शिक्षक हा कोणत्याही देशाचा कणा असतो, जणू आधारस्तंभव. या आधारस्तंभावरव सगळ्या आशा आकांक्षा वास्तवात रूपांतरित होतात.
आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती व थोर गुरू. डॉ. सर्वोपल्ली राधाकृष्णन शिक्षकांना सल्ला देत असत की, "आपण सदैव बौद्धिक एकात्मता व सार्वत्रिक अनुकंपा यांचा पाठपुरावा केला पाहिजे. खऱ्या गुरूमध्ये ही दोन गुणवैशिष्टये असतात," शिक्षकाला शिकवण्याचे काम आवडत असलेच पाहिजे व त्याची त्याच्या या व्यवसायाशी बांधीलकी असली पाहिजे. शिक्षकांनी जीवनभर शिकत राहिले पाहिजे. त्यांनी केवळ एखादया विषयाची 'चिअरी' व 'प्रेक्टिकल' शिकवून थांबता कामा नये, तर त्यांनी समाजाचा सांस्कृतिक वारसा व मूल्य पद्धती या बाबतीतल्या मूलभूत गोष्टींचे पूर्ण अध्यापन केले पाहिजे.
शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांची अशी जडणघडण केली पाहिजे, की ते विद्यार्थी स्वतंत्रपणे ज्ञानोपासना करू शकतील.
माझ्या जीवनामध्ये माझ्या शिक्षकांनी फार महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. माझ्यावर खूप मोठा प्रभाव टाकणाऱ्या व माझ्या जीवनाला आकार देणाऱ्या शिक्षकांचे मला विशेष स्मरण होते.
शिक्षक हे देशातील सर्वोत्तम विचास्वंत असले पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र उभारणीच्या क्षमता निर्माण करणे हा अध्यापनाचा उद्देश असतो. या क्षमता पुढे नमूद केलेल्या बाबींमधून मिळतात. शिक्षणातून मिळणारे ज्ञान, स्वानुभव आणि सांस्कृतिक बारशाच्या माध्यमातून येणारी मूल्यपद्धती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विदद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये नेतृत्वगुण निर्माण करायला हवेत.
माझ्या मनःचक्षूसमोर चित्र उभे राहते की, प्रत्येक शैक्षणिक परिसरातून हजारो ज्ञानसंपन्न विदयार्थी बाहेर पडत आहेत. ते आपल्या देशाला आणि जगाला वैश्विक शांती आणि समृद्धी बहाल करत आहेत.
एक वाचन आहे की. "तुम्ही सचोटीने वागणारे असाल, तर इतर कोणत्याही गोष्टीला काही महत्त्व नसते, आणि तुम्ही सचोटीने वागणारे नसाल, तर कोणत्याच गोष्टीला काही अर्थ नसतो." या वचनातून एक अत्यंत महत्त्वाचा संदेश मिळतो. समाजामध्ये सोचोटीने वागणाऱ्या एक लाख विद्वान विद्यार्थ्यांचा ओघ निर्माण झाला, तर दर पाच वर्षांनी आत्ताच्या नाजूक अवस्थेतील समाजाला खचितच मोठा व सुखद धक्का बसेल आणि मुलांचे आदर्श (Role Models) असणारे, गुरुच्या भूमिकेतील शिक्षकच हे कार्य करू शकतात.
शिक्षकामध्ये असणारे आवश्यक गुण खालीलप्रमाणे आहेत:
ज्ञान: शिक्षकांना त्यांच्या विषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यांना विद्यार्थ्यांना नवीन कल्पना शिकवण्यासोबतच त्यांच्या शंकांचे निराकरण करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
सहानुभूती: विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांच्याशी एकभावी वागणे हे एक चांगल्या शिक्षकाचे लक्षण आहे.
विषय ज्ञान : शिक्षकाकडे आपल्या विषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते. आपण जो विषय अध्यापन करणार आहोत त्या विषयाचे सखोल माहिती असायला हवी. त्यासाठी अवतार वाचन करावे लागेल. नवीन प्रशिक्षण करून असे विषय ज्ञान प्राप्त करावे लागेल.
धैर्य: प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण्यासाठी शिक्षकांना धीर आणि संयम असणे आवश्यक आहे. कोणत्या वेळी कसे वागावे, कोणती वेळ व कशीही वेळ आली तरी आपले धैर्य खाचता काम नये.
प्रेरणा: शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची उत्सुकता निर्माण करणे आवश्यक आहे.
संचार कौशल्य: प्रभावीपणे संवाद साधणे हे एक चांगल्या शिक्षकाचे महत्त्वाचे कौशल्य आहे.
