शैक्षणिक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडण्यासाठी शासन तयार आहे. शैक्षणिक वर्षाची सुरुवात जी सध्या जून महिन्यापासून होते. ते आता एप्रिल महिन्यापासून करण्याचा निर्णय सुकाणू समितीमार्फत घेण्यात आलेला आहे. राज्य शासन लवकरच याबाबत आपली भूमिका स्पष्ट करेल. सोबतच दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या वर्षाच्या शेवटी म्हणजे मार्च एप्रिल महिन्यामध्ये घेण्यात येतात. मात्र नवीन शिफारशीनुसार या परीक्षा वर्षातून दोनदा व्हाव्यात असं सांगण्यात आलेले आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.
सध्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून महिन्यामध्ये होते. यापुढे ही सुरुवात एप्रिल महिन्यापासून करण्याच्या शिफारसी स्थापन केलेल्या सुकाणू समितीने केल्या आहेत. शैक्षणिक वर्षे 2026-27 पासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात यावी. अशाही सूचना या समितीमार्फत करण्यात आलेले आहेत.
शैक्षणिक धोरण 2020 आणि त्याची अंमलबजावणी याचा अभ्यास करण्यासाठी शासनामार्फत सुकाणू समितीची कठीण करण्यात आली होती. या गठीत केलेल्या समितीने आपले अहवाल राज्य सरकार यांना सादर केलेला आहे. यामधील सर्वात महत्त्वाची शिफारस म्हणजे शैक्षणिक सत्र 1 एप्रिल पासून करण्यात यावं ही आहे.
सध्या सीबीएससी पॅटर्नच्या ज्या शाळा आहेत त्या शाळाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवाती 1 एप्रिल पासून होत असते. याविषयी आपणाला कल्पना आहे. मात्र नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या सुकाणू समितीने सुद्धा ही शिफारस केली आहे की जे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र आहे ते शैक्षणिक सत्र एप्रिल महिन्यामध्ये सुरू करण्यात यावं. 2026 27 या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सुद्धा या नवीन शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी असं सांगण्यात आलेला आहे.
नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत विद्यार्थ्यांच्या वयोगटा नुसार म्हणजेच बालवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंत पहिला स्तर, तिसरी ते पाचवी पर्यंत दुसरा स्तर आणि नववी ते बारावीपर्यंतचा तिसरा स्तर निश्चित करण्यात आलेला आहे. इयत्ता नववी पासून विद्यार्थ्यांना एक स्थानिक भाषा व दुसरी देशाची भाषा किंवा कोणतीही परदेशी एक भाषा निवडता येणार आहे. यामुळे विषयांची मर्यादा कमी होणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येतील त्या विषयाचा समावेश त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये करता येणार आहे.
सीबीएससी बोर्डाच्या ज्या शाळा आहेत त्या सीबीएससी बोर्डाच्या शाळा 31 मार्चला संपतात आणि नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही १ एप्रिल पासून होत असते. त्यातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी भरपूर चांगला वेळ मिळतो आणि याच गोष्टीचा विचार करून अध्यापनाचा आणि शैक्षणिक वर्षाचा विचार करता राज्यातील शाळा एक एप्रिल पासून सुरू कराव्यात अशी शिफारस करण्यात आलेली आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी भरपूर वेळ उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी लागणाऱ्या तासिका सुद्धा वाढवता येऊ शकतात असं सांगण्यात आलेला आहे. सध्या विद्यार्थ्यांचा सीबीएससी बोर्ड याकडे वाढता कड लक्षात घेऊन राज्य सरकारने सुद्धा गणित आणि विज्ञान हे जे दोन विषय आहेत. ते दोन विषय सीबीएससी प्रमाणे ठेवावेत असंही ठरवण्यात येणार आहे आणि यासाठी नेमण्यात आलेल्या सुकाणू समितीने सुद्धा त्याला मान्यता दिली आहे. आता या सर्व गोष्टीची अंमलबजावणी ही सन 2026-27 म्हणजे येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे.

0 टिप्पण्या