Ticker

6/recent/ticker-posts

Balrakshak Maharashtra App 2022 बालरक्षक मोबाईल App

Balrakshak Maharashtra balrakshak app बालरक्षक, बालरक्षक मोबाईल App,maharashtra हंगामी स्थलांतरीत होणाऱ्या कामगारांच्या बालकांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी सर्वेक्षण App

Balrakshak-Maharashtra-app-2022 

मा शिक्षण आयुक्तांच्या कल्पने प्रमाणे, शालेय शिक्षण विभाग व Tata Trusts यांनी संयुक्त विद्यमाने राज्यभरातील स्थलांतरीत मुले, शालाबाह्य मुले व सातत्याने अनियमित मुले यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बालरक्षक हे डिजिटल app तयार केले आहे. हे App राज्यपातळीवर सुगमतेने वापरण्यासाठी शासनाने तयार केलेल्या SARAL प्रणालीवर हे app काम करेल आणि यातून तयार होणारा data व संबंधित माहिती SARAL प्रणालीवरच राहील.

Balrakshak-Maharashtra-app-2022-बालरक्षक

 

हे app वापराबद्दल च्या सुचना पुढील प्रमाणे-

Download Log In Details -

हे app आपल्याला गुगल प्ले स्टोर वरुन खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून डाऊनलोड करून घ्यावे लागेल.  आपल्या शाळेचा यु डाईस नंबर हेच आपल्याला लॉग इन आयडी म्हणून वापरायचे आहे. उदा. Log In Id-27251401718 Password म्हणून शाळेचा यु डाईस नंबर@123 टाकला जावा. उदा. Password -27251401718@123 या बालरक्षक App मध्ये सहा कार्ड बनवलेले आहे. ते खालील प्रमाणे-

Balrakshak-Maharashtra-app-2022-बालरक्षक

 

1. स्थलांतर आत

2. स्थलांतर बाहेर

3. शिक्षण हमी पत्रक

4. विद्यार्थ्याचा तपशील पहा

5. मुल जोडा

6. अनियमित विद्यार्थी

 

1. स्थलांतर आत-

A. हे कार्ड आपल्या भागात स्थलांतर होऊन आलेल्या मुलांच्या नोंदणीसाठी आहे.

B. यामध्ये मुलाच्या मूळ गावची शाळा निवडून त्याची इयत्ता निवडायची आहे.

c. मुलांच्या दिसणाऱ्या यादी मधून योग्य नाव असलेल्या मुलाला निवडण्यासाठी त्याच्या नावावरक्लिक करावे.

D. क्लिक केल्यानंतर मुलाचे डिटेल येतील, त्यामध्ये मुलाच्या मागील शाळेचे नाव नमूद करून स्थलांतर आत या बटनावर क्लिक केले कि मुलाच्या स्थलांतर आत ची प्रक्रिया पूर्ण होते.

12. स्थलांतर बाहेर -

A. हे कार्ड आपल्या (वापरकर्त्याच्या) शाळेमधून मुल स्थलांतर होणार असेल किंवा झाले असेल तर वापरायचे आहे.

B. यामध्ये स्थलांतर झालेल्या किंवा होणाऱ्या मुलाची इयत्ता निवडायची आहे.

C. त्यांनतर योग्य मुलाच्या नावावर क्लिक केल्यास मुलाची सरलप्रणाली मध्ये उपलब्ध असलेली माहिती दिसेल.

D. या माहितीमध्ये मुलाच्या स्थलांतराचे कारण आपल्याला नोंदवायचे आहे त्यासाठी, कारण या पर्यायावर जाऊन क्लिक करावे. त्यात दिलेली कारणे बघून योग्य ते कारण निवडावे.

E. तसेच ज्या ठिकाणी मुलाचे स्थलांतर झाले किंवा होणार आहे त्या ठिकाणच्या जिल्हा, तालुका, गाव यांची माहिती फक्त सिलेक्ट करावी.

F. स्थलांतर बाहेर या निळ्या बटनावर क्लिक केले असता स्थलांतर बाहेर हि प्रक्रिया पूर्ण होईल.

3. शिक्षण हमी पत्रक -

A. हे कार्ड मुलाच्या एकूण शैक्षणिक नोंदीबद्दल आहे.

B. यामध्ये मुलाची इयत्ता सिलेक्ट करून संबंधित मुलाच्या नावावर क्लिक करायचे आहे. C. मुलाच्या नावावर क्लिक केले असता मुलाची सरल प्रणालीमध्ये असलेली पूर्ण माहिती आपल्याला दिसून दिसते.