तंत्रज्ञान जाणीव: आजच्या युगात तंत्रज्ञान शिक्षणाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनले आहे. म्हणून, शिक्षकांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
सर्जनशीलता: शिक्षण ही एक कला आहे आणि शिक्षकांना नवीन आणि मनोरंजक पद्धतीने शिकवण्यासाठी सर्जनशील असणे आवश्यक आहे.
नेतृत्व: शिक्षकांना वर्गात एक प्रभावी नेतृत्व करणे आवश्यक आहे. एक उत्तम नेतृत्व करणारा शिक्षक असायला हवा. वर्गातील अध्यापन असेल किंवा उपक्रम असेल अश्या वेळी नेतृत्व शिक्षकाला जमले पाहिजे.
आत्मविश्वास: स्वतःवर विश्वास ठेवणे आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करणे हे एक चांगल्या शिक्षकाचे लक्षण आहे. कोणते ही काम करताना कामामध्ये आत्मविश्वास दिसायला हवा.
अद्ययावत रहा: शिक्षण क्षेत्रात नेहमीच नवीन बदल होत असतात. म्हणून, शिक्षकांना स्वतःला अद्ययावत ठेवून नवीन पद्धती शिकण्याची गरज आहे. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नाही तर एक मार्गदर्शक असतो.
उत्तम स्वास्थ्य : मुले आपल्या शिक्षकाचे अनुकरण करत असतात. यासाठी शिक्षकाचे आरोग्य चागले असायला हवे. आदर्श शिक्षकासाठी त्याचे आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे, कारण तरच तो आपले कर्तव्य चोखपणे पार पाडू शकतो. शिक्षकाची तब्येत चांगली असेल तर त्याचे मनही निरोगी राहते. प्रभावी अध्यापन हे केवळ निरोगी शिक्षकच करू शकतात. जेव्हा शिक्षकाचे आरोग्य चांगले असेल तेव्हात्यांचे शरीर आणि व्यक्तिमत्व आकर्षक दिसेल, ज्याचा मुलांवर चांगला परिणाम होण्यास मदत होईल.
भाषा : शालेय अध्यापन अथवा संवाद करत असताना शिक्षकाची भाषा भाषा सोपी, गोड आणि स्पष्ट असावी जेणेकरून विद्यार्थ्यांना ती चांगली समजेल. यामुळे आपले शिक्षक काय शिकवत आहेत अथवा काय सगात आहेत ते मुलाला समजेल. त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील
वक्तशीरपणा : आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे वक्तशीरपणा होय. हा गुण खूप महत्त्वाचा आहे. शाळेची वेळ, अध्यापन, विविध उपक्रम , शालेय व्यवस्थापन अशा गोष्टी करताना त्या वेळेवर करणे गरजेचे असते. त्यासाठी शिक्षकाकडे वेळेची नियमितता वक्तशीरपणा असणे खूप आवश्यक असते.
हे वरील गुण शिक्षकाकडे असणे आवश्यक असते. याव्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं, अजुन कोणते गुण एका आदर्श शिक्षकामध्ये असण्याची गरज आहे?
हे खाली कॉमेंट करून कळवू शकता.
सतत येणार प्रश्न -
शिक्षकामध्ये कोणते गुण असावेत?
उत्तर - चांगल्या शिक्षकाच्या काही गुणांमध्ये संवाद, ऐकणे, सहयोग, अनुकूलता, सहानुभूती आणि संयम या कौशल्यांचा समावेश होतो. प्रभावी अध्यापनाच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये वर्गात आकर्षक उपस्थिती हे गुण असावेत.
शिक्षकातील विद्यार्थ्यांना कोणता गुण सर्वात जास्त आवडतो?
उत्तर - चांगल्या शिक्षकामध्ये मजबूत संवाद कौशल्य, सहानुभूती आणि आयुष्यभर शिकण्याची आवड यासारखे गुण असतात. हे गुणधर्म केवळ सकारात्मक आणि आकर्षक वर्गातील वातावरणच वाढवत नाहीत तर विद्यार्थ्यांचे यश वाढवतात आणि शिकण्याची आवड निर्माण करतात.
एक चांगला शिक्षक म्हणजे काय?
उत्तर - एक चांगला शिक्षक असा असतो जो आपल्या विद्यार्थ्यांना शिकण्यात गुंतवून ठेवू शकतो, त्यांना शिकण्यात उत्साही बनवू शकतो आणि सामग्री समजून घेण्यात मदत करू शकतो.
0 टिप्पण्या