभिन्न वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीची मूळ कात्रणे, पाठयपुस्तके वितरणाची छायाचित्रे इ. व्यवस्थित बाईडिंग करून घ्यावी. त्यास योग्य ते शिर्षक अथवा माहिती भरावी व त्याची पुस्तिका तयार करावी. सदर पुस्तिका महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई व प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे या कार्यालयास सादर करण्यात यावी.
१२.३) पाठयपुस्तकांचे वितरण झाल्यानंतर आपल्या जिल्हयात समग्र शिक्षा अभियानाची पाठयपुस्तके वाटण्याच्या कार्यक्रम कशा पद्धतीने करण्यात आला याबद्दलचे काही अनुभव आणि पाठयपुस्तक वितरणाची निश्चित आकडेवारी या बाबतीतला वृत्तांत माहितीसाठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात यावा. या प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची मूळ कात्रणेसुद्धा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई व प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयास बाईडिंग करून पाठविण्यात यावीत. शक्यतो पाठ्यपुस्तक वितरणाचे चांगल्या प्रतीचे चित्रफीत (Video Recording) तयार करण्यात यावे व ते महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई या कार्यालयास उपलब्ध करून दिल्यास सर्वोत्कृष्ट व्हिडीओ शगुन पोर्टलवर अद्ययावत करण्यात येतील.
(१३) मोफत पाठ्यपुस्तके पुरवठा योजनेतील जबाबदार अधिकारी :
१३. १) समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याच्या वरीलप्रमाणे तपशीलवार सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी बारकाईने अभ्यासाव्यात.
१३.२) शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये शिकणाऱ्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप होईल, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी.
स्तर जबाबदार अधिकारी
| स्तर | जबाबदार अधिकारी |
|---|---|
| शाळा | मुख्याध्यापक |
| केंद्र / नगरपालिका | केंद्र प्रमुख / प्रशासन अधिकारी |
| तालुका | गटसमन्वयक पदाचा प्रभार असलेले शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी (बृहन्मुंबईसाठी शिक्षण निरिक्षकांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित उपनिरीक्षक / शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी हे त्यांच्या वार्डासाठी जबाबदार राहतील. |
| जिल्हा | जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) |
| महानगरपालिका | महानगरपालिका, शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी शिक्षण प्रमुख |
| शैक्षणिक विभाग | विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व |
उपरोक्त उद्दिष्ट साध्य करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची वैयक्तिक जबाबदारी असेल. यात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांचे कर्तव्य पालनात गंभीर कसूर केल्याचे मानण्यात येईल आणि त्या अधिकान्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
क्षेत्रीय भेटी दरम्यान मोफत पाठयपुस्तके योजनेची अंमलबजावणी समग्र शिक्षा अभियान अंमलबजावणी आराखडयातील मार्गदर्शक सूचनानुसार तसेच राज्य कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे शाळा स्तरावरून होत आहे याची खात्री करण्यात येईल. मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा स्तरावरून सर्व निकष पात्र लाभाथ्र्यांना पाठयपुस्तकांचा लाभ देणे आवश्यक आहे.
पाठयपुस्तक योजनेपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सदर योजनेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या तक्रारी, लोकसभा / राज्यसभा विधानसभा / विधान परिषद तारांकित / अतारांकित प्रश्न तसेच लेखा आक्षेप उपस्थित होणार नाहीत. याबाबतची दक्षता घेऊन अंमलबजावणी करावी.
अशाप्राकरे सन २०२३-२४ मध्ये मोफत पाठ्यपुस्तक कार्यवाही केली जाणार आहे. आपणांस कळविण्यात येते की, सदर मार्गदर्शक सूचना जिल्हयातील सर्व शाळांपर्यत निर्गमित होतील याची दक्षता घेण्यात यावी.
पत्रक लिक- येथे क्लिक करा.
आपणास हे ही आवडेल

0 टिप्पण्या