Ticker

6/recent/ticker-posts

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी नवीन दर १ एप्रिल पासू लागू

 शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत. सन २०२१-२२

शालेय पोषण आहार MDM नवीन दर शासनामार्फत निर्धारीत करण्यात आलेले आहेत. या नविन दराने शालेय पोषण आहार मानधन व खर्च अदा केला जाणार आहे. त्याविषयीचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे. असे नवीन शालेय पोषण आहारचे दर कोणती व किती आहेत. याविषयीची माहिती आपण आज घेणार आहोत. प्रथम याविषयीचा आलेले शासन निर्णय आपण पाहू या.

शालेय पोषण आहार


संदर्भ पत्रके-

) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, २००६.

) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१०/प्र.क्र.१८/प्राशि-, दि.०२ फेब्रुवारी २०११

) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ २११६/प्र.क्र.२००/एस.डी ३. दि. २७ ऑक्टोंबर, २०१६

) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१८/प्र.क्र.२५०/एस.डी-. दि.०५ फेब्रुवारी २०१९ ५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१९/प्र.क्र.१२८ / एस.डी-, दि. १९ जुलै, २०१९

) केंद्र शासनाचे पत्र क्र. F.No.-/ २०१८ Desk (MDM), दि. १४/०४/२०२०

शासन निर्णय-

राज्यामध्ये शालेय पोषण आहार (Mid Day Meal) ही योजना इ.१ ली ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येते. सदर योजनेंतर्गत इ.१ ली ते इ.५ वी मधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच, . ६ वी ते इ.८ वी मधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो.

केंद्र शासनाने दि. २४ जून, २०१९ च्या आदेशान्वये सन २०१९-२० या आर्थिक वर्षापासून अन्न शिजविण्याच्या दरात ३.०९ टक्के वाढ करण्याचे निर्देश दिलेले होते. यानुसार संदर्भाधिन दि. १९ जुलै, २०१९ च्या शासन निर्णयान्वये अन्न शिजविण्याच्या दरासातीचे (Cooking Cost) प्रति शासन निर्णय क्रमांकाशापा-२०२०/प्र.प्र.८५/एस. की दिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी रु..४८ आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी रु..७१ याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली होती.

केंद्र शासनाने संदर्भाधिन दि. १४ एप्रिल २०२० च्या आदेशान्वये सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून अन्न शिजविण्याच्या दरात १०.९९ टक्के दरवाढ मंजूर केली आहे. तसेच, सदर दर दि.०१ एप्रिल, २०२० पासून लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, राज्य शासनाच्या वित्त विभागाने सध्यस्थितीत सदर दरवाढ सन २०२१-२२ या आर्थिक वर्षापासून लागू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार संदर्भाधिन दि. ०२/०२/२०११ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार सदर दरवाढ लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

१)     शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे आहाराचा पुरवठा करण्यास तसेच त्यासाठी सुधारित दरास मान्यता  देण्यात येत आहे.

शालेय पोषण आहार दर

२)     शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ग्रामीण भागामध्ये तांदूळाबरोबरच इतर धान्यादी मालाचा पुरवठा शाळास्तरावर करण्यात येतो. सदर धान्यादी मालापासून आहार बनविण्यासाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक लाभार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहार खर्चाची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे..

शालेय पोषण आहार दर

३)     प्रस्तुत योजनेमध्ये शहरी भागामध्ये म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये स्वयंसेवी संस्था / बचत गट यांचेमार्फत शिजविलेल्या तयार आहाराचा पुरवठा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना करण्यात येतो. शहरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीवा वापर करून तयार आहाराचा पुरवठा करण्यात येत असल्याने शहरी भागातील विद्यार्थ्यांना अनुज्ञेय खर्च मर्यादा खालीलप्रमाणे राहील. सदर आहार खर्चाच्या मर्यादेत शासनाने निश्चित केलेल्या धोरणाप्रमाणे अन्न शिजवणाऱ्या यंत्रणेणा अनुदान देय राहील.

शालेय पोषण आहार दर

४)    सदरचे सुधारित दर राज्य शासनाच्या दि.०१ एप्रिल, २०२१ पासून लागू होतील.

आपणास हे ही आवडेल- 

 

Headmaster and school work मुख्याध्यापक व शालेय कामकाज 

इंग्रजीच्या अध्यापनात मुख्याध्यापकांची भूमिका 


 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. शालेय पोषण आहार कर्मचारी यांचे मानधन 5 महिने पासून रखडले आहे 2 महिण्यायातून 1500 रुपये मिळतात 1 महिना कुठं जतो माहीत नाही

    उत्तर द्याहटवा