D. हे कार्ड आपण सर्वात वर असलेल्या सामायिक करा या पर्यायाला वापरून whats app द्वारे share करू शकतो.

4. विद्यार्थ्याचा तपशील पहा यामध्ये प्रस्तुत शाळेमधील विद्यार्थ्यांच्या नावावर क्लिक केले असता - त्यांच्या सर्व शैक्षणिक नोंदी पाहता येतील.

5. मूल जोडा.

A. हे कार्ड ज्या मुलांची नोंदणी यापूर्वी सरल मध्ये झाली नाही अशा शाळाबाह्य मुलांच्या नोंदणीसाठीआहे.

B. यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, लिंग, ही प्राथमिक माहिती भरावी लागेल.

C. यानंतर मुलाच्या मागील शाळेचे नाव, वर्ग अशी शालेय माहिती भरावी लागेल. D. त्याचबरोबर आईचे नाव, धर्म, जाती, जातीचे वर्णन इत्यादी वैयक्तिक गोष्टी गोष्टी नमूद करत त्याचा मूळ जिल्हा, तालुका, गाव सिलेक्ट करायचे आहेत.

E. हे सर्व झाल्यानंतर सर्वात खाली असलेल्या प्रस्तुत करणे या बटनावर क्लिक करून हि प्रक्रिया पूर्ण होईल,

6. अनियमित विद्यार्थी-

A. हे कार्ड अनियमित विद्यार्थी नोंदणीसाठी आहे. मागील वर्षीपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. शिक्षण विभागाने यासाठी पर्याय म्हणून Online क्लासेस (zoom, google meet, microsoft team, टिलीमिली इत्यादी द्वारे) चालू केले. अशावेळी अनियमित विद्यार्थी ठरवत असताना, जो विद्यार्थी या online क्लासेस किंवा सत्रांना सलग अनुपस्थित आहे, किंवा त्याच्याकडे वा त्याच्या पालकाकडे smartphone उपलब्ध नाही अशा निकषात बसणाऱ्या मुलांना अनियमित विद्यार्थी म्हणून ठरवावे.

Balrakshak-Maharashtra-app-2022-बालरक्षक

 

B. यामध्ये अनियमित झालेल्या मुलाच्या नावाला search करायचे आहे. C. मुलाचे नाव search झाल्यावर मुलाच्या नावावर क्लिक केले असता मुलाच्या शैक्षणिक नोंदी येतील.

D. या नोंदीमध्ये आपल्याला फक्त मुलाची उपस्थिती स्थितीच्या दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आहे.

E. त्याचबरोबर मुल अनियमित होण्याची कारणेसुद्धा आपल्याला नमूद करता येणार आहे. यामध्ये खालील दहा कारणांचा समावेश केला गेला आहे

1. घरातील कामे करावी लागतात.

2. लहान भावंडाना सांभाळावे लागते.

3. शिक्षण / शाळा आवडत नाही.

4. ऊसतोड कामगारांचे स्थलांतर

5. वीटभट्टी कामगारांचे स्थलांतर

6. इमारत बांधकाम कामगारांचे स्थलांतर

7. खाण कामगारांचे स्थलांतर

8. शाळेचे आलेले वाईट अनुभव

9. कोरोनाकाळात आलेल्या अडचणींमुळे

10. इतर

या दिलेल्या कारणांपैकी एकाची निवड मुल अनियमित असण्याचे कारण म्हणून आपणाला निवडायचे आहे.

F. यानंतर सर्वात खाली प्रस्तुत करा या पर्यायावर क्लिक केले असता हि प्रक्रिया पूर्ण होते.

7. याचसोबत Application मध्ये सर्वात वर तीन रेषा आहेत. त्यावर क्लिक केले असता काही पर्याय दिसतात. यामध्ये Search या पर्यायावर क्लिक केले असता तीन पर्याय येतात 1. select your region name 2. Select district name 3. Enter child name. यामध्ये आपल्या राज्याचे 8 प्रभाग दिसतात. यापैकी आपला योग्य तो प्रभाग निवडावा. त्यानंतर जिल्हा निवडावा. यानंतर Enter child name या पर्यायात मुलाचे नाव लिहा. सबंधित मुलाचे नाव खाली येईल त्यापैकी योग्य मुलाचे नाव सिलेक्ट केले असता मुलाच्या डीटेल्स येतात. मुलाची माहिती योग्य दिसली असता तुम्ही त्या मुलाला स्थलांतर बाहेर हा पर्याय निवडून त्याचे स्थलांतर बाहेर करू शकता. हि प्रक्रिया केल्यावर सबंधित मूल स्थलांतर आत या पर्यायाला उपलब्ध होऊ शकेल.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा-  


 

 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. अशा युजर आयडी पासवर्ड वापरून ओपन होत नाही.युजर आयडी पासवर्ड आणि पासवर्ड कसा reset करावा

    उत्तर द्याहटवा