तीन वर्षापासून शिक्षकांच्या पीएफच्या पावत्या मिळालेल्या नाहीत. पीएफच्या पावत्या मिळणेबाबत
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण
संचालनालय राष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत,
डॉ. नीट मार्ग, पुणे ४११००९
अत्यंत महत्वाचे/
कालमर्यादित
प्रति,
१) शिक्षणाधिकारी
(प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व
(२) शिक्षण निरीक्षक, (उत्तर
/ दक्षिण पश्चिम) मुंबई
३) अधीक्षक वेतन
व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक) सर्व
विषय : मागील तीन
वर्षापासून शिक्षकांच्या पीएफच्या पावत्या मिळालेल्या नाहीत. पीएफच्या पावत्या मिळणेबाबत.
संदर्भ- १) मा.
श्री. सत्यजीत तांबे, वि.प.स.
यांची बैठक दि. २५/०४/२०२३
२) मा. आयुक्त
(शिक्षण) कार्यालयाचे पत्र क्र. अशिका/बैठक/इतिवृत्त/२०२३/२७२८ दि. ३/०५/२०२३
(इतिवृत्त)
३) दिनांक
२०/०४/२०२३ रोजी व्हीसी मध्ये दिलेल्या सूचना
४) मा. आयुक्त (शिक्षण)
कार्यालयाचे पत्र क्र. शिक्षा/ २०२३ /मार्च २/ संकीर्ण/ आस्था के माध्य/ २२२६ दि.
२१/०४/२०२३
उपरोक्त
संदर्भाधिन विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते को संदर्भ क्र. ६ अन्वये मा. आमदार
सत्यजीत तांचे विपस यांची मा. आयुक्त (शिक्षण) यांचे समवेत दिनांक २५/०४/२०२३ रोजी
बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार संदर्भ क्र. २ अन्वये इतिवृत्तातील नमूद
मुद्यांवर तात्काळ कार्यवाही करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहे. उपरोक्त विषयी
विविध संघटनांकडून मागील तीन वर्षापासून शिक्षकांच्या पावत्या मिळालेल्या नाहीत
त्यामुळे पीएफच्या पावत्या मिळणेबाबतचे निवेदन संदर्भ ४ अन्वये मा. आयुक्त
(शिक्षण) कार्यालयाकडून मा संचालनालयास प्राप्त झालेले आहे.
संदर्भ क्र. ३ अन्यये
दिनांक २०/०४/२०२३ रोजी व्हीसीमध्ये सर्व अधीक्षक, चेतन पथक (प्राथमिक) यांना जीपीएफ च्या
पावत्या तात्काळ सूचना देण्यात आलेल्या होत्या सबब राज्यातील मान्यताप्राप्त
अनुदानित खाजगी प्राथमिक शाळांत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना मागील तीन
वर्षापासून प्रलंबित असलेल्या जीपीएफच्या पावत्या तात्काळ देण्यात याव्यात. तसेच
मागील तीन वर्षाच्या चर्षनिहाय पावत्या वाटप केल्याचा अहवाल संचालनालयास सादर
करावा. पीएफच्या पावत्या प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पाबाबत मा.
आमदार, लोकप्रतिनिधी
व विविध संघटनांकडून पाठपुरावा करण्यात येत असल्याने सदर प्रकरणी प्रथम
प्राधान्याने कार्यवाही करावा व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर
करावा.
मा. लोकप्रतिनिधी
यांचेकडून पीएफच्या पावत्या मिळालेल्या नाहीत याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यास त्यांची
सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी,
(देविदास
कुलाळ)
शिक्षण उपसंचालक
(प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
०१

0 टिप्पण्या